Login

फुलले नाते प्रेमाचे❤️...भाग 21

Katha phulnarya premachi
फुलले नाते प्रेमाचे❤️...भाग 21
आधीच्या भागात आपण पाहिले की,

अभिजीतने ऑफिसमध्ये जाणं सुरू केलं, तो त्याच्या कामावर फोकस करू लागला. दिवसभर ऑफिस करत असे आणि रात्री आनंदी जवळ जाऊन बसत असे. असे बरेच महिने निघून गेले. एक दिवस दवाखान्यातून फोन आला आणि अभिजीत तसाच धावत धावत दवाखान्यात गेला. जाऊन बघतो तर काय आनंदी कोमातून बाहेर आलेली होती. निशा आणि विक्रमच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. अभिजीत आनंदीच्या जवळ जाऊन बसला. आनंदीशी बोलला बोलता तिला मिठी घातली.

आता पुढे,

काही वेळाने विक्रम आणि निशा दोघेही आत आले, आनंदीने त्या दोघांकडे बघितले, त्या दोघांनी आनंदीकडे बघितलं आणि तिघांना अश्रू अनावर झाले. निशा तर पुन्हा आनंदाने ढसाढसा रडायला लागली.

"निशा आता आनंदाचा क्षण आहे तरी तू रडतेस. काय ग दुःख असतं तरी रडत असतेस, आनंद असला तरी रडत असतेस." असं म्हणून विक्रमने तिला चिडवलं.

तसेच सगळे हसायला लागले. निशा आनंदीजवळ गेली,तिला प्रेमाने मुके घेऊ लागली. तिला मिठीत घेतलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवला, तिच्या गालावरून हात फिरवू लागली.

"आनंदी.. माझी आनंदी.. या दिवसाची किती आतुरतेने वाट बघत होते ग मी, मला वाटलं माझे डोळे बंद होतील आणि तरी माझी हसणारी,खेळणारी आनंदी मला दिसणार नाही."


"आई अहो काय बोलताय तुम्ही? असं काही अभद्र बोलू नका आता, आनंदी बरी आहे ना, आपल्या सगळ्यांमध्ये आहे तुम्ही बसा. मी डॉक्टरांना विचारून येतो. सुट्टी कधी देणार आहेत?" असं म्हणून अभिजीत बाहेर गेला.


तो डॉक्टरांशी बोलून आला, अजून दोन-तीन दिवस तरी ठेवावा लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं. आता आनंदी घरी येणार या विचाराने सगळं खूप खुश होते. आनंदी घरी येणार म्हणून अभिजीतने सगळं घर सजवून ठेवलेलं होतं. सगळं तिच्या आवडीचं केलेलं होतं,तिला रेड बलून आवडतात म्हणून त्याने डेकोरेट केलं होतं. तिला जसं आवडतं तसं व्यवस्थित करून ठेवलेलं होतं.

सुट्टीचा दिवस आला, अभिजीत विक्रम आणि निशा आनंदीला घरी घेऊन गेले. निशाने तिचं औक्षण करून तिला आत घेतलं. छान वातावरण बघून आनंदीला खूप प्रसन्न वाटलं होतं.

"थँक्यू आई बाबा थँक्यू अभिजीत. मला बरं वाटावं म्हणून किती सगळं काही काही केलं तुम्ही. आज खऱ्या अर्थाने बरं झाल्या सारख वाटतय मला."


"आनंदी बस बाळा इथे बस, मी तुला ना काहीतरी खायला घेऊन येते."

"आई मला आता काही नको."

"नाही बाळा थोडसं तरी खावं लागेल."

"आई फक्त सूप बनवून दे चालेल मला."

अभिजीत आनंदीला तिच्या खोलीत आराम करायला घेऊन गेला, आनंदी सूप प्यायली आणि ती झोपली. बाकीच्यांनी जेवण केले आणि सगळे आपापल्या खोलीत झोपायला गेले.

अभिजीत आनंदी जवळ जाऊन बसला. आनंदी झोपलेली होती, तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला बघू लागला.


"आनंदी किती गोड दिसतेस ना ग? आता तुला असं बघतच राहावसं वाटतं."त्याने तिच्या गालावरून हात फिरवलं, आनंदीने त्याचा हात हातात घेतला, त्याच्याकडे बघून हसली.

"झोप येत नाही का तुला?"

"तुला असंच बघत रहावस वाटतंय."

"अभिजीत तू खरच झोप थकला असशील."

थोड्यावेळाने अभिजीतही झोपला.


दुसऱ्या दिवशी अभिजीत बेडरूम मध्ये कॉफी घेऊन आला.

"गुड मॉर्निंग आनंदी." आनंदीला हाक दिली..

"गुड मॉर्निंग, कॉफी फोर यू." तिच्यासमोर कॉफीचा कप धरला.

"अरे तू का आणलं मी बनवली असती ना?"

"मॅडम आता काही दिवस तुम्हाला फक्त आराम आणि आरामच करायचा आहे, कुठल्याही कामाला हात लावायचा नाही. सगळं काम फक्त मीच करणार, ओके."

"मग काय मी फक्त बसूनच राहणार."

"हो तू फक्त आराम आणि आरामच करायचं आहे."

बोलता बोलता तिचं लक्ष कॅलेंडर कडे गेलं आणि तारीख बघून ती दचकली.

"काय ग काय झालं? असं काय बघतेस तिकडे?"


"अभिजीत कॅलेंडर वरची तारीख?"

"आजची तारीख आहे ती? काय झालं?"


"अभिजीत इतके महिने उलटून गेले."

"हो, इतके महिने मी तुझ्याशिवाय कसे काढले माझं मला माहिती आहे, एक एक क्षण एका एका वर्षा सारखा वाटत होता मला. रात्र रात्र झोप लागत नव्हती. दिवसही कसा तरी जायचा. तुझी इतकी सवय झालेली होती, तुझ्याशिवाय काहीच होत नव्हतं कुणाचं."

"अभिजीत माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला ना? आय एम सॉरी."

"अग तू का सॉरी बोलतेस? त्यात तुझी काय चूक, परिस्थिती तशी होती.आपल्या हातात काहीच नव्हतं पण आता मी खूप हॅप्पी हॅप्पी आहे कारण तू माझ्या जवळ आहेस आणि आता मला सोडून कुठे जायचं नाही. अशी छान हसत रहा, आनंदी अजून काही नको मला. बोलता बोलत कॉफी थंड झाली मी गरम करून आणतो,तू फ्रेश हो."

अभिजीतने कॉफी गरम करून आणली, तोवर ती फ्रेश झाली, दोघांनी मिळून कॉफी प्यायले.


"आनंदी काय खाणार आहेस?"

" आता मला काही नको."

"अगं नाही,आता थोडं काहीतरी करतो मग आपल्याला आई-बाबांकडे जायचं जेवायला."

"तुला ऑफिसला जायचं नाहीये?"

"काही दिवस मी ऑफिसला जाणार नाहीये."

"अरे का असं करतोस रे? मी बरी आहे. मी काय म्हणते आई बाबांना आपण इकडेच बोलून घेऊया ना काही दिवस म्हणजे आईला माझी सोबत होईल आणि मला आईची सोबत होईल."

"हो आपण बोलू पण आज त्यांनी आपल्याला जेवायला बोलावलंय, जाऊया आपण त्यांच्याकडे."

थोड्यावेळाने दारावरची बेल वाजली, अभिजीतने दार उघडला. बघतो तर काय समोर विक्रम आणि निशा उभा होते.

"आई बाबा तुम्ही? आम्ही तर आता तिकडे येणार होतो."

"हो पण आता आनंदीला अशा अवस्थेत बाहेर नेणं बरं नाही."

"निशा इथे स्वयंपाक करेल, इथेच छान चौघेही जेवू मग आम्ही निघून जाऊ."


" मला तसंही तुमच्याशी बोलायचं होतं.\"

"बोल."
"काही दिवस तुम्ही आमच्याकडे इकडे राहायला आलात तर नाही म्हणजे बघा तुमची काही हरकत नसेल तर? आनंदीला बरं वाटेल."


निशाने स्वयंपाक केला, चौघांनी जेवण केलं. त्यानंतर विक्रम आणि निशा हॉलमध्ये बसले, अभिजीत आनंदीला खोलीत आराम करायला घेऊन गेला.

"आनंदी आता तू आराम कर मी बाहेर बसतो."

"अभिजीत आता झोप येत नाहीये, बस ना थोडा वेळ माझ्याजवळ."

"नाही आता नको, तू आराम कर तुला आरामची गरज आहे. उगाच मी इथे बसला असेल तर आपलं बोलणं होईल."

"चांगल आहे ना आपण एकमेकांना वेळ देतोय, अभी मला तसही झोप येत नाही. तू मला पुस्तकातील कविता वाचून दाखव ना तू बोलला होता ना तुझ्याकडे कवितांचा मोठ पुस्तक आहे."

"ओके मी आणतो पुस्तक." असं म्हणत अभिजीत बाहेर गेला थोडावेळाने तो पुस्तक घेऊन आला आणि त्यानंतर तो कविता वाचायला बसलाय.

भान गवसले स्थिरले रुपावरी
शब्द फुटेनासे हरपले क्षितिजावरी
ओठांनी भिजले मन जणू काठावरी
भाळले वेडे कसे केव्हा कुणावरी
ते नयन बोलले काहीतरी...

                प्रेमकिरण उधडले भिडले मेघासही
                तेथून बरसले संचारले रोमांच तनुवरी
                काळीज धडकले विखुरले अन् भूवरी
                रंजनात रमले हरवले मग युगलातही
                ते नयन बोलले काहीतरी...

शरमेने झुकले नयन पाणावले किंचितही
हास्य बोलके निरागस अवतरले गालावरही
डोह भरले आनंदाचे अदभुत चैतन्य देहातही
बंधनात या अडकले स्वच्छंदी हे जीवही
ते नयन बोलले काहीतरी...

               क्षण हे फुलले झाले रेशमी सुगंधितही
               मन अन् जुळले तन अवचितही
               सप्तरंग झळकले चांगले आकाशी
               प्रेमहंस विहरले सुखात उमलले कमळही
               ते नयन बोलले काहीतरी...

                                       -Amol Gade