आधीच्या भागात आपण पाहिले की,
आनंदीचे आई-बाबा आलेत म्हणून अभिजीतने ऑफिसला सुट्टी केली, त्याने बाहेर जाण्याचं ठरवलं. तिघेही घरून निघाले सगळ्यांनी मूवीला जाण्याचं ठरवलं, ते मूवी बघायला गेले. मूवी बघून बाहेर निघाले, रस्ता ओलांडून गाडी कडे जाणार तोच एका गाडीने आनंदीला टक्कर दिली. हे बघून सगळे स्तब्ध झाले, विक्रम आणि अभिजीत दोघेही ओरडले.
आता पुढे,
त्या गाडीने टक्कर देऊन ती गाडी पुढे गेली, लोकांचा जमाव जमा झाला, अभिजीत आनंदीच्या जवळ गेला.
"आनंदी... आनंदी उठ…"
आनंदी उठलीच नव्हती. आनंदीच्या डोक्याला जबर मार लागलेला होता आणि रक्ताच्या धारा वाहायला लागल्या होत्या. अभिजीतने लगेच आनंदीला उचलून जवळच्या हॉस्पिटलला नेलं. तिथे तिची अवस्था बघून तिथल्या डॉक्टरने मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितलं. अभिजीत ॲम्बुलन्सने दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन गेला.
हॉस्पिटलमध्ये आत जाताच त्याला डॉक्टर दिसले.
"डॉक्टर.. डॉक्टर बघा ना बघा हीच एक्सीडेंट झालाय. डोक्याला जबर मार लागलाय, प्लिज लवकर ट्रीटमेंट सुरू करा डॉक्टर.."
"तुम्ही शांत व्हा, हे बघा तुम्ही पोलिसात कळवले का? आधी पोलिसात कळवावे लागेल त्यानंतरच आम्ही ट्रीटमेंट सुरू करू."
"माझी बायको मरणाच्या दारात आहे, तिच्या डोक्याला मार लागला आहे, खूप रक्त वाहतय आणि तुम्हाला पोलीस स्टेशनच्या तक्रारीच पडलंय. हे बघा डॉक्टर मी तक्रार नोंदवून येईल पण आधी तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा. हीचा जीव वाचायला हवा."
"हे बघा आम्ही आधी काहीही करू शकत नाही."
"तुम्ही डॉक्टर आहात की हैवान? इथे माझ्या बायकोचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण असेल? डॉक्टर तर देवाचं दुसरं रूप आहे, तोच जीव वाचवतो. पण इथे तर भलतंच काहीतरी सुरू आहे. हे बघा डॉक्टर आता तुम्ही जर ट्रीटमेंट सुरू केली नाही ना तर मी संपूर्ण हॉस्पिटलमध्ये तमाशा करेल, आणि तुमच्या विरोधात पोलीसात तक्रार देखील.."
अभिजीतने आकांत तांडव केला म्हणून डॉक्टर ट्रीटमेंट करायला तयार झाले. डॉक्टरने ट्रीटमेंट सुरू केली.
आनंदीच्या डोक्याला जबर मार लागलेला होता, चार ते पाच तास ऑपरेशन चाललं. डॉक्टर ओटीतून बाहेर आले.
"डॉक्टर..डॉक्टर कशी आहे आता आनंदी."
"हे बघा ऑपरेशन सक्सेसफुल झालंय पण त्या अजून शुद्धीत नाहीयेत, त्यांना शुद्धीत यायला वेळ लागेल सो आता मी काही सांगू शकणार नाही. तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की त्या लवकर बरे होतील." असं बोलून डॉक्टर तिथून निघून गेले.
त्यानंतर मागेहुन नर्स आली अभिजीतने तिला पण विचारलं,
"सिस्टर कशी आहे माझी आनंदी?"
"हे बघा त्या होतील बऱ्या, तुम्ही प्लिज पॅनिक होऊ नका. त्या अजून शुद्धीत नाहीत, त्यांना शुद्ध यायला वेळ लागेल. सो बी केअरफुल." असं म्हणून ती तिथून निघून गेली.
काही वेळाने आनंदीला ओटीतून बाहेर आणून वार्ड रूम मध्ये शिफ्ट करण्यात आलं. तिथलं सगळं सेटअप झाल्यानंतर अभिजीत निशा आणि विक्रम तिघेही आत जायला निघाले.
"एक्सक्यूज मी हे बघा कुणाला एकाला आत जाता येईल. तिघांना एकत्र जाता येणार नाही."
"अभिजीतराव तुम्ही जा आधी." विक्रमने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
विक्रमने अभिजीतला आत पाठवलं, अभिजीत आत गेला. निशाच्या बेडच्या बाजूला ठेवलेल्या स्टूल वर बसला. तिच्याकडे बघून तो ढसाढसा रडायला लागला. तिची ती अवस्था त्याला बघवत नव्हती. त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
तिच्याकडे एकटक बघत होता.
तिच्याकडे एकटक बघत होता.
"आय एम सॉरी आनंदी, मी त्या दिवशी तुझ्याशी विचित्र वागलो, मला माफ कर. मला माहित आहे तुला खूप त्रास झाला पण यानंतर मी असं कधीच करणार नाही, मी दारूला हात देखील लावणार नाही. पण आनंदी प्लिज तू डोळे उघड ग, बोल माझ्याशी. तुझ्याविना सगळं अपूर्ण आहे ग, तू काही क्षण देखील माझ्याशी बोलली नाहीस तर मला कसतरी होतं, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग. उठ आनंदी बोल माझ्याशी." अभिजीत ढसाढसा रडायला लागला.
