Login

प्र-बोधकथा-११

वेळेच्या आधी तयारी केलेली चांगली हे सांगणारी प्र-बोधकथा

प्र-बोधकथा- ११

शीर्षक- वेळ

“ छ्या ! कितीही वाचलं तरी काहीच लक्षातच राहत नाही. ” वैतागत, चिडत पुस्तक आपटत समीर म्हणाला.

त्याची ताई रेवा त्याच्या डोक्यात टपली मारत म्हणाली, “ पुस्तक का आपटत आहेस? जर वेळेच्या आधी अभ्यासाची तयारी केली असती तर ही वेळ आली नसती. ”

“ काय गं, ताई, मला परीक्षेचं टेन्शन आलंय आणि तुझं आपलं काहीतरीच चालू आहे? ” तो तोंड वेडवाकडं करत म्हणाला.

“ तेच तर सांगतेय. आई, बाबा, मी तुला सांगत होतो की मोबाईल, टी.व्ही पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास कर, तेव्हा तर तुला ती कटकट वाटतं होती; पण आता टेन्शन घेऊन काय उपयोग? असो, अजून वेळ आहे उद्यापर्यंत, टेन्शन न घेता मन लावून अभ्यास कर, व्यवस्थित देशील परीक्षा. ” रेवा त्याला समजावत म्हणाली.

“ साॅरी, ताई. इथून पुढे आधीच तयारी करेन, तुमचं सगळ्याचं म्हणणं लक्षात ठेवेन. मोबाईल व टि.व्ही. पण कमी पाहेन. ” समीर मान खाली घालून बोलला.

रेवाने हसून त्याच्या पाठीवर थोपटत प्रेमाने हात फिरवलं.

बोध:- १) वेळेच्या आधी तयारी केलेली कधीही चांगली असते.
२) मोठी माणसे आपल्या भल्यासाठी सांगतात हे वेळीच समजून घ्यावे.