प्र-बोधकथा:-१४
शीर्षक:- सन्मान
मोहन त्याच्या वडिलांसोबत महाविद्यालयात येत होता. त्याला पाहून मित्र भरत आश्चर्याने म्हणाला,” अरे, हे तुझे बाबा आहेत का?”
“हो, का? काय झाले?” मोहन प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाला.
“हे तर त्या दिवशी गटार साफ करत होते.” भरत खोचक हसत म्हणाला.
त्यावर मोहन अगदी शांतपणे हसत म्हणाला,”हो, करतात माझे बाबा गटार साफ. स्वच्छतेचे कठीण काम करतात जे की भल्याभल्यांना जमत नाही आणि मला अभिमान आहे की मी अशा एका स्वच्छता कर्मचारीचा मुलगा आहे जे या माध्यमातून देशसेवेचे काम करतात.”
भरत तर त्याच्या या बोलण्याने निरुत्तर होत खाली मान घातली पण मोहनचे बाबा मात्र त्याचे सन्मानाचे बोल ऐकून भारावून गेले.
बोध:- १)काम कोणतेही असू दे त्याचा सन्मान करावा.
२)कोणत्याही कामाला कमी लेखू नये. काम कामच असते.
©️ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा