Login

पिठलं भाकरीच जगणं!

गरीब लोकांचा जेवण हे श्रीमंत लोक सुद्धा करतात....
आई आज जेवण काय बनवल?
"पिठलं भाकरी" .'आई बोलते.
आज पुन्हा पिठलं भाकरी मी अजिबात खाणार नाही .
"रोज रात्री आपण पिठलं आणि भाकरीच खातो.
सर्वांच्या घरी कसं रोज वेगळ्यावेगळ्या प्रकारचं जेवण बनतं पण आपल्या घरी रोज जेवणात पिठलं आणि भाकरीच का" ? रमेश बोलतो.
"आई ,अरे बाळा आपली परिस्थिती फार गरिबीची आहे. आपल्या राहण्यासाठी आपल्या मालकांन जागा दिली म्हणून आपण कमीत कमी आपलं झोपडं बांधून राहू तरी शकलो. "तुझ्या बापाची स्वतःची जमीन नाही , दूध तूप करण्यासाठी स्वतःच जनावर नाही "दुसऱ्यांच्या शेतात काम करायचंआणि त्यातच घर चालवायचं. शेतात काम करून जे पैसे मिळतात  ते सर्व पैसे घरातल्या तेल, चटणी ,मिठाला  खर्च होतात.
रमेश," आई मला आज भूकच नाही मी आज जेवणारच नाही. मला पिठल भाकरी नको".
रमेश चे बाबा, नको तर हो बाहेर उपाशीच झोप....
आई,'आहो काय बोलताय तुम्ही.
रमेश,"रागाने करा बाहेर जातो आणि अंगणामध्ये अंथरून टाकून उपाशीच झोपून घेतो.
सकाळी सकाळीच रमेश चे मित्र त्याच्या घरी येतात.
रमेश येतोस का गडावर?
रमेश गडावर कशासाठी, मी कधीच गेलो नाही तिथे.
रमेश चे मित्र अरे चल असच फिरवून येता.
रमेश आईला विचारतो आई जाऊ का ग गडावर फिरायला मित्रांच्या बरोबर?
आई," हो पण लवकर घरी ये.
मित्रांच्या सोबत रमेश गडावर जातो. गडावर गेल्यानंतर तिथे शंभर रुपयात पिठलं भाकरी अशी लिहिलेली तो पाटी वाचतो. रमेश आश्चर्यचकित होऊन स्वतःशीच बोलतो शंभर रुपयात पिठलं भाकरी! ...
म्हणजे आई रोज मला जे जेवण देत होती त्याची किंमत शंभर रुपये होती.
रमेश पिठलं भाकरी केंद्रात जातो आणि बघतो तर काय पिठलं भाकरी खाण्यासाठी अनेक लोकांची गर्दी झाली होती गडावर जाणारा प्रत्येक जण तिथे थांबून पिठलं भाकरी खात होता.
रमेश गडावर न जाता अर्ध्यातूनच धावत पुन्हा घरी जातो व आईची माफी मागतो.
आई," अरे काय झालं कशाबद्दल माफी मागतोस तू ?
रमेश ,"अग रात्री मी पिठलं भाकरी न खाता झोपलो ना म्हणून.....
आई," बर आता जेवण कर बरं... हे बघ वांग्याचं भरीत आणि भाकरी आणि मिरचीचा ठेचा केलाय.
रमेश मस्त जेवण करतो आणि आईला बोलतो आई उद्या मला एक डब्बा भरून पिठलं आणि दहा पंधरा भाकरी टाकून दे.
आई," कशासाठी ?तुला तर पिठलं भाकरी आवडत नाही ना?
आई हो गं तू दे तर तुला ते मी संध्याकाळी आल्यानंतर सांगेन.
रमेश,"पिठलं भाकरी घेऊन गडावर जातो. आणि तो पिठलं भाकरी ८० रुपयाला विकतो.
तीन-चार वाजेपर्यंत तो घरी येतो संध्याकाळी आई शेतातून घरी येते त्यावेळी तो आईच्या हातात आठशे रुपये ठेवतो.
आई," एवढे पैसे कुठून आणलेस तू?
अग आई तू मला सकाळीच पिठलं भाकरी दिली होतीस ना करून ती मी त्या गडावर जाऊन विकली त्याचे हे आठशे रुपये आहेत.
रमेश चे बोलणे ऐकून आईला खूप आनंद होतो.
दुसऱ्या दिवशी आई त्याला पिठलं भाकरी सोबतच मिरचीचा ठेचा, वांग्याचे भरीत आणि २५ ते ३० भाकरी
बांधून देते.
रमेश ते सर्व घेऊन गडावर जातो सर्व गडावर येणाऱ्या माणसांना रमेशने आणलेले जेवण खूपच आवडत असते.
नंतर रमेश महिन्याभरातच स्वतःचे पिठलं भाकरी केंद्र गडावर सुरू करतो.