"आता शवासन करा व्यायामामुळे जिथे जिथे ताण निर्माण झालेला आहे तिथे जाऊन तो शिथिल करा ,मनामध्ये विचार येत असतील तर त्याला जाऊ द्या .विचारांवर विचार करू नका, विचार आला आणि विचार गेला ."आमची योगशिक्षिका नीलम शिकवत होती. गेली दोन वर्ष मी नियमितपणे तिच्याकडे योगासने शिकायला जात होती. घरी कितीही नियमित करायचे म्हटले ,तरी काही ना काही अडचणी येतच राहतात म्हणून योगा क्लास लावला होता .आठवड्यातून चार दिवस का होईना नियमितपणे योगासने ,प्राणायाम होत होता .
मला शवासन तर फारच आवते.सगळ्या शरीराला रिलॅक्स करणे, आणि शांतपणे पडून राहणे म्हणजे खरोखरच एनर्जी बूस्टर ठरते. माझ्या दिवसभराच्या ताणावर हे रामबाण औषध असते.आणि मी खरोखरच ते मनापासून करते.अशातच एका ठिकाणी मला सकारात्मक विचारसरणीचा ऑनलाईन कोर्स करण्याची संधी मिळाली ,आणि त्याच्यामध्ये विचारांवर नियंत्रण ठेवणे किंवा विचार कसे करावेत याविषयी काही मार्गदर्शन मिळाले. आता ही योगासनं मधलं विचारांवर विचार करू नका ,आणि सकारात्मक विचार या दोन्हीची सांगड घालून काहीतरी निराळं करण्याची आस मला लागली. मग मी खरोखरच विचारांवर कसा विचार करायचा यासाठी विचार करायला सुरुवात केली .यातीलगंमतीचा भाग सोडा.आणि आशय पहा.
सगळ्यात आधी माझ्या आयुष्यातल्या सकारात्मक घटना लिहून काढल्या ,आणि मला आयुष्यात काय व्हायला हवं आहे, हेही लिहून काढले त्यामुळे काय विचार करायचा यासाठी दिशा मिळाली .आणि हे करताना हातून घडलेल्या चुका, आणि मनातून येणारे नकारात्मक विचार हे ही लिहून काढले ,आणि ह्याच्यावर मोठा क्रॉस केला की ह्या गोष्टीवर मी आता, वर्तमानात किंवा भविष्यात विचार करणार नाही .
काय होते हे सकारात्मक विचार- मला मिळालेला उत्तम अन्न वस्त्र निवारा ,आणि त्याच प्रमाणे अनेक सुख सुविधांनी युक्त असे घर याविषयी मी निसर्गाची आभार व्यक्त करायला सुरवात केली. आणि त्याच बरोबरीने माझ्या आजूबाजूला माझ्यावर प्रेम करणारी जी माणसे आहेत ,त्यांच्याविषयी ही आभार व्यक्त करणे ,मी सुरू केले आणि खरोखरच फरक जाणवायला लागला माझ्याकडे काय नाही आहे ,यापेक्षा काय आहे याची यादी खूप मोठी होत होती
पुढची स्टेप होती मनामधल्या इच्छा-आकांक्षांना आकार देण्याची, यात करिअर संबंधी असेल, माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीसंबंधी असेल, बरेच दिवस करायच्या राहून गेलेल्या गोष्टी असतील, त्याच बरोबर जे घडावं असं वाटत असेल, तिथे फिरायला जायचं आहे असं वाटत असेल ,या गोष्टींवर विचार करायला सुरुवात केली .आणि खरोखरच त्यातल्या काही घटना लवकर घडायला ही लागल्या.
ह्या निसर्गाच्या आणि सकारात्मक विचार सरणीच्या ऐकण्यावर विश्वास बसायला लागला .खरेतर विचारांवर विचार करू नका ,असा विचार करता करता ,मी मनामध्ये फाक्त ,सकारात्मक विचार जास्तीत जास्त कसे येतील ,अशा पद्धतीने माझ्या मनाला अशा पद्धतीने विचार करण्याचे वळण लावले ,मनाला ट्रेनिंग द्यायला सुरवात केली.सुरुवातीला बहिणाबाईंच्या म्हणण्याप्रमाणे "मन वढाय वढाय,उभ्या पिकातल ढोरं "असे म्हणत ते कुठेतरी भरकटायला लागायचे ,पण आता किमान 40 ते 45 टक्के मी माझ्या विचारांवर नियंत्रण मिळवले आहे ,असे मला वाटते आहे.
ज्या ज्या वेळेला मनात विचार करायचं वेळ येते, त्यावेळी सकारात्मक विचार येतील किंवा काय घडावे वाटतं ,याविषयी विचार येतील किंवा जे काही माझ्या जवळ असणारे चांगले मुद्दे आहेत, चांगले सोयीसुविधा आहेत त्याविषयी विचार येईल याची मी काळजी घेत आहे. करून बघा तुम्ही हा प्रयोग विचारांवर विचार करण्याचा .
भाग्यश्री मुधोळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा