Login

मन उधान वाऱ्याचे भाग १०

मनातल्या अबोल भावना
अनोळखी वाट
वाट ही अनोळखी
वाकडे वळण घेणारी
सोबतीला निसर्ग हिरवा
माझी मीच वारेकरी

गर्द झाडांचा बाजूने वेढा
पक्ष्यांची ही मंजुळ गाणी
अनोख्या या वाटेवर
फळांनी भरलेली मेजवानी

चंद्र तार यांची साथ मला
मग कशाला कोणाची भीती
आशेचा दीपक मनात घेऊन
जोमाने लडेल नवीन आयुष्यासाठी...

एकता निलेश माने