आधीच्या भागात आपण पाहिले की,
आनंदीला डिस्चार्ज मिळाला, अभिजीत तिला घरी घेऊन आला होता, घरी आली तेव्हा तिला खूप आनंद झाला, सगळं घर सजवलेलं होतं. आनंदीला खूप प्रसन्न वाटत होतं. विक्रम आणि निशाही तिथे आलेले होते.
दुसऱ्या दिवशी अभिजीत आनंदीसाठी कॉफी घेऊन आला, त्याने तिच्यासाठी कविता वाचली.
आता पुढे,
आता पुढे अजून एक ऐक.
सवय तुझी झाली इतकी,
दिवस माझा सरत नाही,
तुझा चेहेरा पहिल्या शिवाय,
शांत मला राहवत नाही.
गोंडस मऊ चेहेरा तुझा,
दिवस भर पाहत राहीन,
पानिदार सुंदर डोळे तुझे,
मन भिजेतोेवर त्याना पाहत राहीन.
रागीट-प्रेमळ स्वभाव तुझा,
आंबट-गोड लोणचेे जणू ,
आपल्या पुढील सुखं साठी,
पाया आपण मजबूत खानु.
पडलेला चेहेरा तुझा पाहून,
मन माझे अस्थिर होते,
प्रेमळ दोन हृदयाचे,
आपले हे प्रीतीचे नाते.
सुगंध तुझा प्रेमाचा,
विसरवतो मला सर्व काही,
तू समोर येताच माझा,
मला तुझा शिवाय दुसरे काही दिसत नाही.
पडव्याचा सना सारखा,
करू सगळे सन आपण साजरा,
प्रत्येक सणाला माझा अंतरा साठी,
घेऊन येईन मी मोगऱ्याचा गजरा.
देवा कडे मागणी करतो,
आपली जोडी अशीच कायम ठेव,
तुझा शिवाय मी जणू,
शेव-पुरी without शेव,
पोट भरलेले असले तरी,
तुझा हातचा दोन पोळ्या जास्त खाईन,
आणि तू जेवली नाहीस हे समजता मला,
मी देखील तसाच उपाशी राहीन.
तुझा हातांमध्ये,
प्रेमाची उब जशी मला जाणवते,
तुझा हात धरलेला सोडताना,
हा हात मी कसा सोडू या विचाराने माझे डोळे पाणवते.
विचार दोघांचा,हुबेहु जुळतोे,
इतका करतो आपण विचार सारखा,
दोघे एकत्र एकाच वाक्य बोलतो.
तुझा माझा बादल बोलू तितका कमी आहे,
तुझा शिवाय मी आंधळा,
आणि माझा शिवाय तू अपुरी,
अशी आपली गत आहे.
शब्द प्रेमाचे मांडता मांडता,
तुझा आठवणीत मी हरवून जातो,
माझांतल्या तुला शोधण्यासाठी,
आरसा समोर मे उभा राहतो.
तुझा उत्तरा साठी,
मी अता वाट पाहतो,
तू पण माझा साठी दोन ओळी लिहिशील,
याच धुंदीत मी कायम राहतो,
विश्वास आहे तुझावर,
तू नक्की लिहिशील मला,
प्रेमात दोन ओळी लिहून तर बघ,
सगळं जग त्या दोन ओळीत दिसेल तुला.
शब्दांची ह्या मैफिलीत इथेच मी रोकतो,
वर लिहिलेल्या प्रत्येक शब्दात,
फक्त आणि फक्त तुलाच मी बघतो,
तुलाच मी बघतो...
दिवस माझा सरत नाही,
तुझा चेहेरा पहिल्या शिवाय,
शांत मला राहवत नाही.
गोंडस मऊ चेहेरा तुझा,
दिवस भर पाहत राहीन,
पानिदार सुंदर डोळे तुझे,
मन भिजेतोेवर त्याना पाहत राहीन.
रागीट-प्रेमळ स्वभाव तुझा,
आंबट-गोड लोणचेे जणू ,
आपल्या पुढील सुखं साठी,
पाया आपण मजबूत खानु.
पडलेला चेहेरा तुझा पाहून,
मन माझे अस्थिर होते,
प्रेमळ दोन हृदयाचे,
आपले हे प्रीतीचे नाते.
सुगंध तुझा प्रेमाचा,
विसरवतो मला सर्व काही,
तू समोर येताच माझा,
मला तुझा शिवाय दुसरे काही दिसत नाही.
पडव्याचा सना सारखा,
करू सगळे सन आपण साजरा,
प्रत्येक सणाला माझा अंतरा साठी,
घेऊन येईन मी मोगऱ्याचा गजरा.
