Login

प्र-बोधकथा-१२

राहणीमानावरून कोणाला बोलू नये हे सांगणारा प्र-बोधकथा

प्र-बोधकथा-१२

शीर्षक:- राहणीमान

काॅलेजमधील मैत्रिण हेमाला इतक्या दिवसांनी पाहून सीमा तिला कुत्सितपणे हसत डोळे फिरवत म्हणाली,”हं, अजूनही तशीच आहेच, काकूबाईसारखी.”

हेमा एकदम साध्या पेहरावात होती. काॅटनची सिंपल साडी व त्याला मॅचिंग असा लांब कोपऱ्यापर्यंतचा ब्लाऊज, सैलसर लांब वेणी, कपाळावर छोटी लाल टिकली व खांद्यावर एक छोटीशी पर्स. तिने फक्त स्मितहास्य केले.

“मॅम, चला, गाडी चालू झाली.” ड्रायव्हरच्या वेशातला एक माणूस हेमाला आबदीने म्हणाला.

ती सीमाकडे पाहत हसत म्हणाली,”हो, आहे मी अजूनही काकूबाई. पण राहणीमानावरून दुसऱ्याला बोलण्याची तुझीही ती सवय अजून गेली नाही.”

सीमा काही बोलणार तोच ती त्या लाल दिव्याच्या गाडीत बसून निघून गेली.

सीमाचे डोळे जागीच मोठे झाले. धूळं खात जाणाऱ्या गाडीला पाहत राहिली.

बोध:- राहणीमानावरून कोणाला बोलू नये.