प्र-बोधकथा-१५
शीर्षक:- टापटीपपणा
“ये आई, माझी वही कुठे आहे? अगं माझं पुस्तक आणि पेनपण सापडतं नाही. छी! बाबा एक वस्तू सापडत नाही. कुठे आहे सांग ना..” राज सगळे वस्तू विस्करत इकडे तिकडे टाकत वैतागत म्हणाला.
“अरे, अभ्यास तूच करतोच ना. तूच बघ मग ना मग.” त्याची आई किचनमधूनच म्हणाली.
“अगं, दे ना तू शोधून पटकन, मला उशीर होतोय, आईऽऽ” तो पुन्हा चिडचिड करत आईला मोठ्याने आवाज देत म्हणाला.
पदराला हात पुसत आई किचनमधून बाहेर येत त्याचे सगळे साहित्य शोधून त्याला देत म्हणाली,” आज मी शोधून दिले, राज; पण रोज शोधून नाही देणार. किती वेळा तुला सांगितले वस्तू जागच्या जागी ठेवत जा म्हणून. पण तुला ऐकायचं नसतं आणि सगळं घर डोक्यावर घ्यायचं. ”
“साॅरी, आई इथून पुढे लक्षात ठेवेन.” तो चेहरा पाडत मान खाली घालून म्हणाला.
“हम्म, फक्त म्हणू नकोस आचरणातपण आण. ” आई त्याला जवळ घेत म्हणाली तसे त्याने हसत होकारार्थी मान डोलवत तिला बिलगला.
बोध:- १)टापटीपपणा जीवनात खूप महत्त्वाचा असतो.
२)वस्तू जागच्या जागी ठेवल्या की शोधाशोध केली करावी लागत नाही.
३)फक्त बोलू नये ते आचरणातही आणावे.
२)वस्तू जागच्या जागी ठेवल्या की शोधाशोध केली करावी लागत नाही.
३)फक्त बोलू नये ते आचरणातही आणावे.
©️जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा