Login

फुलले नाते प्रेमाचे❤️...भाग 24

Katha phulnarya premachi

फुलले नाते प्रेमाचे❤️...भाग 24


आधीच्या भागात आपण पाहिले की,


अभिजीतने आनंदीसाठी चार्ट बनवलेला होता. सगळं त्या चार्ट प्रमाणे होत असे. निशा तिला सगळं बनवून देत असे. पण एक दिवस अचानक निशाची तब्येत बिघडली. आनंदी आणि अभिजीत कामासाठी बाई शोधत होते. पण कामाला बाई मिळत नव्हती, आनंदीला या सगळ्याचा खूप टेन्शन आलं होतं.

आता पुढे,

"अभिजीत कसं व्हायचं आता? आईला पण बरं नाही, मला पण सगळी कामे जमणार नाहीत. कसं करायच आता?"

"आनंदी तू काळजी करू नको. होईल सर्व ठीक. तू उगाच टेन्शन घेऊ नको."

"आनंदी आपल्या घराकडे एक कामवाली बाई आहे, मी तिला विचारून बघतो. आली तर ठीकच आहे नाहीतर दुसरी शोधावी लागेल." विक्रम आनंदीकडे बघत म्हणाला.


"बघ बाबांनी सोल्व केला की नाही प्रॉब्लेम. तू उगाच काळजी करते आनंदी." अभिजीत तिच्याकडे बघून बोलला.

"बाबा तुम्ही थोडावेळ आईजवळ जाऊन बसा, मी आई साठी काही खायला बनवते."आनंदी

"आनंदी तू काही बनवू नको, मी बनवतो. तू पण आत जाऊन आराम कर, उगाच तुला दगदग नको." अभिजीत

अभिजीत किचनमध्ये गेला, विक्रम निशाजवळ जाऊन बसला. आनंदी तिच्या खोलीत आराम करायला गेली.

अभिजीतने सूप बनवलं आणि तो निशाच्या खोलीत गेला.

"बाबा, आईसाठी सूप बनवलंय."
"हो ठेव, तिकडे टेबलवर. उठली की मी देतो तिला."

अभिजीतने सुपचं बाऊल ठेवलं आणि तो आनंदीकडे गेला.

"आनंदी तू काही खाणार आहेस का? तुझ्यासाठी काही आणू का?"

"नाही नको आता नको."

हळूहळू निशाची तब्येत सुधारायला लागली. आनंदीचं ही सगळं चार्ट प्रमाणे चाललेलं होतं.

बघता बघता सहा महिने पूर्ण झाले, आनंदीला सातवा महिना लागला. सातव्या महिन्याच्या डोहाळे जेवण करण्याची तयारी सुरू झाली.

आनंदी साठी हिरव्या कलरचा वन पीस खरेदी करण्यात आला.

"आनंदी तुझा ड्रेस झालाय. त्याच्यावरच्या बांगड्या झाल्या. तुला काही सामान लागणार असेल तर मला सांग मी जाऊन घेऊन येतो."

"मला आता काही नको."

"अच्छा ठीक आहे."

"मी काय म्हणतोय उद्या आपल्याला दवाखान्यात जायचं आहे, एकदा सोनोग्राफी करूया म्हणजे मग सगळं ओके आणि हो कार्यक्रमाला आता अवधी आहे तर तू तेवढे दिवस नीट आराम कर. प्रोग्रामच्या दिवशी तुला दगदग होईल."


एक-दोन दिवसांनी अभिजीत आणि आनंदी दवाखान्यात गेले, आज आनंदीची सोनोग्राफी होती. आनंदी आणि अभिजीत दोघांनीही बाळाची हालचाल बघितली आणि बाळाला बघितलं. डॉक्टरांनी सांगितलं की सर्व ठीक आहे. दोघे खूप आनंदात होते.

कार्यक्रमाची सगळी तयारी सुरू होती. कार्यक्रमाचा दिवस उजाडला. आनंदीने सकाळी उठून आंघोळ करून पूजा केली.

"आई खूप दिवसानंतर मला छान प्रसन्न वाटतंय ग."

"हो ना पूजा केलीस ना म्हणून. रोज पूजा करत जा, पूजा केल्याने मन प्रसन्न वाटतं."

"हो ग आई खरच आहे, रोज पूजा तूच करतेस त्यामुळे मला सवयीच नाही राहिली पूजा करायची. पण आता करत जाईल, खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय."


"अच्छा आता आवरायला घे, कारण पाहुणे दुपारी लवकर येणार आहेत, आपण कार्यक्रम लवकर लवकर संपवूया. बाहेरचं सगळं काम अभिजीत बघतोय, त्याने बाहेरची सगळी तयारी करून ठेवलेली आहे.

"आई डोहाळे जेवणाबद्दल थोडी माहिती सांग ना."

निशा हसली,
"बस सोफ्यावर."

दोघीही बसल्या.


"हे बघ, डोहाळे जेवणासाठी हिरवी साडी, त्यावर हिरव्या बांगड्या. नंतर अंगावर हलव्याचे दागिने घातले जातात."


"पण आई मी तर ड्रेस घेतलाय."

"मग साडी घ्यायला हवी होती. साडीवर बाईचं सौंदर्य आणखीनच खुलतं, बर घेतला ना ड्रेस मग आता त्यावरच नटायचं. काही हरकत नाही तशीही या दिवसात तू जास्तच गोड दिसतेय.
आता पुढे ऐक.

फुलांची वाडी, पाच फळे आणि ओटी हे लागतं, तसेच फराळ, पंचपक्वान्न इतर खावेसे वाटणारे पदार्थ यांच एक ताट तयार करावं लागतं, त्यात पाच वाट्यांमध्ये प्रत्येकी एका वाटीत एक याप्रमाणे पेढा, बर्फी, जलेबी, गुलाबजाम इत्यादी ठेवुन त्यावर पुरी झाकुन ठेवतात आणि ते उघडायला लावतात. म्हणजे बघ तू पहिल्यांदा ज्या वाटीवरची पुरी उचलशील त्यावरून ठरेल तुला मुलगा होणार की मुलगी."

हे ऐकून आनंदी जोरजोरात हसायला लागली.

"हसायला काय झालं आनंदी?"

"अग आई त्यावरून सगळं कसं कळणार?"

"तू हसण्यावारी नेऊ नको, कळेल तुला सगळं हळूहळू. पुढे ऐक


हा कार्यक्रम संध्याकाळी व सुर्यास्ताच्या आधी करतात.
जिचे डोहाळजेवण आहे तिला हिरव्या रंगाची साडी किंवा ड्रेस किंवा ब्लाऊजपीस भेट म्हणून देतात, हल्ली इतरही भेटवस्तू दिल्या जातात. जसं गर्भसंस्कार पुस्तके, कुणी बाळाची फोटो देतं, बाळासाठी आवश्यक वस्तू,आईसाठी आवश्यक वस्तू इ.

प्रकारच्या फळांनी ओटी भरतात. फक्त सासूबाईंनी ओटी भरायची, इतर स्त्रियांनी पाच फळे हाती लावणे."

"पण आई मग माझी ओटी कोण भरणार?"

"काळजी करू नको ग, होईल सर्व व्यवस्थित. आता ऐक पुढे

जेवणासाठी पंचपक्वान्ने तयार केली जातात, जीचं डोहाळजेवण आहे तिच्या आवडीची करतात ह. यात गंमत म्हणून एक स्त्रिलिन्गी व एक पुल्लिन्गी पक्वान्न असतात. उदा. खीर व लाडू. अशा २ पदार्थांवर पुरी झाकून तिला एक पसंत करावयास सांगणे व त्यानुसार मुलगा, मुलगी हे ठरवतात."

आनंदी पुन्हा हसली.
"हे खूप मजेशीर आहे ह."
"अंडी पुरे आता."

फुलांची किंवा चांदण्याची वाडी भरणे या गोष्टी ऐच्छिक व प्रत्येक घराण्याप्रमाणे वेगळ्या असू शकतात.

हौस असेल तर चांदण्यातले, बोटीतले, बागेतले, कोवळ्या उन्हातले असे वेगवेगळे डोहाळेजेवण पण करतात. कळलं जा,आता तयारीला लाग, मी पण माझं आवरते.

दुपार झाली, संपूर्ण तयारी झालेली होती, आता फक्त बायका येण्याची वाट बघायची होती.
चौघेही रेडी झाले.

"आनंदी थोडं खाऊन घे, रात्रीपर्यंत काही खायला मिळणार नाही तुला."

तिचं आवरलं.
हळूहळू बाया जमायला लागल्या.

कार्यक्रमाला सुरुवात झाली,
सजवलेल्या झुल्यावर आनंदीला बसवलं. तिला हळदकुंकू लावून तिचं औक्षण केलं त्यानंतर तिची ओटी भरण्यात आली. आता बाजूला अभिजीतला पण बसायला सांगितलं.
त्याचं पण औक्षण केलं.
त्यानंतर आनंदीने उखाणा घेतला.

"तुम्हा सर्वांचे प्रेम पाहून
डोळे माझे पाणावले
अभिजीत रावांचं नाव गोड,
पुरवा माझे डोहाळे."

सगळ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या.
आणि गाणे म्हणायला सुरुवात झाली.

"डोहाळे पुरवा,
मैत्रिणींनो झोपाळ्यावर बसवा,
डोहाळे पुरवा..
झोपाळा सजवा वेलींनी,
गर्भवतीला झुलवा...
डोहाळे पुरवा..

भरुनी चुडा हिरवा,
शालूही ल्याले भरजरी हिरवा,
डोहाळे पुरवा..
वेणीमधे मरवा खोवियला,
आणवा चाफा हिरवा,
डोहाळे पुरवा..

पहिल्या महिन्याला सुनंस येता
थकवा सासुनी जाणुनी
धीर दिला तीज बरवा
तिसर्‍या महिन्याला
खण-नारळ अन्
वोमी‌कुणी गर्भवतीची चोर ओटी भरविली

महिन्यात सहाव्या थकलं ग
पाऊल सासर्‍यास लागंल
कान्‍ह्याची चाहूल पहिलीच खेप
ही जाणवोनी मुळी
देवालाजर्‍या वेलीला
नकळत बहरही
यावानववा भरुनिया मुलगीच ग व्हावी
व्हावी ती झाशीची राणी
नववा भरुनिया पुत्र पोटी यावा
आनंदीला आनंद व्हावा.."


"चांदण्यात न्ह्या ग हिला नटवा सजवा हिला
झोपले झुलवा चांदण्यात न्ह्या ग हिला
नटवा सजवा हिला
झोपले झुलवा भोवतालची बस तिला
काव हव ते पुसा
तिचे डोहाळे पूरवा हो हो डोहाळे पूरवा ग
कुणीतरी, ग अंडी ताई
ग कुणीतरी येणार येणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग
पाहुणा घरी येणार येणार ग
घरी येणार येणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग
पाहुणा घरी येणार येणार ग
इवलस नाजूक पाउल बाई
हळूच आतून चाहूल देई
इवलस नाजूक पाउल बाई
हळूच आतून चाहूल देई
गोविंदा गोपाल लागे जीवाला तुझा चाला
गोविंदा गोपाल लागे जीवाला तुझा चाला
हो चालाहो चाला साजीव होणार ग
ग चाला साजीव होणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग
पाहुणा घरी येणार येणार ग
होणार जे ते कसं दिसेल ग
मुलगा असेल तो की मुलगी असेल ग
होणार जे ते कसं दिसेल ग
मुलगा असेल तो की मुलगी असेल ग
कोणी असो तो किंवा ती
फरक तुला सांग पडतो किती
कोणी असो तो किंवा ती
फरक तुला सांग पडतो किती
शेवटी आई तू, अग आई तू होणार ग
शेवटी आई तू होणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग
पाहुणा घरी येणार येणार ग
घरी येणार येणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग
पाहुणा घरी येणार येणार ग.."

"गर्भीणनारी तुझा गर्भ डौलदार
उदराला येऊं दे कृष्णदेवाचा अवतार.."

क्रमशः

0

🎭 Series Post

View all