Login

विष! (अलक )

विष एक रहस्य!
ती बेधुंद होऊन नाचत होती. त्याची पावलं तिच्या दिशेने पडत आहेत याचा आभास तिला झालेला होता. तो मदमस्त अवस्थेत तिच्याजवळ आला, तोच तोल गेल्यासारखं दाखवत ती त्याच्या मिठीत कोसळली. त्याचे बाहू आनंदाने तिच्या पाठीवर जाणार त्यापूर्वीच तिची तीक्ष्ण नखं त्याच्या मानेत रुतली होती. मृत्यूला मिठी मारणं म्हणजे काय ते त्याला याक्षणी समजतं होतं, जेव्हा तिच्या नखातलं विष त्याच्या शरीरात भिनलं होतं.


निशिगंधा..
0

🎭 Series Post

View all