Login

प्र-बोधकथा-१८

प्रामाणिकपणा सांगणारा प्र-बोधकथा

प्र-बोधकथा-१८

शीर्षक:- प्रामाणिकपणा

“काका, हे घ्या.” दुकानदाराला पैसे देत राजू म्हणाला.

तो थोडा गोंधळून त्याच्याकडे पाहत म्हणाला,”कशाचे पैसे? तू तर तुझ्या सामानाचे मगाशीच पैसे दिलेस ना. मग हे पुन्हा पैसे कशाचे? काही हवं आहे का?”

“काही नको. अहो, काका हे पैसे तुमचेच आहेत.” राजू हसत म्हणाला.

“माझे पैसे? ” दुकानदार डोकं खाजवत प्रश्नार्थक नजरने डोळे वर करून विचारत म्हणाला.

“हो, तुमचेच पैसे. तुम्ही जास्तीचे पैसे दिले होते. मी जाता जाता मोजत होतो. तर ते जास्तीचे होते. तेच द्यायला आलो. बहुतेक मगाशी गर्दीमुळे तुमच्या लक्षात आले नसेल.” तो पुन्हा स्मित हास्य करत म्हणाला.

त्या दुकानदाराला त्याचं कौतुक वाटलं. कारण वयाने लहान होता पण त्याचा प्रामाणिकपणा त्याच्या मनाला भावला. त्याने बक्षीस म्हणून राजूला चाॅकलेट देऊ केले; परंतु त्याने नम्रपणे नकार देत पैसे देवून तेथून निघून गेला.

बोध:- लहान असो वा मोठे प्रामाणिकपणा असावा.