आधीच्या भागात आपण बघितले की,
विक्रमने अभिजीतला सांभाळलं.
निशा खूप रडत होती, रडत रडत ती मंदिरात गेली, विक्रम आणि अभिजीने तिला खूप शोधलं त्यानंतर ती मंदिरातून येताना दिसली. दोघांनी तिला समजावलं, तिच्या पायाला रक्त लागलेलं होतं. नर्सने ड्रेसिंग करून दिली.
आनंदीमध्ये काहीच इम्प्रूमेंट दिसत नव्हती. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा विचार केला, पण डॉक्टर बोलले की ऑपरेशन सक्सेसफुली झालंय, शुद्धीत येण्यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल. त्यानंतर डॉक्टरांनी तिसऱ्या दिवशी चेक केलं आणि ते बाहेर आले त्यांनी जे काय सांगितले ते ऐकून सगळ्यांना धक्का बसला.
आता पुढे,
"डॉक्टर तुम्ही काय बोलताय?"
"हो मी जे काय बोलतोय ते खर आहे. आनंदी कोमात गेली आहे आणि ती कोमातून कधी बाहेर येईल हे सांगता येत नाही. हे बघा कधी कधी कसं असतं ना पेशंट महिनाभरातही कोमातून बाहेर येतो आणि कधीकधी वर्षं वर्ष उलटून जातात तरी पेशंट कोमातच असतो. आता आपण काहीही करू शकणार नाही, सगळं देवावर सोडून द्या. त्याच्या मनात असेल तर तोच काहीतरी चमत्कार करेल." असं म्हणून डॉक्टर तिथून निघून गेले.
हे सगळं ऐकून तिघांनाही धक्का बसला. समोर काय बोलावं काही कळेना, तिघेही फक्त एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत होते. डोळे पाणावलेले असताना देखील तिघांनीही एकमेकांना सावरलं. एकमेकांना दिलासा दिला.
"बाबा तुम्ही आईला घेऊन घरी जा, मी थांबतो आनंदी जवळ. आता आपल्याला इथे नाही थांबल तरी काही हरकत नाही, तुम्ही जा घरी. आईने कालपासून काही खाल्ले नाही. मी माझ्या मित्राला सांगतो टिफिन पोहोचवायला, तो टिफिन पोहोचवून देईल. तुम्ही दोघे घरी जाऊन फ्रेश व्हा आणि थोडस खाऊन घ्या. आता इथे थांबूनही काही उपयोग नाही."
"मी माझ्या आनंदीला सोडून कुठे जाणार नाही आहे मी कुठेही जाणार नाही."
"निशा हट्ट करू नको. येथे राहूनही काही उपयोग नाहीये. आता आपल्याला फक्त वाट बघावी लागेल. अजून काही नाही आणि काही लागलं तर अभिजीत आहे ना, तो आपल्याला कॉल करेल. चल आपण घरी जाऊ."
विक्रम जबरदस्तीने निशाला घरी घेऊन गेला, त्यानंतर अभिजीत आत आनंदी जवळ जाऊन बसला. आनंदीला असं निपचित पडलेलं बघून त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळू लागले.
"आनंदी का असं झालं असेल ग? कोणत्या गुन्ह्याची शिक्षा मिळतेय मला? मी तुझ्याशी वाईट वागलो ना त्याची शिक्षा देतोय देव मला. पण देवा भगवंता शिक्षा करायची आहे तर मला कर आनंदीला का? तिला त्रास का देतोयस मला कर शिक्षा. आनंदीच्या जागी मला ठेव माझ्या आनंदीला बरं कर देवा बरं कर तिला. मी निनादच्या जाळ्यात अडकलो आणि तुला फसवायला निघालो होतो. मला माफ कर आनंदी मला माफ कर."
काही वेळाने अभिजीतच्या मोबाईलवर फोन आला नंबर होता म्हणून त्याने उचलला नाही. थोड्यावेळाने पुन्हा फोन आला, त्याने उचलला
"हॅलो.."
"हॅलो अभिजीत निनाद बोलतोय."
"बोल का फोन केलास तू? हे बघ निनाद मी आज तुला शेवटचं सांगतोय. यानंतर मला फोन करायचा नाही. तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात काय काय घडलंय तुला नाही माहित. आज तुझ्यामुळे माझी आनंदी मरणाच्या दारात उभी आहे. तुझ्या शब्दात अडकलो आणि मी माझ्या आनंदीला फसवायला निघालो होतो. याची शिक्षा देतोय देव मला."
"अभिजीत काय बोलतोस तू?"
"हो खरं तेच बोलतोय, माझी आनंदी मरणाच्या दारात आहे."
"काय झालं?"
अभिजीतने घडलेला सगळा प्रकार सांगितला.
"तू काळजी करू नकोस, मी आता येतोय तिकडे." असं म्हणून निनादने फोन ठेवला. अभिजीत काही बोलणार पण फोन बंद झालेला त्याला कळलं.
\"का येतोय हा आता? मला याचं तोंडही बघायचं नाही.\" अभिजीत मनातल्या मनात बोलला.
काही वेळाने निनाद हॉस्पिटलला पोहोचला.
"अभिजीत कशी आनंदी?"
अभिजीतने फक्त आनंदीच्या रूम कडे बोट दाखवलं. निनाद आत गेला. आनंदीला अशा अवस्थेत बघून त्याला वाईट वाटत होतं.
मागेहुन अभिजीत आला.
मागेहुन अभिजीत आला.
"निनाद खूप आनंद होत असणार ना तुला? माझ्या आनंदीला अशा अवस्थेत बघून."
"काय बोलतोस तू?"
"मग काय बोलू? तुला तर तिला त्रास द्यायचा होता ना? देवाने शिक्षा दिली तिला नेहमीसाठी. आता माझी आनंदी कधी डोळे उघडेल आणि कधी माझ्याशी बोलेल हे मला माहित नाही. माझ्या कर्माची शिक्षा मिळते मला."
"नाही अभिजीत तसं नाहीये. मी आनंदीशी वाईट वागलो असेल पण आता माझ्या मनात तिच्याविषयी काही वाईट विचार नव्हता. मी देवाकडे प्रार्थना करीन तिच्यासाठी, तिला लवकर बरं कर म्हणून मी साकड घालेन देवाला. हे बघ अभिजीत सगळं ठीक होईल तू काळजी करू नकोस आणि हो काही लागलं तर मला फोन कर."असं म्हणून तो तिथून निघून गेला.
निशा आणि विक्रम घरी पोहोचले, दोघेही सोफ्यावर बसले होते की दारावरची बेल वाजली.
विक्रमने दार उघडला
"नमस्ते काका, अभिजीतने मला डबे पोहोचवायला सांगितले होते, तुमच्या दोघांचे डबे."असे म्हणून त्याने हातात डबे दिले आणि तो निघून गेला.
"नमस्ते काका, अभिजीतने मला डबे पोहोचवायला सांगितले होते, तुमच्या दोघांचे डबे."असे म्हणून त्याने हातात डबे दिले आणि तो निघून गेला.
विक्रमने हातातले डबे टेबलवर ठेवले आणि निशाच्या जवळ गेला.
"निशा फ्रेश हो आणि थोडसं खाऊन घे, चल उठ."
"नाही हो माझी मुलगी मरणाच्या दारात आहे आणि मी जेवण करू, नाही नाही माझ्या घशाखाली घास उतरणार नाही."
"हे बघ निशा तू काही खाल्लं नाहीस तर तुझी तब्येत बिघडेल, आनंदीचं आधीच अस आहे आणि आता तुझी तब्येत बिघडली तर मी कुणाकडे बघायचं? हे काही मला चालणार नाही,थोडसं तरी खाऊन घे."
"अहो पण विक्रम."
"आता काही नाही चल जेवण कर."
निशा फ्रेश होऊन आली, तिने आणि विक्रमने थोडसं जेवण केलं. त्यानंतर निशा देवासमोर जाऊन बसली. तिने देव पाण्यात घातले.
"निशा देव पाण्यात टाकून ठेवल्याने आनंदी बरी होणार आहे का?"
"हो नक्की होईल, माझी श्रद्धा आहे देवावर. तो माझ्या आनंदीला नक्की बरं करेल. आता जोपर्यंत माझी आनंदी बरी होत नाही मी इथून उठणार नाही, इथून हालणार नाही की पाण्याचा एक थेंबही घेणार नाही."
"निशा हट्ट करू नकोस, तुझ्या अश्या वागल्याने आनंदी बरी होणार नाही आहे."
"हो मी हट्ट करणारच, ती नक्की बरी होईल." असं म्हणत निशा देवापुढे बसली.
काही वेळाने विक्रमने अभिजीतला फोन केला.
"हॅलो बाबा बोला."
"अभिजीत मी काय म्हणतो मी तिकडे थांबतो, थोडा वेळ तू घरी ये तू थोडा फ्रेश होऊन जा."
"नाही बाबा आता नको मी रात्री येतो ना घरी."
"चालेल.."
"सो मी रात्री येतो घरी आता थोडा वेळ थांबतो इथे, तुम्ही आणि जेवण केलं?"
"सो मी रात्री येतो घरी आता थोडा वेळ थांबतो इथे, तुम्ही आणि जेवण केलं?"
"हो हो आम्ही जेवलोय तू ये घरी इकडेच, दोन तास खाऊन घे."
"हो बाबा मी रात्री येतो." असं म्हणून अभिजीतने फोन ठेवला.
रात्री अभिजीत घरी गेला, फ्रेश झाला कसे तरी दोन तास जेवला आणि वर गच्चीवर जाऊन बसला.
आकाशातल्या चांदण्यांकडे बघून त्याला आनंदीची तीव्र आठवण येत होती, तिला असं चांदण्याकडे बघत बसायला खूप आवडायचं. तासनतास ती चांदण्याकडे बघत बसायची. एक एक आठवणी अभिजीतच्या डोळ्यासमोरून जात होत्या. त्या आठवणी अभिजीतच्या मनात खोलवर रुजल्या होत्या आणि आता अभिजीतला त्याचा खूप त्रास होत होता. त्याला आनंदीची कमी जाणवत होती. त्याचे डोळे पाणावले. तो तिथून उठून खोलीत आला, खोलीतल्या खिडकीजवळ उभा राहिला. तिथूनही त्याला त्या चांदण्या दिसतच होत्या. नकळत डोळ्यातून अश्रू ओघळले. अभिजीतने खिडकीचा पडदा लावला आणि बेडवर जाऊन बसला.
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा