प्र-बोधकथा-१९
शीर्षक:- वाचाल तर वाचाल
“आत्तू, तुला इतकं सगळं कसं माहिती गं? तुला किती छान छान गोष्टी सांगता येतात, कवितापण किती छान करतेस. शब्द तर किती मस्त असतात. कसं गं सुचतं तुला हे सर्व? ” सर्वेश त्याच्या हनवुटीवर हाताची मूठ ठेवतं म्हणाला.
“वाचन बाळा, वाचन. जेवढं वाचाल ना तेवढी माहिती मिळते. त्यामुळे शब्दसाठा वाढतो, नवीन शब्द माहित होतात. आपण वाचून समजून घेतलं तर दुसऱ्यालापण छान समजावून सांगू शकतो. शब्दांचा संग्रह करता येतो व त्यातूनच शबदगुंफणही करता येते. समजलं का? ” आत्या त्याचं नाक ओढत हसत म्हणाली.
“वाॅव! मग तर मी पण वाचणार आता.” तो उत्साहाने हसत म्हणाला.
“फक्त वाचायचे नाही, वेड्या. त्याचा अर्थही समजून घ्यायचा म्हणजे दुसऱ्याला अर्थ सांगता येईल.” आत्या त्याच्या डोक्यावर थोपटत त्यावरील केस विस्कटत हसत म्हणाली.
“हो, आत्तू, नक्कीच.” तो हसत म्हणाला.
बोध:-१) वाचनाने ज्ञान वाढते, शब्दांचा संग्रहही वाढतो.
२)फक्त वाचू नये त्याचा अर्थही समजून घ्यावा.
@ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा