पिकनिक भाग १
समुद्र सफारी.
त्या दिवशी ऑफिस च्या लंच टाइम मध्ये जेवतांना प्रशांत म्हणाला,
“बरेच दिवसांत कुठे पिकनिकला गेलो नाही. कंटाळा आलाय. सारंग, कुठे तरी दोन दिवस जायला पाहिजे.” – प्रशांत.
“गुड आयडिया. महाबळेश्वरला जायचं का? की माथेरान?” – विनोद.
“ह्या, नेहमीच काय महाबळेश्वर आणि माथेरान, मागच्याच वर्षी तर गेलो होतो माथेरान ला. त्यांच्या आधीच्या वर्षी महाबळेश्वरला गेलो होतो. दुसरं काही तरी बोला. तारकर्ली कसं वाटतं?” – उमेश.
“नको, तारकर्ली खूप दूर आहे जाण्या येण्यातच खूप वेळ जाईल. त्यापेक्षा आपण अलिबाग ला जाऊ. कीहीम चा किनारा खूप सुंदर आहे असं ऐकतो.” – साधना.
या नंतर बरीच चर्चा रंगली आणि काहीही निश्चित न होता लंच टाइम संपला आणि सर्व आपापल्या जागेवर गेले. एक गोष्ट मात्र ठरली की पिकनिक ला जायचं. यावर मात्र एकमत झालं. दुसऱ्या दिवशी पण लंच टाइम मध्ये तोच विषय चालू होता. बराच ऊहापोह झाला पण कुठे जायचं यावर एकमत होत नव्हतं. आजू बाजूची दोन दिवसांत आटोपणारी सगळी सगळी स्थळं विचारात घेऊन झाली. सुचवलेलं प्रत्येक स्थळ काही ना काही कारणांमुळे रद्द व्हायचं.
“अरे रमेश तू काहीच बोलत नाहीस. तू सुचव नवीन काही तरी.” उल्हास म्हणाला.
“मी काय सडाफटिंग. अजून लग्न व्हायचंय. मला तर कुठेही यायला प्रॉब्लेम नाहीये. मी काय सुचवणार? बायको आल्यावर काय अडचणी येतात त्याचा मला काही अनुभव नाहीये. तुम्ही काय ते ठरवा, मी तयार आहे.” – रमेश म्हणाला.
“त्याला हुंडा म्हणतात.” – देसाई.
“म्हणजे आम्ही काय माहेराहून अडचणी घेऊन येतो का? तू लवकर लग्न कर म्हणजे कळेल.” – वसुंधरा फणकाऱ्याने म्हणाली.
“एक मिनिट, वादाला आमंत्रण नको. देसाई, अहो काहीतरीच काय बोलताय? रमेश, बायका मुलांच्या अडचणी नसतात, पण त्यांच्या सोयीनुसार करायला नको का? नाही तर ट्रीप चा आनंद कसा घेता येणार? तुझ्या डोक्यात आहे का कोणची जागा?” – सारंगने सारवा सारव केली.
“माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे. बघा तुम्हाला पटत असेल तर एक वेगळाच अनुभव असेल तो सर्वांसाठी.” – रमेश.
“अनुभव? रमेश, आपण ट्रीपला मजा करण्यासाठी जाणार आहोत, रोजच्या कटकटी पासून दोन दिवस मोकळं होण्या साठी. आता हे अनुभवाचं पिल्लू कुठून आलं तुझ्या डोक्यात? अनुभव म्हंटलं की टेंशन आलं. ते डोंगर चढणं वगैरे काही आपल्याला झेपायचं नाही. नको रे बाबा.” – नीलिमा.
“नीलिमा मॅडम जरा ऐकून तर घ्या तो काय म्हणतो आहे ते? आपण लगेच काही फायनल करणार नाही.” – सारंग.
“ओके सांग. काय आहे तुझी आयडिया?” – नीलिमा.
“तुम्हाला समुद्र सफारी करायला आवडेल? भर समुद्रात मासेमारी कशी करतात ते बघायला आवडेल का?” – रमेश.
“हे काही नवीनच दिसतंय. घारापुरीची लेणी बघायला जायचं असं तुझ्या मनात आहे का?” – उमेश.
“बहुधा जे कोणी समुद्रावर गेले असतील, ते जास्तीत जास्त घारापुरीची लेणी बघायला गेले असतील. पण मी म्हणतो आहे ते भर समुद्रात जाण्या बद्दल. हा अनुभव तुमच्या सर्वांसाठी नवीनच असेल.” – रमेश.
“समुद्रात उलटयांचा फार त्रास होतो म्हणतात. नको बाई. दुसऱ्या दिवशी ऑफिस असतं. सोमवारी १५ जण गैरहजर दिसल्यावर बॉस असा काही चिडेल की आपल्याला सांभाळणं कठीण होईल.” – नीलिमा.
“नीलिमा मॅडम आधीच का नकार घंटा लावता आहात. त्याचं बोलणं तर पूर्ण होऊ द्या. मग सर्वानुमते ठरवू. त्या वेळेस तुमचं पण मत मांडा.” – सारंग.
“करेक्ट आहे. तू बोल रे रमेश. काय योजना आहे? मी तर आताच नुसत्या कल्पनेनेच एक्साइट झालो आहे.” – प्रशांत.
“भर समुद्रात जायचं आणि गोणी भर भरून पापलेट, बांगडा, सुरमई कशी पकडतात हे बघायचं. खूप इंट्रेस्टिंग असतं. तुम्हाला आवडेल का?” – रमेश.
“काय सांगतोस! एखाद्या छोट्या बोटीवरून इतकी सगळी माणसं कशी जाणार? आणि बोट उलटली तर काय करायचं? आम्हाला पोहता येत नाही.” – वसुंधरा.
“हो एलिफंटा ला जातांना सुद्धा किती भीती वाटते.” -नीलिमा.
“तसं काही नाही. मोठी ट्रॉलर बोट घ्यायची. ती फारशी हालत नाही. घाबरण्याचं काहीच कारण नाही.” – रमेश.
“तुला काय माहीत? तू कधी गेला आहेस का?” – उमेश.
“तुम्हाला माहितीच आहे की मी पालघरचा आहे. आमचं गांव सातपाटी. आमचा पिढीजाद मासेमारीचा धंदा आहे. मी जरी नोकरी करत असलो, तरी माझे वडील आणि भाऊ याच व्यवसायात आहेत. आमच्याकडे एक मोठी ट्रॉलर बोट आहे आणि ती भर समुद्रात जाते. चांगले ४-५ दिवस तिथे राहून मासे पकडतात. दर वेळेस कमीत कमी ४००० किलो तरी मासे असतात.” रमेशने विस्ताराने सांगितले.
“बापरे, यांच्या साठी काम करणारे पण लागत असतील?” – सारंग.
“हो साधारण १५-२० जणांचा क्रू असतो. मासोळी आणल्या नंतर सगळ्यांचे वाटे ठरलेले असतात. त्याप्रमाणे विभागणी होते. ती पैशांची असते किंवा काही जण मासे घेऊन जातात आणि स्वत: विकतात.” – रमेश.
“आम्हाला समुद्रावरच्या वातावरणाची अजिबात सवय नाही. काही त्रास तर होणार नाही? मुलांना घेऊन येता येईल का?” – कुसुम
“काही जणांना होऊ शकतो. मळमळ आणि उलट्याचा थोडा त्रास होऊ शकतो. त्यांची औषधं घेऊन या. मग झालं.” – रमेश.
“ते सर्व ठीक पण चार दिवस सुट्टी मिळणार आहे का?” – शशांक
“हे मात्र खरं. रमेश हे काही जमणार नाही. दुसरं काही सूचव” – सारंग.
