Login

हिरवळ

Poem About Nature
हिरवळ

डोंगर माथा उंच असा हा
नागमोड्या गंधित वाटा
मोहक हिरव्या रानातून
वाहे सळसळत्या शुभ्र लाटा

आसमंतात पसरविली
चादर रेशमी धुक्याने
दऱ्यांमध्ये ही गूंजतो
नाद वाऱ्याचा नव्याने

असे लोभस रूप सृष्टीचे
घाली मोरपंखी पैंजण
मस्तकी तिच्या रेखीले
नभाने हे केशरी गोंदण

उडे आनंदाचे थवे
वर तेजस्वी अंबरी
मन पुलकित व्हावे
जणू हिरवा खण जरतारी

झुळझुळतो पहाट वारा
सूमनांचा हा मोहक परिमळ
अशीच राहावी जीवनी
मऊ मखमली हिरवळ

छाया राऊत अमरावती
8390086917