Login

प्र-बोधकथा-१६

मान व संस्कार जपा सांगणारा प्र-बोधकथा

प्र-बोधकथा:-१६

शीर्षक:- मान व आदर

सूटाबूटात रूबाबदार चालत एक तरूण चालत ऑफिसमध्ये आला. त्याला पाहून केबीन बाहेर बसलेले शंकर लगबगीने उठत नमस्कार सर, म्हणतं आबदीने हात जोडले.

त्या तरुणाने त्यांचे ते जोडलेले हात पटकन खाली करत तो मनःपूर्वक त्यांच्या पायांशी झुकत त्यांचा आशिर्वाद घेत म्हणाला, “बाबा, हात नका जोडू. आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे.”

त्यांचे डोळे भरून आले ते त्याला गळ्याशी लावून घेत म्हणाले,”बेटा, इथे मी शिपाई आणि तू माझा बाॅस आहेस. मी माझं काम करत होतो. ज्याचा मान व आदर त्याला द्यावा ना ; परंतु तू माझे संस्कार जपलेस म्हणून बाप म्हणून मी आता गळ्याशी लावून घेतले.”

बोध:- १) ज्याचा मान व आदर त्याला द्यावा.
२)वयाचा व नात्याचा आदर करणे म्हणजे संस्कार हि असावा.