फुलवंती - अप्रतिम कलाविष्कार ( सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे)

अव्यक्त प्रेमाची कहाणी
फुलवंती

एक प्रकांड पंडीत वेदान्त सूर्य, आणि दुसरी तितकीच तयारीची कलाकार. या दोघांमध्ये अव्यक्त प्रेम आहे. दोघेही आपापल्या क्षेत्रात अव्वल दर्जाचे असतात. नशिबाने ते एकमेकांसमोर प्रतिद्वंद्वी म्हणून उभे राहतात आणि एकमेकाला हरवता, हरवता ते एकमेकाच्या प्रेमात पडतात. पण दोघेही त्यालाच खरे प्रेम असतं हे जाणून त्याग करतात.


बाबासाहेब पुरंदरे यांची कादंबरी, खरतरं कधी वाचलेली ही नाही. फुलवंती सिनेमा आला तेव्हा कळले, ही बाबासाहेबांची कादंबरी आहे. पण मला वाटते जो हा सिनेमा पहिल त्याला कादंबरी वाचलेली असण्याची गरज नाही.

प्राजक्ता माळी, अप्रतिम नृत्याविष्कार, सात्विक सौंदर्य आणि तितकाच बोलका आणि संयत अभिनय तिने केला आहे. तर गश्मीर महाजनी एक प्रकांड पंडीत म्हणून त्याचीही भुमिका खूप चांगली झाली आहे. सिनेमा खूप सुंदर उलगडत गेला आहे. कुठेही कंटाळवाणा होत नाही. ज्याला कलाविष्कार समजतो आणि कलेची जाण आहे, त्यांना निश्चितच हा सिनेमा खूप आवडेल. आवर्जून पहावा असा सिनेमा आहे.

©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे