Login

पण जिंकणं ही कधी कधी भारी वाटतं ...

आंनद स्वतः " इरा " कडून मिळालेला ट्रॉफी चा

      पण जिंकणं ही कधी कधी भारी वाटतं … 

   

" जिंकण्यासाठी खेळलो न्हवतोचं कधी ..

    पण जिंकणं ही कधी कधी भारी वाटतं "

     

        लिहिणं ही अशी कला जी सर्वांकडे मुळींच नसते , मनातले भाव कागदावर रेखाटनं दिसतं तितकं सोपं नव्हेचं मुळी …  मलाही खुप वाटायचं लिहावं आपण , काहीतरी लिहावं .. अगदी दुसरी तिसरीत असल्यापासून , पण लिहिण्यासाठी ही आदी आपण वाचन समृद्ध हवं .. हे तेव्हा नाही आता समजतंय .. शब्द मांडता आले पाहिजेत .. एकदा एका लिखाण स्पर्धेत लिहावं म्हंटल … लिहिलं ..  तोडकं मोडकं लिहिता लिहिता शब्दांची थोडीफार जुळनी जमू लागली …  त्या बरोबर हे ही समजलं , खुप जण आहेत लिहिणारे ..  अगदी तोडीस तोड ..  शब्दरचना मनवेधक .. त्याबरोबरच लिखाणासाठी व्यासपीठं ही भरपूर आहेत हे ही समजलं ..

      ,पण या एका वर्षात मी बघितलेला अनुभवलेला हे एकच व्यासपीठ असं आहे , जे स्वतःही अगदी नवखं आहे … पण त्याच्या सर्वेसर्वा यांच्या मेहनतीमुळे खुप कमी वेळात हे नावाजलं गेलं … ते म्हणजे  "इरा"  ब्लॉगिंग चं व्यासपीठ .. जिकडे लिहणाऱ्यांच्या भावना , मतं समजून घेतल्या जातात  ..  लिहिणारेच नव्हे तर वाचक वर्ग ही आपली मते दिलखुलासपणे मांडू शकतो . प्रत्येक एका लेखिकेस प्रेरणा मिळते इकडे .. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे लेखिकेकडून विना शुल्क मध्ये लिहून नाही घेतलं जात ...प्रत्येकीला आपल्या लिखाणाचा मोबदला त्यांच्या लेखनाची वाचन सरासरी यावरून मिळतो ..

               आणि हा लेख लिहिण्याचा प्रपंच या साठी की " इरा " व्यासपीठावर लेखन स्पर्धा ही आयोजित होतात . लिखाणात काही कारणास्तव दिरंगाई होत असली तरी , यांच्या लिखाण स्पर्धेत अगदी हौसेने मी भाग घेते … त्यातील तीन स्पर्धेत विजयी होते मी .. चार पाच दिवसामागे फोन आला , वैशाली मॅम बोल रहे हो क्या आप ,मी म्हणलं हा ..

     आपका कुरिअर आया हे .. मी हॅपी कारण मला माहित होतं , मी काही मागवलं नाही .. कोणी पाठवणार ही नाही .. नक्कीच लिखाणाशी निगडित काही असेल ..  कुरिअर हातात पडलं . मिस्टरही कधी नव्हे ते जेवायला घरी आलेले तेव्हा , म्हणलं थांबा , काय आलंय पार्सल बघू .. उघडून बघते तर "  इरा " कडून मला मिळालेली अगदी आकर्षक दिसणारी  ट्रॉफी ,प्रमाणपत्र …

       मी तर खुश होतेच , पण कधी नव्हे ते म्हणजे माझ्या लिखानालाही सपोर्ट न करणारे माझे मिस्टर खुश..  ट्रॉफी बघून ..

     म्हणू लागले मग पार्टी कधी  देताय ..  ऐकून काय बर वाटलं म्हणून सांगू , जसं काही माझ्या लिखाणाला ग्रीन सिग्नल मिळाला त्यांच्या कडून …

    मुली तर विचारूचं नका , मम्मीला ट्रॉफी मिळाली , ट्रॉफी मिळाली सगळ्यांना सांगत होत्या .. मोठी तर मैत्रिणीला घरी घेऊन आली , मम्मी ला मिळालेली ट्रॉफी दाखवण्यासाठी ...खरं तर माझ्यापेक्षा माझ्या मुली जास्त खुश होत्या माझ्या ट्रॉफीसाठी  .  ( आणि त्यांनी ही ट्रॉफी महाराष्ट्र वरून माझ्याकडे हरयाणा ला कुरिअर केली होती , हिचं खुप मोठी गोष्ट होती) 

      मोठी मुलगी लगेच म्हणते , मम्मी पण माझ्याकडे दोन आहेत हं ट्रॉफी , तुझ्याकडे एकचं ( तिचं म्हणणं मम्मीलाही ट्रॉफी मिळाली )  .. तोवर छोटी म्हणते , मम्मी ही ट्रॉफी माझी आहे ना गं .  मी घेऊ का ..

           म्हणजे काहीजणांना ज्यांना अशा गोष्टीत रस नसतो  , त्यांना ही ट्रॉफी मिळणं , जिंकणं वगैरे सगळं शुल्लक वाटतं … पण आपण , जे आपण स्वतः मिळवलं आहे , त्यात खुप खुश होतो …

      

     आणि या सगळ्या साठी सगळ्यात आदी मनापासून आभार इरा च्या कर्ता धर्ता , सर्वेसर्वा " संजना मॅम ".. नि त्यांच्या बरोबरीने इरा चा भार समभळणार्या  योगिता मॅम ….

    खुप बरं  वाटतं कोणी आपलं कौतुक करतं … या दोघीही स्वतः उत्तम लेखिका आहेत , तरी पेजवरील लेखिकांना कायम सपोर्ट , त्यांच्या लिखानाचं कौतुक , नि लेखिकांना  मिळणार मानधन इमानेइतबारे पूर्ण करत आहेत .. बरं वाटतं अशा धाडसी , कर्तृत्ववान , हुन्नरी स्त्रियांच्या संपर्कात राहणं ..

       "  इरा " साठी एकचं सदिच्छा , संजना मॅम नि आपल्या हिमतीने इरा नामक जे रोपटं फुलवलं आहे ते असंच उत्तरोत्तर बहरत राहो ..  एक मोठा अभेद्य वटवृक्ष बनो … आणि असंच नवख्या लेखकांना प्रोत्साहन देत राहो ..

   पुन्हा एकदा … खुप खुप थँक्स संजना इंगळे मॅम 

          योगिता टवलारे  मॅम .. ❤????????????

 Thnk u 

फोटो : obviously " इरा " ची मिळालेली awsm  ट्रॉफी नि one an only "मी"

             © vaishu patil 




 

      

0