फुलले नाते प्रेमाचे❤️...भाग 25 अंतिम
आधीच्या भागात आपण पाहिले की,
आधीच्या भागात आपण पाहिले की,
आनंदीच्या डोहाळे जेवणाची संपूर्ण तयारी झाली होती. सगळीकडे सजावट झालेली होती, कार्यक्रमाला सुरुवात झाली. आनंदीच औक्षण झालं, त्यानंतर अभिजीतला पण तिच्या बाजूला बसायला सांगितलं, त्याचंही औक्षण झालं.
त्यानंतर बायांनी डोहाळे जेवणाचे गाणी म्हणायला सुरुवात केली.
त्यानंतर बायांनी डोहाळे जेवणाचे गाणी म्हणायला सुरुवात केली.
आता पुढे,
बायांची दोन गाणी झाली. आनंदीला ती गाणी ऐकावीशीच वाटत होती.
त्यांनी अजुन पुढे गाणी म्हणायला सुरुवात केली.
नऊ महिन्यांचा पाळणा,
पहिल्या माशीं आई पुशीती
लेकीबाईच डोहाळ कस?
आमच डोहाळ पुरवीजी आई
ओल्या न्हाणीवर लावावीजाई
जु बाळा जु बाळा जुजुरे
दुसर्या माशीं बाप पुशीतो
लेकीबाईच डोहाळ कस ?
आमच डोहाळ पुरवीजी बापा
ओल्या न्हाणीवर लावावाचाफा । जु बाळा ..............
पहिल्या माशीं आई पुशीती
लेकीबाईच डोहाळ कस?
आमच डोहाळ पुरवीजी आई
ओल्या न्हाणीवर लावावीजाई
जु बाळा जु बाळा जुजुरे
दुसर्या माशीं बाप पुशीतो
लेकीबाईच डोहाळ कस ?
आमच डोहाळ पुरवीजी बापा
ओल्या न्हाणीवर लावावाचाफा । जु बाळा ..............
तिसर्या माशीं बहिण पुसते । बहीण तुमच डोहाळ कस ?आमच डोहाळ पुरवीजी बहिणी । सोडावा बुचडा घालावंपाणी । जु बाळा ............
चवथ्या माशीं भाऊजी पुशी । बहिणी तुमच डोहाळ कस?आमच डोहाळ पुरबीजी भावा । बाजारीं जाऊन आणावाभेवा । जु बाळा ............
पांचव्या माशीं सासरा पुशी । सून तुमच डोहाळ कस ?आमच डोहाळ पुरवीजी सासर्या । मळयाला जाऊनआणाव्या उसर्या । जु बाळा........
सहाव्या माशीं सासू पुशीते । सूनबाईच डोहाळ कस ?आमच डोहाळ पुरवीजी सासू । मळ्याला जाऊन आणावा उसू । जु बाळा ...........
सातव्या माशीं नणंद पुशी । वहिनी तुमच डोहाळ कस ?आमच डोहाळ पुरवीजी वइन्स । मळ्याला जाऊनी आणावींकणसं । जु बाळा ........
आठव्या माशीं दीर पुशीतो । वहिनी तुमच डोहाळ कस ?आमच डोहाळ पुरवीची दीरा । पाडाबी न्हाणी बांधावा चिरा । जु बाळा..........
नवव्या माशीं कंथजी पुशी । राणी तुमच डोहाळ कस ?आमच डोहाळ पुरवीजी कंथा । झालाया पुत्र हरली चिता । जु बाळा............
cp
cp
गाणी सुरू होती आणि तितक्यात आनंदीच्या जुन्या मैत्रिणी आल्या.
त्यांना बघून आनंदी पटकन पाळण्यावरून उठली. आणि त्यांना जाऊन मीठी मारली.
"आनंदी अग हळु." मागेहुन पटकन निशा आली.
"काय आनंदी अग या दिवसात इतकी घाई बरी नाही."
"सॉरी आई, अग दोघींना बघून मला खूप आनंद झाला आणि मग हे असं झालं."
"कशी आहेस आनंदी." प्रिन्सिने लगेच विचारलं.
"मस्त ग, तुम्हाला बघूनच तर माझा आनंद गगनात मावेना झालाय."
"मुलींनो कार्यक्रम सुरू आहे, तुम्ही बसा."
आनंदी झुल्यावर जाऊन बसली.
आनंदी झुल्यावर जाऊन बसली.
समोर चेअरवर तिच्या मैत्रिणी बसल्या.
कार्यक्रम संपला आणि सगळे पाहुणे निघून गेले.
सगळं छान झालं होतं.
आनंदीच्या मैत्रिणी दोन दिवस राहिल्या आणि त्या निघून गेल्या.
आनंदीच्या मैत्रिणी दोन दिवस राहिल्या आणि त्या निघून गेल्या.
दिवस आनंदात जात होते.
शेवटच्या दिवसात अभिजीतने आनंदीला खुप जपलं, तो तिची खुप काळजी घ्यायचा. पोट खूप वाढल्यामुळे तिला बसायला उठायला त्रास व्हायचा.
"दोन बाळ आहेत, थोडा त्रास तर होणार आनंदी, पण या त्रासातही वेगळंच आत्मिक सुख असतं." असं निशा तिला नेहमी सांगायची.
आणि खरच आहे त्या त्रासातही आपल्याला वेगळाच आनंद मिळतो.
बघता बघता नऊ महिने पूर्ण झाले आणि आनंदीच्या पोटात कळा यायला लागल्या. तिला ऍडमिट केलं.
काही कॉम्प्लिकेशन असल्यामुळे डॉक्टरने सिझेरियन करावं लागेल अस सांगितलं.
अभिजीतकडून फॉर्म भरून घेतला आणि तिला ओ टी मध्ये नेण्यात आलं.
अभिजीतकडून फॉर्म भरून घेतला आणि तिला ओ टी मध्ये नेण्यात आलं.
खूप त्रास सहन केल्यानंतर आनंदीने जुळ्या बाळांना जन्म दिला. एक मुलगा आणि एक मुलगी.
आनंदी आणि अभिजीतचं कुटुंब पूर्ण झालं.
पाच दिवसानंतर आनंदीला डिस्चार्ज मिळाला.
अभिजीत तिला घरी घेऊन गेला.
अभिजीत तिला घरी घेऊन गेला.
दारात पाय ठेवत नाही तर निशा आरतीची थाळी घेऊन, चिमुकल्या बाळाचं आणि आनंदीचं औक्षण केलं. बाळाच्या कुंकुवाच्या पावलांनी ठसे उमटवले.
आनंदी बाळांना घेऊन आत आली, आत खूप सुंदर सजावट केलेली होती, दोन बाळाचे दोन पाळणे सजवले होते.
"अभिजीत किती सगळं केलंयस."
"पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त." असं म्हणून अभिजीत मिश्कीलपणे हसला.
"पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त." असं म्हणून अभिजीत मिश्कीलपणे हसला.
आनंदी पण विचार करत राहिली.
आत बेडरूममध्ये गेली तर सगळीकडे काळोख होता.
"अभि इथे इतका काळोख का आहे?"
"सरप्राईज.."
लाईट ऑन झाले आणि आनंदी बघते तर काय समोर निशाच्या जुन्या मैत्रिणी मेघा, तिच्या मुली आणि सायली, तसेच तिच्या मैत्रिणी प्रिन्सि आणि रिया पण होत्या.
सगळ्यांना बघून ती खूप आनंदी झाली.
"बापरे तुम्ही सगळे इथे, मला तर खूप मोठं सरप्राईज मिळालं."
"मग तुझ्या आईने फोन करून आम्हाला बोलावून घेतलं." मेघा
"थँक्स यू मेघा मावशी. थांक यू ऑल सो मच. तुम्हाला सर्वांना बघून मला खूप आनंद झाला."
"आता तुझ्या बाळाचं नाव ठेवूनच आम्ही निघणार आहोत."
"चला तिला आराम करू द्या, आपण सगळे बाहेर बसू." निशा सगळ्यांना बाहेर हॉलमध्ये घेऊन गेली.
"चला तिला आराम करू द्या, आपण सगळे बाहेर बसू." निशा सगळ्यांना बाहेर हॉलमध्ये घेऊन गेली.
बाराव्या दिवशी बाळाचं नावं ठेवण्याचा कार्यक्रम करायचं ठरलं.
ठरल्याप्रमाणे सगळी तयारी झाली.
तो दिवस उजाडला, सगळ्यांनी तयारी केली, बाळांचे झुले सजवले. काही पाहुणांच्या उपस्थितीत नाव ठेवण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
बाळांना आत्या नसल्यामुळे मावशीने त्यांच्या कानात नावे फुकली.
"वेदांत.."
"वेदिका.."
सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
"प्रेमांगण हृदयी फुलले...
निश्वार्थ प्रेम जाहले...
तुझ्या माझ्या सोबतीने
प्रेमाचे नाते फुलले..."
निश्वार्थ प्रेम जाहले...
तुझ्या माझ्या सोबतीने
प्रेमाचे नाते फुलले..."
समाप्त:
नमस्कार वाचकहो,
ही कथा मी स्त्रीच्या आयुष्यावर लिहिली होती. स्त्रियांच्या आयुष्यात येणार वादळ, त्यातून त्या कशाप्रकारे मार्ग काढतात, पुरुषी वर्चस्व दाखवणाऱ्या पुरुषांवर मात करणे. त्यांच्या जाचातून स्वतःची मुक्तता करणे. सगळ्याच स्त्रिया कुठल्या ना कुठल्या त्रासातून जात असतात.
आपल्या कथेतील नायिका निशा तिलाही असाच त्रास सहन करावा लागला, कुमारी आई बनण्याचं दुर्भाग्य तिला लाभलं. पण ती डगमगली नाही, की हरली नाही. तिने त्या निष्पाप जीवाला जन्म दिला. तिला वाढवलं, मोठं केलं. पण तेही सहज नव्हतं.
लग्न न होता आई होणं, मुलगी जन्माला घालणं आणि वाढवणं हे समाज स्वीकारत नाही, निशाला समाजाचा खूप त्रास सहन करावा लागला, या कठीण काळी तिच्या सोबत तिची आई निर्मला खंबीरपणे उभी होती.
एकट्या बाईने आयुष्य काढणे सोपे नाही, अश्या बाईकडे समाज वाईट दृष्टीने बघतो. निशा सोबतही अनेक प्रसंग घडले. वाईट आणि घृणास्पद प्रसंगांनाही तिने न घाबरता, न डगमगता तोंड दिलंय.
पण मुलीवर कधीच कुठलीच दृष्टी पडू दिली नाही, तिला खूप जोपासलं. तिला तिच्या पायावर उभ केलं. तिला सक्षम बनवलं. पण मुलीच्या आयुष्यातही बरेच अडथळे आहे.
भर मांडवात ऐनवेळी वरमुलाने लग्नाला नकार दिला. पण म्हणतात ना लग्नाच्या गाठी तर स्वर्गात बांधलेल्या असतात.
तिला तिचा जोडीदार मिळाला.
भर मांडवात ऐनवेळी वरमुलाने लग्नाला नकार दिला. पण म्हणतात ना लग्नाच्या गाठी तर स्वर्गात बांधलेल्या असतात.
तिला तिचा जोडीदार मिळाला.
मुलगी लग्न करून सासरी गेली आणि ती आनंदात होती.
निशाचं जीवन सार्थक झालं. तिच्या हातून एका निष्पाप मुलीचं जीवन घडलं. त्यातच सगळं आलं.
या कथेतून मी एवढंच सांगू शकेन, एका स्त्रीने मनात आणलं तर ती काहीही करू शकते, तिच्या साठी काहीही अशक्य नाही.
आणि हो प्रेम हे लग्नाआधीच व्हायला हवं असं नाही, ते लग्नानंतरही होऊच शकतं. आनंदीचं प्रेम लग्नानंतरचं फुललं. प्रेमाने नाते फुलतं गेले आणि सगळ्यांच्या आयुष्यात आनंद देऊन गेले.
या कथेला तुम्ही छान प्रतिसाद दिलात, संपूर्ण कथा कशी वाटली नक्की कळवा. तुमचं प्रेम असंच राहू द्या. पुन्हा भेटू नवीन कथेसह.
धन्यवाद