“चार दिवस कशाला लागतात? ते व्यावसायिक मासेमारी करायला लागतात. आपण मजा म्हणून जाणार आहोत. सकाळी जाऊन संध्याकाळी परत येऊ. मग काय प्रॉब्लेम आहे?” – रमेश.
“बोटीवर वॉशरूम असते का?” – नीलिमा.
“सगळी सोय असते. चार चार दिवस बोट समुद्रावर असते तेंव्हा झोपायची व्यवस्था पण असते. काळजी करू नका.” – रमेश.
मग थोडी अजून चर्चा होऊन हा प्रोग्राम फायनल झाला. दुसऱ्या दिवशी संपूर्ण दिवसांचा आराखडा रमेश देणार असं ठरलं. लंच टाइम संपला.
दुसऱ्या दिवशी रमेशने सांगितलं,
“सकाळी आठ वाजता सर्वांनी पालघर स्टेशन वर जमायचं. तिथून सातपाटीला जायची व्यवस्था मी करतो. तिथे आमची बोट तयार असेल. बोटीत बसायचं, साधारण तीन तासात बोट ४०-५० किलोमीटर समुद्रात जाईल. हा तीन तासांचा समुद्र प्रवास तुम्हाला वेगळाच अनुभव देऊन जाईल. जाताजाताच मी तुम्हाला बोटीवर काय काय मशीन असतात त्यांची ओळख करून देईन. मग इच्छित स्थळी पोचल्यावर समुद्रात जाळं फेकायचं. आणि थोडं थांबून माघारी फिरायचं. किनाऱ्यावर यायला अजून तीन ते साडेतीन तास. मग मासोळी उतरवून वर्गवारी करून कशी ठेवल्या जाते ते बघा. म्हणजे बघा, जायला ३ तास, यायला ३ तास समुद्रावर १ तास आणि किनाऱ्यावर एक तास. असे आठ तास. म्हणजे दुपारी ४-५ वाजे पर्यन्त आपण परत येऊ. चहा पाणी, जेवण, खाणं या सर्वांची व्यवस्था आमची. तुम्ही फक्त चला. फक्त आपल्या प्रकृती प्रमाणे जरुरीची औषधं घेऊन या म्हणजे झालं. समुद्रावर कधी कधी रेंज मिळते, पण खात्री देता येत नाही,” रमेशने सविस्तर आराखडा सर्वांसमोर ठेवला.
थोडे फार सवाल जवाब होऊन ही योजना फायनल झाली.
“कधी जायचं? या रविवारी?” - उमेश.
“नाही या रविवारी मी जाऊन बोट कोणच्या शनिवारी मोकळी असेल, त्या तारखा घेऊन येतो. तो पर्यन्त तुम्ही तयार रहा. आपण शनिवार ठरवू म्हणजे रविवारी आराम करता येईल.” – रमेश.
पुढच्याच शनिवारी सगळे पालघर स्टेशन वर सकाळी आठ वाजे पर्यन्त पोचले. बायका मुलं मिळून वीसएक जण होते. रमेश हजर होताच. सातपाटीला पोचले तेंव्हा पावणे नऊ वाजले होते. ट्रॉलर बोट चांगलीच मोठी होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा भाव होता. रमेशला बरं वाटलं. बोट निघाली. तासाभाराने समुद्राचं कौतुक संपल्यावर, रमेश पुढे झाला. म्हणाला,
“आता मी तुम्हाला बोटी बद्दल सांगतो. स्टील, फायबर आणि लाकूड वापरुन मजबूत बोट बनवल्या जाते. आत्ता आपण जिथे उभे आहोत, त्याला डेक म्हणतात. इथे मासे पकडून जाळे ओढले की इथे टाकतात. ही जी मशीन दिसते आहे, त्याला विंच म्हणतात. याच मशीन ने जाळं टाकण्याचं आणि ओढण्याचं काम होतं. तुम्ही बघालच थोड्या वेळाने. आता चला इंजिन रूम मध्ये. हे अवाढव्य मशीन आहे, हे जनरेटर आहे आणि याला फिरवण्या साठी हे डीजल इंजिन आहे. जनरेटरने वीज तयार होते, आणि त्याच विजेवर बोटीवरची सर्व उपकरणं चालतात. आता आपण बोटीच्या मागच्या भागात जाऊ. या भागाला स्टर्न म्हणतात आणि इथूनच जाळं फेकण्याचं आणि ओढायचं काम होतं. या जाळ्याला ट्रॉल नेट म्हणतात. या जाळ्याचं तोंड फाकवण्यासाठी एक उपकरण असतं त्याला ओटबॉर्ड गियर म्हणतात. त्यामुळे मासे जाळ्यात ओढले जातात. आता आपण ब्रिज वर जाऊ. इथे सुकाणू असतं म्हणून याला व्हील हाऊस असं पण म्हणतात. इथे आपल्या बोटीवर GPS यंत्रणा बसवलेली आहे जेणे करून आपली बोट नेमकी कुठे आहे हे कळतं. आपल्या बोटीवर, पाण्या खाली मासे कुठे आहेत हे शोधण्यासाठी ध्वनि लहरी वापरुन शोधणारं उपकरण बसवलेलं आहे. त्याला सोनार म्हणतात.” – रमेश.
“इतकं सगळं असतं?” - सारंग.
“हो. आता जाळं समुद्रात फेकल्यावर त्याला बरेच तरंगणारे ठोकळे लांब दोरीने बांधलेले असतात त्यावरून जाळं नेमकं कुठे आहे ते कळतं. जाळं समुद्रात फेकल्या नंतर ते साधारण तासाभराने खेचून घेतात. पापलेट सुरमई आणि बांगडा यांच्या साठी हा वेळ पुरेसा असतो.
“तू मघाशी म्हणालास की ठरलेल्या ठिकाणी पोचल्यावर जाळं फेकतात. हा समुद्र आहे कुठेही जाळं फेकलं तरी मासे मिळातीलच.” – सारंग.
“नाही तसं छोट्या बोटी किंवा होड्या जे वापरतात, ते त्यांच्या अनुभवानुसार जाळं फेकतात, पण मोठ्या ट्रॉलर वर वेगळी यंत्रणा असते. आता साधारण अडीच तास उलटून गेले होते. रमेश म्हणाला की हे बघा हे विमानांसाठी दाखवतात, तसं रडार आहे. याला सोनार स्क्रीन म्हणतात. हे यंत्र साऊंड वेव्स पाण्यात सोडतं. मासे त्यांच्या मार्गामध्ये मध्ये आले की त्यांचे ठिपके स्क्रीन वर दिसायला लागतात. आता तुम्ही पहा थोड्याच वेळात मासे ठिपक्यांच्या स्वरूपात दिसायला लागतील. हळू हळू त्यांच्या झुंडी पण दिसतील. झुंडी दिसल्या की जाळं फेकण्याची प्रक्रिया सुरू होईल.
सोनार स्क्रीन वर जसे भरपूर मासे दिसायला लागले, तसा रमेश म्हणाला की चला आपण स्टर्न वर म्हणजे बोटीच्या मागच्या भागात जाऊ.” – रमेश.
तिथे कार्यकर्ते तयारच होते. त्यांनी लगेच जाळं समुद्रात सोडायला सुरवात केली सरते शेवटी ओटोबोर्ड गियर ने जाळ्याचं तोंड फाकवलं आणि जाळं पूर्ण पणे पाण्यात गेलं. जाळं पाण्याखाली गेलं पण त्याला लावलेले तरंगते ठोकळे पाण्यावर तरंगत होते. आता बोट वळण घेऊन माघारी फिरणार होती. बोटीच्या वेगा मुळे जाळ्यामद्धे मासे ओढल्या जात होते.
क्रमश:----
पुढचा भाग उद्या – अनपेक्षित संकट.
दिलीप भिडे

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा