आधीच्या भागात आपण पाहिले की,
विक्रमने अभिजीतला ऑफिस मध्ये जाणं सुरू करायला सांगितलं. अभिजीत तयार नव्हता पण विक्रमने त्याला समजावलं, ऑफिसला जाण योग्य आहे तरच तू या सगळ्यातून बाहेर पडशील, असं समजावलं. दुसऱ्या दिवशी अभिजीत ऑफिसला गेला, ऑफिसमध्ये सगळ्यांचे प्रश्न सुरू झाले. अभिजीत नर्व्हस झाला पण विक्रमने त्याला समजावलं आणि तो सगळ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार झाला.
आता पुढे,
अभिजीत केबिन मधून बाहेर आला, त्याला बघताच सगळ्यांची कुजबूज बंद झाली आणि सगळे एकमेकांकडे बघू लागले आणि खाली मान करून उभे राहिले.
"काय झालं तुम्ही असे सगळे खाली मान घालून का उभे आहात?" अभिजीत बोलला पण कोणीच काही बोललेलं नव्हतं.
"अरे मी तुमच्या सगळ्यांना विचारतोय काय झालं? काय झालं तुम्ही कोणी काही बोलणार आहात का?" तरीही सगळे गप्प होते.
"रिया तू तरी काही बोलणार आहेस की नाही."
"सर ते आनंदी... आनंदी बद्दल कळलं आणि आम्हाला.." ती बोलता बोलता थांबली.
"हो आनंदी सोबत जे काही घडलं ते खूप वाईट होतं पण आपल्याला परिस्थितीला धरून चालावच लागेल म्हणजे आता आनंदी आपल्या सोबत इथे कधी येईल की नाही येईल हेही सांगता येत नाही पण तुम्ही सगळे देवाकडे तिच्यासाठी प्रार्थना करा की लवकर आपल्या सोबत असेल रॅदर आपण अशी आशा करू."
सगळ्यांनी आनंदी साठी ब्लेसिंग केल्या आणि सगळे आपापल्या कामाला लागले. अभिजीत त्याच्या कामात गुंतला. दिवसभर ऑफिसमध्ये असायचा आणि त्यानंतर पूर्ण रात्र आनंदी जवळ बसायचा. रोज तिला नवीन नवीन गोष्टी सांगायचा. आनंदी त्याच्या समोर बसून ऐकत आहे अशाच अविर्भावात तो तिच्याशी बोलायचा. एका रात्री त्याला असं आनंदाशी बोलताना बघून विक्रम आणि निशा विचार करू लागले.
"निशा आपली मुलगी लकी आहे अभिजीत सारखा नवरा मिळाला तिला, पण अभिजीतच्या नशिबात काय काय लिहून ठेवलं कुणास ठाऊक. दोघांची साथ फक्त काही महिन्यांचीच होती. समोर काय लिहून ठेवल आहे त्याच्या नशिबात देव जाणे. हे देवा माझ्या आनंदीला लवकर बर कर आणि अभिजीतच्या आयुष्यात आनंद फुलू दे, अजून काही नको रे देवा मला. वाटलं तर आमच्या दोघांचे जीव गेले तरी चालतील पण त्या दोघांना आनंदात राहू दे."
"तुम्ही खरंच बोलताय आपली आनंदी खरंच लकी आहे पण बघा ना त्याला बिचाऱ्याला दुःख भोगाव लागतंय. त्याचा काय दोष आहे पण तो सगळ सहन करतोय ना फक्त तिच्यासाठी. दुसरा असता तर कधी सोडून निघून गेला असता पण अभिजीतने असं नाही केलं."
"चल आपण निघू आता."
दोघे तिथून निघाले, अभिजीत मात्र आनंदी सोबत गप्पा मारण्यात गुंग झाला होता. त्या रूम जवळून एक नर्स जात होती. तिचं लक्ष त्या रूम कडे गेलं. अभिजीतला असं गप्पा मारताना तिने बघितलं. तिला राहवलं नाही आणि ती आत गेली. तिला बघताच अभिजीत बोलता बोलता थांबला.
"सिस्टर तुम्ही बोला ना, काही चेकअप करायचं आहे तुम्हाला?"
"नाही नाही मला चेकअप नाही करायचं, तुम्हाला असं बोलताना बघितलं आणि राहवलं नाही म्हणून इथे आली. हेवा वाटतोय मला तुमचा."
"काय झालं सिस्टर?"
"इतक्या केसेस येतात ह्या हॉस्पिटलमध्ये, किती लोक क्रिटिकल असतात. एखादी केस कोमात जाते पण मी इतकं असं पेशंट जवळ बसून गप्पागोष्टी रंगलेल्या कधीच बघितल्या नाही. ह्या मॅडम लकी आहेत त्यांना तुमच्यासारखा नवरा मिळाला आहे. मी देवाजवळ नक्कीच प्रार्थना करेल की मॅडम लवकर बऱ्या होतील आणि तुम्ही त्यांना लवकर घरी घेऊन जावो आणि तुमचा प्रेमाचा संसार छान फुलून जाईल."
"थँक्यू सिस्टर थँक्यू सो मच."
नर्स तिथून निघून गेली,
"बघितलं सगळ्यांना आपली जोडी खूप आवडते. आपल्या दोघांमधलं प्रेम बघून सगळ्यांना जेलसी वाटते. पण तू तर अजून उठत नाहीस, उठ ना ग बोल माझ्याशी. मी एकटाच किती वेळ बोलणार. आता माझं डोकं दुखायला लागलंय तुझ्याशी बोलू बोलू, मी ना बोर होऊन जाईल पण तू उठणार नाहीस हो ना? माझा ऐकणार नाही आहेस का तू आनंदी. आता बघ मी तुझ्याशी बोलणं बंद करेल येशील माझ्या मागे मागे माझी मन धरणी करायला. मी शेवटचा सांगतोय आनंदी आता उठ नाहीतर मी इथून निघून जाईल. मग कधीच परत येणार नाही."
अभिजीत सगळं बोलायचा, प्रेमाने, रागाने ,कधी चिडून पण आनंदीच्या कानात काहीच शब्द जात नव्हते.
तो बोलून बोलून थकत असे पण दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच एनर्जीने तिच्याशी बोलायला लागायचा. असेच दिवस महिने सरत गेले.
एक दिवस अचानक अभिजीतच्या मोबाईलवर फोन आला,
बघितलं तर हॉस्पिटलमधून फोन होता. त्याने लगेच रिसिव्ह केला.
बघितलं तर हॉस्पिटलमधून फोन होता. त्याने लगेच रिसिव्ह केला.
"हॅलो."
"हॅलो मिस्टर अभिजीत."
"हॅलो मिस्टर अभिजीत."
"हो बोलतोय.."
"मी हॉस्पिटलमधून बोलतेय."
"मी हॉस्पिटलमधून बोलतेय."
"हा बोला मॅडम."
दोघांचं बोलणं झालं आणि अभिजीत त्याच्या खुर्चीवरून ताडकन उठला.
लगेच कॅबिनच्या बाहेर आला, गाडी काढली आणि निघाला.
दोघांचं बोलणं झालं आणि अभिजीत त्याच्या खुर्चीवरून ताडकन उठला.
लगेच कॅबिनच्या बाहेर आला, गाडी काढली आणि निघाला.
"सर इतक्या घाईत कुठे गेले असतील? आनंदीचं काही झालं असेल का? आनंदीला काही...नाही..नाही.." रिया बोलता बोलता थांबली.
अभिजीतने ड्राईव्ह करता करता विक्रमला फोन केला.
"हॅलो बाबा.. हॉस्पिटल मधून फोन आलेला होता. नर्सने काय सांगितले ते त्याने विक्रमला सांगितलं. बाबा मी हॉस्पिटलला निघालो आहे तुम्ही पण या." असं सांगून त्याने फोन ठेवला.
"निशा चल आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे."
"अहो पण काय झालं?"
"मी तुला वाटेत सगळं सांगतो, चला आधी हॉस्पिटलला जाऊ." दोघे हॉस्पिटलला जायला निघाले.
तिघेही सोबतच हॉस्पिटलला पोहोचले, आनंदीच्या रूम समोरच डॉक्टर उभे होते.
"डॉक्टर बोला ना तुम्ही अर्जंटली मला का बोलावलं?"
"रिलॅक्स मिस्टर अभिजीत, सांगतो आत चला."
अभिजीत पॅनिक झाला होता. निशा आणि विक्रमलाही जाणून घेण्याची उत्सुकता झालेली होती. डॉक्टरने त्या तिघांना आत नेलं.
आता जाऊन बघतात तर आतील दृश्य विलोभनीय होतं.
आनंदीने डोळे उघडले होते.
ती इकडे तिकडे बघत होती.
अभिजीत तिला बघून तिथेच थबकला. त्याचे डोळे अश्रूंनी भरून निघाले.
आनंदीने डोळे उघडले होते.
ती इकडे तिकडे बघत होती.
अभिजीत तिला बघून तिथेच थबकला. त्याचे डोळे अश्रूंनी भरून निघाले.
निशा आणि विक्रमचे पण हाल वेगळे नव्हते.
विक्रम आणि निशाने एकमेकांकडे बघितलं.
विक्रमने निशाच्या खांद्यावर हात ठेवला, निशाने तिच्या दोन्ही हातांनी विक्रमचा हात हातात घेतला. तिने तिची मान विक्रमच्या खांद्यावर टेकवली आणि रडायला लागली.
विक्रम आणि निशाने एकमेकांकडे बघितलं.
विक्रमने निशाच्या खांद्यावर हात ठेवला, निशाने तिच्या दोन्ही हातांनी विक्रमचा हात हातात घेतला. तिने तिची मान विक्रमच्या खांद्यावर टेकवली आणि रडायला लागली.
अभिजीत एक एक पाऊल हळूहळू टाकत आनंदीकडे जात होता जसजसं त्याच्यातलं आणि आनंदीतलं अंतर कमी होत होतं तशी त्याची धडधड वाढत होती. तो तिच्या बेडजवळ गेला, तिच्याकडे बघतच राहिला. डोळ्यातल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. रडतच तिच्या जवळ जाऊन बसला. तिचा हात हळूच हातात घेतला आणि खूप रडला.
आनंदीने तिचा दुसरा हात हळूच उचलून त्याच्या डोक्यावर ठेवला, अभिजीत अजून एकही शब्द बोललेला नव्हता तिचा स्पर्श होताच त्याने तिच्याकडे बघितलं.
"आनंदी.. माझी आनंदी.. किती महिन्यापासून मी या दिवसाची वाट बघत होतो ग. किती दिवस गेले, किती महिने केले आता आलीस तू. किती वाट बघायला लावलीस ग. मी तुला खूप त्रास दिला ना त्याची शिक्षा दिलीस ना तू मला, हो ना?"
आनंदीचे डोळे पाणावले, तिने फक्त नकारात्मक मान हलवली.
"मला सोडून जाणार होतीस ना? मला सोडून जाण्याचा विचार करत होतीस, असं कसं जाऊ दिलं असतं मी तुला. आता बघ तुला माझ्यापासून दूर ठेवणार नाही मी. तुला माझ्या नजरेतून बाहेर जाऊ देणार नाही. सदैव तुला माझ्या डोळ्यासमोरच ठेवेल आणि हो तुला बजावून सांगतो हं, मला न सांगता कुठेही जायचं नाही."असं म्हणून त्याने तिला मिठी केली.
क्रमशः
