प्र-बोधकथा-२
शीर्षक:- मातीशी जोडलेली नाळ
“ काय रं, समद ठीक हाय न्हवं, श्यात काय म्हणतयं तुझं? ” शरदराव सदाला म्हणाले.
त्यावर सदाही हसत हात जोडत म्हणाला,”तुमचीच किरपा हायजी, सायब, समद बेस हाय बघा.”
नुकतेच सभेत शुध्द भाषेत बोलणारे शरदराव सदाशी अगदी आत्मियतेने अस्सल गावरान भाषेत बोलत होते. वरील संभाषण ऐकून लोक चाट पडले.
त्यांचे ते चेहऱ्यावरील प्रश्न पाहून शरदराव म्हणाले,”गावच्या मातीशी नाळ जोडलेली आहे,मग गावची भाषा कशी विसरेन, कितीही मोठा माणूस झालो तरी.”
बोध:- गावरान भाषा असो वा शुध्द भाषा. भाषा भाषाच असते. मातीशी जोडलेली नाळ कधी विसरायची नसते.
©️ जयश्री शिंदे