पिकनिक भाग ९
नवीन समीकरणं २
नवीन समीकरणं २
“पण असं कसं शक्य आहे? हे कथा कदंबऱ्यामधे ठीक आहे. वास्तवात असं काही घडत नाही. विशालराव नक्की खरं काय आहे? तुमच्या लग्नाला घरून विरोध आहे म्हणून तुम्ही पळून तर आला नाही ना?” - केशवराव.
“नाही. असं काहीच नाहीये. मी पूर्ण घटनाक्रम सांगतो मग तुम्हीच ठरवा. मग विशालने अगदी सुरवाती पासून सर्व कहाणी अगदी सविस्तर सांगितली. आणि अभिप्रायांसाठी थांबला.
“चला, बराच उशीर झाला आहे. विशाल जे काही सांगतो आहे त्याने डोकं भणभणायला लागलं आहे. आता आपण झोपायला जाऊ. बाकी आपण उद्या बोलू.” केशवरावांनी विषय संपवला.
कुटुंब प्रमुखानेच समाप्तीची घोषणा केल्यावर वेगळे मत प्रदर्शन करण्याची कुणाचीच प्राज्ञा नव्हती. सभा आटोपली.
“विशालचं अंथरूण पलीकडच्या पाहुण्यांच्या खोलीत घाला. विशाल, दोन – तीन दिवसांचं जागरण झालं आहे, शांतपणे आराम कर. सकाळी लवकर उठायची घाई करू नकोस. नाहीतर मरगळ उद्या दिवसभर टिकेल.” – केशवराव.
काकू आणि रोहिणी त्यांच्या रूम मध्ये गेल्या, आणि विदिशा इतरांच्या बरोबरच माजघरात झोपली होती. सकाळी जशी हालचाल सुरू झाली, तशीच विदिशाला जाग आली. ती पण उठून बसली.
“अग, तू कशाला एवढ्या सकाळी उठलीस? आराम कर. तीन दिवसांचा थकवा आहे. उगाच घाई गडबड करू नको.” – काकू.
“नाही काकू झाली झोप माझी. मला पण काही काम सांगा मी करते. सगळे उठले असतांना मी असं झोपून राहायचं हे काही मनाला पटत नाही.” – विदिशा.
विशाल मात्र दहा वाजे पर्यन्त झोपलाच होता. त्याला कोणी उठवलं पण नाही. शेवटी विदिशालाच राहवलं नाही तीची आंघोळ सुद्धा झाली होती. काकूंनी तिला एक कोरं नऊ वारी लुगडं आणि पोलकं दिलं. तेच ती नेसली होती. तिला सराईता सारखं नऊ वारी नेसलेले पाहून काकू अचंबित झाल्या.
“तुला येतं नेसायला? मला वाटलं की माझी मदत लागेल.” – काकू.
“नाही काकू मला येतं. घरी काही प्रसंग असला की मी नऊ वारीच नेसते.” – विदिशा.
“गुणांची आहेस ग. विशाल भाग्यवान आहे.” – काकू.
“काकू दहा वाजले आहेत, हे अजून उठले नाहीयेत. मी जाऊ का उठवायला?” – विदिशा.
त्यांनी होकार दिल्यावर विदिशाने विशालला उठवलं. सर्व आटोपून झाल्यावर, विदिशा म्हणाली,
“चहाची पद्धत इथे दिसत नाहीये. भूक लागली असेल ना? नाश्ता तयार आहे, मी आणून देते.” – विदिशा.
विशालच खाणं झालं आणि तो ओसरीवर आला. तिथे बरेच पेशंट येऊन बसले होते आणि दोघं भाऊ त्यांना तपासून औषध पाणी करण्यात गुंतले होते. तिकडे विदिशाला रोहिणी विचारात होती,
“विशाल रावांचं खाणंपिण झालं असेल, तर आंघोळ करून घ्या म्हणावं.” – रोहिणी.
विदिशा विचारात पडली. विशाल कडे कपडेच नव्हते. तिला विचारात गढलेली पाहून रोहिणीच पुन्हा म्हणाली,
“अग काय झालं? बोलत का नाहीस? जा आंघोळीला बोलव तुझ्या नवऱ्याला.”
“वहिनी, त्यांची पण तीच अडचण आहे, जी माझी होती. त्याच्याजवळ बदलण्यासाठी कपडेच नाहीयेत.” – विदिशा.
“तुला मिळाले ना. मग त्याची पण सोय होईल. अर्थात तुम्ही घातले होते, तसे झकपक कपडे आम्ही वापरत नाही, पण धोतर आणि नेहरू शर्ट आहे. आतले कपडे पण आहेत. आणि चिंता करू नकोस. सगळे कोरे आहेत. आमच्याकडे असे ३-४ जोड स्पेअर म्हणून ठेवण्याची पद्धत आहे. काय आहे न, पाहुणे रावळे सतत येत असतात. कधी कधी कोणाची अडचण असते, त्यांना अवघडल्या सारखं वाटू नये म्हणून आम्ही असं करतो. आता तर काही प्रॉब्लेम नाहीये न?” – रोहिणी.
विदिशा आ वासून बघतच राहिली. म्हणाली,
“वहिनी, तुम्हाला इंग्रजी येतं? मला कळलंच नाही.” – विदिशा.
“म्हणजे काय? आम्ही अशिक्षित वाटलो की काय तुला? मी पुण्याची आहे. गरवारे कन्या शाळेतून मॅट्रिक झाले आहे मी. मग लग्नच झालं.” रोहिणी
“सॉरी वाहिनी, पण मला कळलंच नाही. तुमचा अपमान करण्याचा कुठलाही हेतु नव्हता माझा.” – विदिशा खजील होऊन म्हणाली.
“वहिनी सुद्धा मॅट्रिक आहेत. रत्नागिरीच्या लोकमान्य टिळक कन्या शाळेत त्या शिकल्या आहेत.” – रोहिणी.
“मग दादा आणि रघुनाथ भाऊ?” – विदिशा.
“अग वैद्यकी तर पिढीजात आहे पण हे दोघंही भाऊ मुंबईच्या पोद्दार आयुर्वेदिक कॉलेज मधून ग्रॅजुएट झाले आहेत. अग आमच्या घरात सगळेच सुशिक्षित आहेत. आम्हाला इंग्रजी बोललेलं पटकन समजत नाही, पण त्याच सार लक्षात येतं. वाचलेलं मात्र समजतं. तू बघशील, दुपारी चार वाजता टाइम्स येतो आणि दादांचा कटाक्ष असतो की थोडं तरी टाइम्स मधून वाचलंच पाहिजे. बोल आता.” रोहिणी अभिमानाने म्हणाली.
विदिशा रोहिणीने दिलेले कपडे घेऊन विशालला बोलवायला गेली. तो समोरच्या अंगणात फिरत होता.
“अहो, आंघोळ करायची आहे न, चला. मी कपडे पण आणले आहेत.” – विदिशा.
सुस्नात तरतरीत विदिशा, चेहऱ्यावर मंद स्मित, अशी विदिशा पाहून विशाल खुळावलाच.
“परमेश्वराची असीम कृपा आहे. अशी गोड बायको मिळाली. मला अहो अशी हाक पण मारते आहे. देवा तुझे किती आभार मानू, हा गुलाब अलगद माझ्या पदरात टाकलास.” आणि असं म्हणून विशालने वर बघून हात जोडले. आणि जरा विदिशाच्या जवळ सरकला.
विदिशा लाजली. पण सावरली आणि म्हणाली,
“महाशय, मी तुमची बायको आहे हे मी मान्य केलं असलं तरी अजून अधिकृत रित्या शिक्का मोर्तब झालेलं नाहीये. हे १९६० साल आहे, आणि सार्वजनिक परिसरात अधिकृत नवरा बायको सुद्धा इतकी जवळीक करत नाहीत. तेंव्हा जरा अंतर राखावं ही विनंती.” – विदिशा.
विशालने जीभ चावली आणि दोन पावलं मागे सरकला.
“चल कुठे आहे बाथरूम?” – विशाल.
“बाथरूम फक्त बायकांसाठी राखीव. पुरुषांनी विहिरीवर करायची असते. मी गरम पाणी काढून देते. बंब तिथेच आहे.” – विदिशा.
विशालने तोंड वांकडं केलं, पण आला विहिरीवर. दूसरा पर्याय नव्हता.
“धोतर नेसता येतं का? की रघुनाथ भाऊंना सांगू?” – विदिशा.
“नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. येतं मला.”- विशाल.
दुपारच्या वामकुक्षी नंतर ओसरीत मीटिंग भरली. संध्याकाळच्या स्वयंपाकाला वेळ होता, त्यामुळे सर्व निवांत होते.
“विशाल, उद्या तू आणि रघुनाथ मुंबईला जाता का?” – केशवराव.
“मुंबईला? काय करायचं आहे मुंबईला जाऊन?” – विशाल.
“तु काल जे काही सांगितलं, ते आमच्या गळी काही उतरत नाहीये, म्हणून त्याची शहानिशा करायला हवी. तुमच्या कंपनीत जाऊन ती करता येईल.” केशव राव.
“ओके नो प्रॉब्लेम. म्हणजे काहीच अडचण नाही.” – विशाल म्हणाला. यावर केशवराव काही बोलायच्या आधीच विदिशा बोलली,
“अहो, काय बोलता आहात तुम्ही? हे १९६० साल चालू आहे. आपली कंपनीच १९७४ साली स्थापन झाली. तुमचा आणि माझा जन्म सुद्धा त्या नंतरच झाला. आज मुंबईला जाऊन काय साधणार आहात? बिल्डिंग तरी असेल का? ती तर १९८५ साली बनली. आज मोकळी जागा असेल तिथे.” – विदिशा.
सर्वांनी विदिशा कडे पाहिलं. तिचं म्हणण बरोबर आहे असाच भाव सर्वांच्या चेहऱ्यावर होता.
“ठीक आहे विदिशा म्हणते आहे त्यात तथ्य दिसते आहे. पण मग तुमची कहाणी खरी आहे याला प्रमाण काय?” केशव राव.
“काय प्रमाण देणार? मोबाइल जवळ असता तर काही दाखवता आलं असतं”– विशाल.
“मोबाइल? तुम्हाला मोबिल ऑइल म्हणायचं आहे का? मोटारींमधे टाकतात ते? पण त्याने काय सिद्ध होणार? आणि त्याच्या साठी पालघरला पंपावर जावं लागेल.”– रघुनाथ.
“नाही नाही. मोबाइल हा एक तळहातात मावणारा फोन असतो. तो कुठेही नेता येतो. त्यामधून जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलेल्या माणसा बरोबर संवाद साधता येतो. त्याला बघता पण येतं. म्हणजे जसा सिनेमा असतो तसंच. एक इंटरनेट नावाचा प्रकार असतो, त्याने जगांतली सर्व माहिती फोनवर येते. बघता येते. जग खूप बदललं आहे काका.” -विदिशा.
विदिशा जे बोलली ते कोणालाच कळलं नाही. सर्वांच्याच डोक्यावरून गेलं. त्या काळात चिंचणी मधे अख्ख्या गावात साधा फोन सुद्धा कोणाच्या घरात नव्हता. त्यामुळे मोबाइलची कल्पना करणं सुद्धा अवघड होतं. विश्वास ठेवणं तर दूरची गोष्ट होती.
“मोबाइल काय प्रकरण आहे काही कळलं नाही, पण काही तरी आधार तुम्हाला दाखवावा लागेल. त्याशिवाय आम्ही तुमच्या कहाणीवर कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही दोघं मूळचे मुंबईचे का? तसं असेल तर तुमच्या घरी आपण जाऊ.” – केशवराव
“मी अमरावतीचा. रुक्मिणी नगर, त्या वेळेच्या नवीन वस्तीत आमचं घर आहे. २५ जून १९७५ ही माझी जन्म तारीख. अमरावतीच्याच VMV कॉलेज मधून ग्रॅजुएट झालो, मग अमेरिकेत शिकायला गेलो. तिथून मास्टर्स डिग्री घेऊन भारतात परत आलो. २००४ मध्ये मी कंपनीत नोकरीला लागलो. पगार १ लाख रुपये महिना. अविवाहित. माझी जन्म तारीख विशेष आहे.” – विशाल.
“काय विशेष आहे तुमच्या जन्मतारखेत?” - केशवराव
“याच दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधींनी देश भरात इमर्जन्सी घोषित केली. सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना पकडून तुरुंगात घातलं. सरसंघचालक बाळासाहेब देवरस, जनसंघांचे अटलबिहारी बाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण वगैरे असंख्य लोकांना जेल मध्ये डांबलं आणि एका नवीनच अत्याचारी पर्वाला सुरवात झाली. ती १८ महीने टिकली.” – विशाल.
“काय सांगता? पंतप्रधान तर जवाहरलाल नेहरू आहेत. सरसंघचालक गुरुजी आहेत. तुम्ही भलतीच नावं घेत आहात. छे कठीण आहे. विशाल तुझं डोकं तर फिरलं नाही ना? की हा काही फसवा फसवीचा उद्योग आहे?” – केशवराव.
क्रमश:----
पुढचा भाग उद्या – पोलिस तपास.

दिलीप भिडे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा