Login

प्र-बोधकथा-५

स्त्री कोमल आहे पण कमजोर नाही यावरील प्र-बोध

प्र-बोधकथा-५

शीर्षक:- स्त्री कोमल आहे पण कमजोर नाही.


“किती पैसे झाले भाजीचे?,” कमलेश भाजीवालीकडे बघून म्हणाला.

तिला मात्र त्याची ती नजर चांगली वाटली नाही.

“ दोनशे रुपये झाले, दादा ”, ती मुद्दाम दादा शब्दावर जोर देऊन बोलली.

तो थोडा तिरकस हसत पाचशेची नोट तिच्यासमोर धरली. तिने उरलेले पैसे दिले पण ते घेताना मात्र त्याने तिचा हात मुद्दाम धरला.

तिला आधीच त्याची ती विचित्र नजर आवडली नव्हती. त्याने आता हात धरलेला पाहून तिचं डोक सटकलं. “ हात सोडा माझा! दादा म्हटलं तुम्हाला कळतं नाही का?,” ती अतिशय रागात म्हणाली.

कलमेशने आणखी जोरात हात दाबला. आता मात्र तिने हात जोरात ओढून सोडवून घेतलं. सनदिशी त्याच्या कानाखाली ठेवून दिली आणि म्हणाली, ” भाजीवाली असली म्हणून काय झालं, ज्या हाताने भाजी खुडते, त्याच हाताने इज्जतीवर घाव घालण्या-यांचे हात खुडून टाकायला टाकण्याची ताकद आहे, हे विसरू नका. ”

बोध- १) स्त्री कोमल आहे पण कमजोर नाही.
२) वेळीच समोरच्याची नजर ओळखून समज द्यायला हवी.