तितक्यात नर्स तिथे आली.
"इकडे असा आरडाओरडा करू नका. तुम्ही शांत व्हा आणि प्लिज आता बाहेर बसा, डॉक्टर आतमध्ये येत आहेत." असं बोलून नर्स बाहेर गेली.
विक्रमने दारातून सगळं ऐकलं, तो आत गेला आणि अभिजीतला बाहेर घेऊन आला.
"अभिजीतराव सावरा स्वतःला, अहो तुम्हीच असे खचलात तर निशाकडे कुणी बघायचं. आपल्या आयुष्यात आनंदी खूप उशिरा आली तरी आपल्याला इतका त्रास होत आहे.
निशाने तर तिला जन्म दिला तिच्या मनाची काय अवस्था असेल."
निशाने तर तिला जन्म दिला तिच्या मनाची काय अवस्था असेल."
अभिजीत विक्रमला बिलगुन जोरजोरात रडायला लागला.
"बाबा माझ्याच आयुष्यात असं का घडलं. माझ्या आनंदीसोबतच हे सगळं का झालं?"
निशाचं रडणं थांबतच नव्हतं. ती रडत रडत अनवाणी पायाने मंदिरात गेली. तिला चालता चालता खूप त्रास झाला, पायाला खडेगोटे लागले. तिच्या पायाला रक्त लागलेल होतं.
निशा दिसत नाही म्हणून विक्रम आणि अभिजीत दोघेही घाबरले,
"कुठे गेली असेल निशा? काही सांगून गेली नाही." विक्रमला आता तिची काळजी वाटू लागली होती.
विक्रम सगळ्यांना विचारू लागला. निशाची फोटो घेऊन तो सगळ्यांच्या जवळ जाऊन त्यांना ही तुम्हाला दिसली का? कुठे गेली? दिसली का? असं सगळं विचारू लागला.
दोघांनी हॉस्पिटलच्या आजूबाजूच्या परिसरात निशाला शोधलं. पण निशा कुठे सापडली नव्हती. बऱ्याच वेळानंतर निशा त्यांना येताना दिसली. दोघे धावत धावत निशा जवळ गेले. निशाच्या पायातून रक्त निघत होतं.
"निशा अग कुठे गेली होतीस?अग बोल ना कुठे गेली होतीस निशा?"
"बाबा आईच्या पायाला रक्त लागलं आहे, आपण तिला आधी हॉस्पिटलला घेऊन जाऊ, आत घेऊन जाऊ आधी त्यांना."
निशा कोणाशीच काही बोलली नव्हती, ती स्तब्ध उभी होती. विक्रम तिला आत घेऊन गेला, नर्सने ड्रेसिंग करून दिलं. तिला पुन्हा विचारलं,
"निशा तू कुठे गेली होतीस?" तेव्हा तिने सांगितलं
"मंदिरात गेले होते."
"अगं पण पायाला इतक काय लागलं?"
"पायात चप्पल नव्हती म्हणून."
"निशा तू वेडी आहेस का? अगं का करतेस असं? आनंदीच हे असं झालंय आता तुला काही झालं तर काय करायचं आम्ही दोघांनी? प्लिज तू असं काही वागू नकोस आमची काळजी अजून वाढवू नकोस." असं म्हणून त्याने निशाला जवळ केलं.
"माझी आनंदी.. माझी आनंदी.." असं म्हणून निशा रडायला लागली.
"अग होईल बरी, आनंदीला काही होणार नाही. डॉक्टर बोलले ना ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. मग शुद्धीवर येईल ती त्यांचं बोलणं सुरू असताना तिथे नर्स आली.
"शुद्धीतआली का माझी आनंदी? प्लिज सांगा ना कधी येईल?"
"हे बघा आता काही सांगता येणार नाही. डॉक्टर आता पुन्हा राऊंडवर येतात ते चेकअप करतील ते बोलतील तुमच्याशी काय आहे ते सांगतील?"
डॉक्टर राऊंड वर येऊन गेले, त्यांनी चेकअप केलं पण काहीच इम्प्रूमेंट दिसत नव्हती. आनंदी अजूनही शुद्धीत आलेली नव्हती. तब्बल दोन दिवस उलटून गेलेले होते पण आनंदीला अजूनही शुद्ध आलेली नव्हती. आता मात्र सगळ्यांना काळजी वाटायला लागली.
"डॉक्टर आपण दुसरं हॉस्पिटलला शिफ्ट करायचं का? आनंदीला शुद्ध का येत नाहीये?"
"हे बघा आपल्याला वाट पाहण्या खेरीज आपण काही करू शकत नाही, कारण ऑपरेशन व्यवस्थित झालंय तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेले तरी तिथे तुम्हाला वाट बघावी लागणारच आहे. आपल्या हातात आता वाट बघणे आणि देवाला प्रार्थना करणे आहे." असं म्हणून डॉक्टर तिथून निघून गेले.
तिसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर राऊंड वर आले त्यांनी आनंदीचे पूर्ण चेकअप केले, इम्प्रूमेंट काहीच नव्हती. त्यांनी बाहेर येऊन सगळ्यांना जे काय सांगितलं ते ऐकून सगळ्यांना धक्काच बसला.
क्रमशः