देवा कडे मागणी करतो,
आपली जोडी अशीच कायम ठेव,
तुझा शिवाय मी जणू,
शेव-पुरी without शेव,
पोट भरलेले असले तरी,
तुझा हातचा दोन पोळ्या जास्त खाईन,
आणि तू जेवली नाहीस हे समजता मला,
मी देखील तसाच उपाशी राहीन.
तुझा हातांमध्ये,
प्रेमाची उब जशी मला जाणवते,
तुझा हात धरलेला सोडताना,
हा हात मी कसा सोडू या विचाराने माझे डोळे पाणवते.
विचार दोघांचा,हुबेहु जुळतोे,
इतका करतो आपण विचार सारखा,
दोघे एकत्र एकाच वाक्य बोलतो.
तुझा माझा बादल बोलू तितका कमी आहे,
तुझा शिवाय मी आंधळा,
आणि माझा शिवाय तू अपुरी,
अशी आपली गत आहे.
शब्द प्रेमाचे मांडता मांडता,
तुझा आठवणीत मी हरवून जातो,
माझांतल्या तुला शोधण्यासाठी,
आरसा समोर मे उभा राहतो.
तुझा उत्तरा साठी,
मी अता वाट पाहतो,
तू पण माझा साठी दोन ओळी लिहिशील,
याच धुंदीत मी कायम राहतो,
विश्वास आहे तुझावर,
तू नक्की लिहिशील मला,
प्रेमात दोन ओळी लिहून तर बघ,
सगळं जग त्या दोन ओळीत दिसेल तुला.
शब्दांची ह्या मैफिलीत इथेच मी रोकतो,
वर लिहिलेल्या प्रत्येक शब्दात,
फक्त आणि फक्त तुलाच मी बघतो,
तुलाच मी बघतो...
"आनंदी आता पुरे तुला आरामाची गरज आहे, आता कवितांचं पुस्तक बंद,ओके. आता तू आराम कर मी आहेच हॉलमध्ये. मला थोडं काम आहे लॅपटॉपवर काम करतो आणि हो काही लागलं तर मला सांग." अभिजीत तिथून गेला.
आनंदी ही आराम करायला बेडवर लेटली, आनंदीचे मनातल्या मनात विचार सुरू झाले,
"इतके महिने अभिजीत माझ्याशिवाय कसा राहिला असेल? हे भगवान काय घडलं माझ्यासोबत, माझा अभिजीत त्याला मला अजिबात दुखावण्याची इच्छा नाही त्याला तू दुखवलस. सगळे इतके दिवस माझ्याशिवाय कसे राहिले असतील? आईची तर हालत किती खराब झाली असेल, रडू रडू हाल केले असतील तिने." असे अनेक विचार तिच्या मनात येऊ लागले.
काही वेळाने तिने अभिजीतला हाक दिली,
"गेलेत का आई बाबा?"
"नाही आहेत, मी आई बाबांना बोललो की तुम्ही काहीदिवस आमच्याकडे रहा, तयार झालेत. बाबा काही सामान आणायला घरी गेलेत, आई आहेत." तो थोड्यावेळमध्ये बाहेर गेला आणि निशा आली.
"आनंदी बाळा कशी आहेस तू ?"
"आई मी बरी आहे, पण आता हे मला तुला विचारायला हवं ग आई तू कशी आहेस?"
"मला काय झालं मी बरीच आहे ,मला काय धाड भरली आहे, मस्त बसले तुझ्या समोर आहे."
"तू वरून कितीही आनंदी असल्याचा दाखवत असली ना तरी आतून तुझी अवस्था मला कळू शकते."
"माझं काय घेऊन बसलीस ग, आता खरी आरामाची गरज तुला आहे, मी बरी आहे."
"मला माहित आहे, इतके दिवस तू माझ्याशिवाय कसे काढले ते, रडू रडू हाल केलेस ना चेहऱ्यावर दिसतय तुझ्या. कशी आहेस ग खरोखर सांग."
"मी बरी आहे ग बाळा."
दोघींचं बोलणं सुरू होतं की शेजारच्या काकू येऊन बसल्या.
"काय ग आनंदी कशी आहेस तू?"
"काकू मी बरी आहे."
"काय काय लिहून ठेवलेलं असतं कोणाच्या नशिबात कुणास ठाऊक, बिचारा अभिजीत किती सहन केलं त्याने. किती काळजी घेतली तुझी हे लक्षात ठेव, आनंदी तू खूप नशीबवान आहेस की अभिजीत सारखा नवरा तुला मिळाला."
"हो, मला त्याचा अभिमान आहे."
शेजारच्या काकूच्या गप्पा झाल्या आणि त्या निघून गेल्या. काही वेळाने आनंदीच्या मोबाईलवर फोन आला. तिने बघितलं पण तिच्या लक्षात काहीच आलेल नव्हता. तिने फोन उचलला.
"हॅलो. "
"हॅलो आनंदी, अग रिया बोलते."
"रिया.." आनंदीच्या लक्षात येत नव्हतं.
"आनंदी मी आठवत नाहीये का तुला, अग ऑफिसमध्ये आपण सोबत आहोत."
"ओ सॉरी सॉरी, अग मला लक्षात यायला उशीर लागला."
"इट्स ओके आनंदी, कशी आहेस तू?"
"मी बरी आहे."
"आता आराम करतेस?"
"नाही ग आई सोबत थोडे बसले होते."
"ओके म्हणजे तू आराम करत नाहीस."
"तू बोल ना."
"मी येऊ का तुझ्याकडे?"
"तुला ऑफिस असेल ना तुला आणि ऑफिसचं काम सोडून इकडे येणार आहेस का तू? उगाच अभिजीत बोलेल तुला."
रियाने फोन ठेवला आणि दोन मिनिटात ती दारात आली, अभिजीतने दार उघडला, रियाला बघून तो आश्चर्यचकित झाला.
"रिया तू इथे?"
"हो मी आनंदीला भेटायला आले."
"अगं पण रिया ऑफिस.."
"सर प्लिज मी ऑफिसचं काम उद्या करेल, पण मला ना आता आनंदीला बघायचं होतं, तिच्याशी बोलायचं होतं म्हणून मी आली."
अभिजीत समोर काही बोलणार रिया आत निघून गेली.
"कशी आहेस आनंदी?"
"अग रिया तू तू इकडे कशी? आता तर ऑफिसमध्ये होतीस ना?"
"नाही मी इथेच होते, तुला बाहेरून फोन केला होता."
"काय? तू पण ना. अभिजीत ओरडला का?"
"थोडं, ठीक आहे मी उद्या ओव्हर टाईम करून घेईल, मला त्यांच्या ओरडण्याचा टेन्शन नाहीये. मला तुला भेटायचं होतं तुला बघायचं होतं म्हणून मी इकडे आले." असं म्हणून रिया तिच्या बाजूला जाऊन बसली. तिला अगदी गळा भेटच केली.
तिला असं बघून आनंदी पण खुश झाली.
"थँक्स यू रिया, तू मला भेटायला आली, रिया आपली काही दिवसांचीच भेट आणि तरी तू."
"आनंदी तुला नाही माहिती माझ्यासाठी तू किती महत्त्वाची आहेस, आयुष्यात फक्त मला एकच मैत्रीण मिळाली आणि ती तू आहेस, मला दुसरी कुणीही मैत्रीण नाहीये, माझी एकच मैत्रीण आहेस तू, लहानपणापासून कधीच कोणी मैत्रिणी झाल्या नाही." बोलता बोलता रियाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले.
"रिया घरी काही झालं नाही ना?"
"काही नाही माझ असंच सुरू असतं. इथे मी तुला भेटायला आली आणि हे काय बोलायला लागली. तुझ्यासाठी काही आणलं?"
"काय आहे?"
"उघडून बघ."
"उघडून बघ."
आनंदीने उघडून बघितले तर एक छोटासा नेकलेस होता.
"अरे वा किती सुंदर पेंडंट आहे, तू माझ्यासाठी.?"
"नाही स्वतःसाठी.." असं म्हणून दोघी हसल्या.
"आनंदी तू घालून बघ ना, कसा दिसतोय?"
आनंदीने गळ्याला लावून बघितला. छान दिसत होता.
या दोघींच्या गप्पा सुरू होत्या आणि निशाने सगळ्यांना चहा दिला, गप्पा मारल्या आणि रिया निघून गेली.
निशापण हॉलमध्ये बसली.
आनंदीने पण आराम केला.
असेच दिवस सरत गेले, आनंदी नॉर्मल व्हायला लागली. चाला-फिरायला लागली. आता थोडं थोडं कामही करायला लागली. अभिजीत तिला जास्त काम करू देत नव्हता. छोटी छोटी स्वतःची कामे करायला लागली होती.
असेच दिवस सरत गेले, आनंदी नॉर्मल व्हायला लागली. चाला-फिरायला लागली. आता थोडं थोडं कामही करायला लागली. अभिजीत तिला जास्त काम करू देत नव्हता. छोटी छोटी स्वतःची कामे करायला लागली होती.
"जास्त काम करत जाऊ नकोस आनंदी."
"अभिजीत बसून बसून कंटाळा येतो रे. थोडंसं तरी काम करू देतजा, अभिजीतचं न ऐकता आनंदी कामे करायची. अभिजीत रागवायचा, पण त्याच्या रागवण्यातही त्याची काळजी आणि प्रेम असायचं.
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा