फुलले नाते प्रेमाचे❤️...भाग 23
आधीच्या भागात आपण बघितले की,
आधीच्या भागात आपण बघितले की,
आनंदीला भेटायला शेजारच्या काकू आल्या. त्यांच्या गप्पा गोष्टी झाल्या, त्यानंतर काही वेळाने रिया भेटायला आली,ती बसली तिच्या गप्पा झाल्या त्यानंतर ती निघून गेली. निशा ही हॉलमध्ये जाऊन बसली. आनंदीने आराम केला.
आता पुढे,
बघता बघता दिवस सरत गेले, अभिराज आणि आनंदीचं प्रेम खुलत गेलं. दोघांच्या प्रेमाच्या वेलीवर आता अंकुर फुलायला लागलं.
आनंदीला दिवस गेले, या गोड बातमीने सगळ्यांच्या जीवनात आनंद आला. सगळे खूप आनंदात होते. आता अभिजीत आनंदीची जास्त काळजी घ्यायला लागला. निशा ही दिवसभर तिच्याजवळ असायची. आता काही कमी जास्त व्हायला नको म्हणून सगळे तिची खूप काळजी घ्यायला लागले.
"आनंदी आज आपल्याला चेकअपला जायचंय."
"अभिजीत उद्या गेले तर नाही का चालणार? आज बरं वाटत नाहीये."
"नाही ग आजच जाऊया आपण, आज अपॉयमेंट घेतली आहे मी आणि तुला आता बरं वाटत नसेल तर संध्याकाळी जाऊया मी डॉक्टरशी बोलतो तसं. मी ऑफिसला जाऊन येतो तू काळजी घे स्वतःची आणि आज बाबाही नाही आहेत ते बँकेच्या कामांसाठी बाहेर जाणार आहेत, तर आई एकटीच असतील. तू स्वतःची काळजी घे आणि आईची सुद्धा काळजी घे."
"हो ठीक आहे."
अभिजीत ऑफिसला निघून गेला.
ऑफिसमधील काम आवरून तो निघतच होता की हरिकाक आत आले.
त्यांना निघताना बघून त्यांचे प्रश्न सुरु झाले.
ऑफिसमधील काम आवरून तो निघतच होता की हरिकाक आत आले.
त्यांना निघताना बघून त्यांचे प्रश्न सुरु झाले.
"साहेब तुम्ही आज लवकर घरी जात आहात,सर्व ठीक आहे ना? घरीच जात आहात की आणखी कुठे?"
"हरिकाका तुमचे प्रश्न झाले असतील तर मी निघू? आणि हो मी घरीच चाललोय. उगाच बाहेर जाऊन राईच पर्वत करू नका. पचका करू नका. आनंदीला रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे म्हणून मी लवकर जातोय. आणखी काही विचारायचं आहे का तुम्हाला की मी जाऊ?"
"माफ करा साहेब."
अभिजीत ऑफिस मधून निघाला, तो पोहोचेस्तोवर आनंदी तयार झालेली होती.
"हाय डिअर,तयार झाली?"
"ओके मी पटकन रेडी होऊन येतो. मग आपण निघुया."
"तोवर मी चहा टाकते तुमच्यासाठी."
आनंदी किचनमध्ये गेली, तिने चहा बनवला. अभिजीतला बेडरूममध्ये नेऊन दिलं आणि निशाच्या खोलीत गेली.
निशा झोपलेली दिसली.
"आई अग उठ, चहा आणलाय."
आनंदीने दोन तीनदा हाक दिली पण निशा उठलीच नव्हती.
आनंदीने दोन तीनदा हाक दिली पण निशा उठलीच नव्हती.
तिने हलवून उठवण्यासाठी तिला हात लावला बघते तर काय निशा तापाने फणफणत होती.
"बापरे,आईला तर ताप आहे, अभीला सांगते."
"अभी आईला ताप भरलाय, आता काय करायचं? आईला असं एकट टाकून जाता येणार नाही."
"इट्स ओके, आपण त्यांना सोबत घेऊन जाऊ, त्यांनाही डॉक्टरांकडे दाखवून देऊ, आणि तुझंही काम करू."
"ओके. मी आईला उठवते."
आनंदीने निशाला फ्रेश व्हायला सांगितले.
आनंदीने निशाला फ्रेश व्हायला सांगितले.
तिघेही हॉस्पिटलला जायला निघाले.
वाटेत आनंदीला काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झाली,
वाटेत आनंदीला काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झाली,
"अभी मला काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होत आहे."
"हो, आधी आपण हॉस्पिटलला जाऊया, त्यानंतर येताना खाऊया."
तिघेही हॉस्पिटलला पोहोचले, आधी निशाला डॉक्टरांकडे दाखवल.
तिला काही मेडिसिन लिहून दिले,
तिला काही मेडिसिन लिहून दिले,
त्यानंतर आनंदीला डॉक्टरकडे घेऊन गेले.
आज आनंदीची पहिली सोनोग्राफी होती, आनंदी खूप आनंदात होती. डॉक्टर आनंदीला सोनोग्राफीसाठी आत घेऊन गेले आणि ती पहिल्यांदा बाळाला बघणार म्हणुन आनंदी खूप आनंदात होती.
सोनोग्राफी झाली, नंतर डॉक्टरने आनंदी आणि अभिजीतला डबल गुड न्यूज सांगितली.
आनंदीला दोन जुळे होते, दोघांना आता डबल आनंद झाला. हे ऐकून निशालाही खूप आनंद झाला.
दोघांनी येताना वाटेत तिच्या आवडीच्या डेझर्ट खाल्लं.
त्यानंतर तिघेही घरी आले, ते तिघे घरी येईपर्यंत बाबाही घरी आलेले होते.
"बाबा..."
अभिजीत आवाज द्यायला लागला.
अभिजीत आवाज द्यायला लागला.
"बाबा लवकर हॉलमध्ये या."
विक्रम बाहेर आला.
विक्रम बाहेर आला.
"का रे काय झालं?"
"आनंदी तू सांगणार आहेस की मी सांगू?"
"सांगा तुम्ही."
"बाबा..बाबा डबल गुड न्यूज आहे, आनंदीला जुळे बाळ आहेत."
"काय? अरे वा. हे तर मस्तच झालंय."
आज घरात आनंदोत्सव होता, निशाने सगळं आनंदीच्या आवडीचं बनवलं. चला तुम्ही दोघे फ्रेश व्हा मी पटकन जेवायला वाढते. सगळे जेवायला बसले.
सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता, इतक्या दिवसांनी इतके आनंदाचे दिवस आले होते.
दुसऱ्या दिवशी अभिजीतने छोट्या बाळाचे फोटो आणला. तो फोटो बघून आनंदीला खूप आनंद झाला. तिने तो फोटो बेडरूममध्ये लावला. येता-जाता ती त्या फोटोकडे बघत असे.
ऑफिस मध्ये गेल्यानंतर सगळ्यांनी अभिजीतला अभिनंदन केलं, अभिजीतने सगळ्यांना सांगितले की आनंदीला जुळे बाळ होणार आहेत.
संध्याकाळी ऑफिस वरून जाताना अभिजीतने खूप सारे खेळणे घेतले, ते घेऊन तो घरी गेला.
"आनंदी बघ मी काय आणलंय?"
आनंदी बाहेर आली.
आनंदी बाहेर आली.
"अहो हे सगळं काय आहे?"
"खेळणे.."
"ते दिसतंय, पण आता हे सगळं का? बाळ यायला वेळ आहे अजून."
"खेळणे.."
"ते दिसतंय, पण आता हे सगळं का? बाळ यायला वेळ आहे अजून."
"असू दे, मला ना बाळासाठी जे जे करता येईल ते ते सगळं करायचं आहे. आणि आता तर दोन-दोन बाळ येणार आहेत ना."
आनंदी हसली आणि तिने सगळे आत ठेवले.
आनंदी हसली आणि तिने सगळे आत ठेवले.
"काय ग का हसतेस?"
"अग अभीने खूप खेळणे आणले. तेच बोलणं सुरू होतं."
"अच्छा,हो का."
"अच्छा,हो का."
"दोन्ही जुळे बाळ नशीबवान म्हणायचे, आतापासूनचं न मागता सगळं मिळतंय."
"हो ग आई, खरं आहे."
"चांगलं आहे, मी तुला जास्त काही देऊ शकली नाही, तुझ्या बाळांना तरी सगळं मिळू दे. मी तुला हवं तसं बालपण देऊ शकली नाही." निशा बोलता बोलता भावुक झाली.
"चांगलं आहे, मी तुला जास्त काही देऊ शकली नाही, तुझ्या बाळांना तरी सगळं मिळू दे. मी तुला हवं तसं बालपण देऊ शकली नाही." निशा बोलता बोलता भावुक झाली.
"आई प्लिज असं का बोलते. तू माझ्यासाठी खूप काही केलंय, आणि तू माझी बेस्ट आई आहेस." दोघींनी एकमेकींना जवळ घेतलं.
हळूहळू दिवस समोर गेले. आता हळूहळू आनंदीचं पोट वाढायला लागलं. तिला थोडा थोडा त्रास व्ह्यायचा. आनंदीला उलटीचा त्रास सुरू झाला, काही खाल्लं की तिला उलट्या व्ह्यायच्या. डॉक्टरने तिला बेडरेस्ट सांगितलं.
तिला मळमळ वाटत असे, छातीत जळजळ होत असे.
"आनंदी मी तुझ्यासाठी चार्ट बनवून घेतलाय, यानुसारच तुझी दिनचर्या असणार आहे. तुझ्या जेवणाच्या वेळा, तुझ्या नाश्ताच्या वेळा सगळं नमूद केलेलं आहे आणि हो तुला बेडरेस्ट जरी असेल तरी थोडा योगासन वगैरे करायचं आहे."
आनंदीने चार्ट बघितला.
"बापरे काय आहे हे?"
"आनंदी डॉक्टरकडून सगळं करून घेतलंय मी, सो डोन्ट वरी."
"ओके."
"बघा बाळांनो, तुमच्या बाबांना आता माझ्यापेक्षा तुमचीच जास्त काळजी आहे बर का. तुम्हाला काही त्रास होऊ नये म्हणून सगळा खटाटोप सुरू आहे." आनंदी चिडवण्याच्या स्वरात बोलली.
"काहीही ह आनंदी, असं काही नाही आणि हे तुलाही माहीत आहे."
"माहीत आहे मला तू सगळ्यात जास्त माझ्यावर प्रेम करतोस, पण आता काय बाबा माझं प्रेम तर वाटलं जाणार."
"आनंदी तू पुन्हा तेच बोलते आहेस "
"सॉरी सॉरी, तुझा मूड खराब करायचा नाही मला. आय लव यू अभी.."
"लव यू टू आनंदी."
आता आनंदीचं सगळं चार्टप्रमाणेच चालायचं, त्यात कुठलाही बदल अभीला आवडायचा नाही. त्याने तशी ताकीदच दिलेली होती.
रोज वेळेवर तिचा नाश्ता, दूध, फळं, जेवण सगळं व्हायचं, निशा तिला सगळं करून द्यायची.
एक दिवस अचानक निशाची तब्बेत बिघडली. दोन दिवस ती हॉस्पिटलमध्ये होती. आनंदीला काही करायला जमायचं नाही, त्यावेळी मात्र अभिजीत आणि विक्रमने सगळं सांभाळून घेतलं होतं.
त्यांना कामाला बाई हवी होती, पण एरिया दूर आहे म्हणून कुणी यायला तयार नव्हतं. आतापर्यंत निशा सगळं सांभाळायची पण आता तिलाच बरं नसल्यामुळे आता सगळं कसं होणार म्हणून सगळे काळजीत होते.
आनंदीला पण खूप टेन्शन आलेलं होतं पण अभीने सांगितलं सगळं व्यवस्थित होईल तू उगाच काळजी करू नको.
आनंदीला पण खूप टेन्शन आलेलं होतं पण अभीने सांगितलं सगळं व्यवस्थित होईल तू उगाच काळजी करू नको.
क्रमशः
