Login

प्र-बोधकथा-७

भेट कोणतीही असो भेट ही भेटच असते हे सांगणारा प्रबोध

प्र- बोधकथा:-७

शीर्षक:- भेट

“रजनी, वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.” मोगऱ्याचा गजरा रजनीच्या हातात देत सोहम म्हणाला.

तिने तो गजरा हातात घेऊन त्याचा सुगंध घेतला व हसत त्याला आरशासमोर उभे राहत म्हणाली, ”माळा ना माझ्या केसांत तुमच्या हाताने.”

त्याने तो गजरा तिच्या केसांत माळला. पण त्याचा चेहरा तिला उदास दिसताच ती त्याला म्हणाली . “अरे, काय झाल? आज तर आनंदाचा दिवस आहे, तुम्ही असे उदास का? ”

तो दुःखी चेहरा करत म्हणाला,”रजनी, तुला या गजऱ्याशिवाय काहीच भेट नाही देऊ शकतं.”

“मग काय झालं? असं का बरं म्हणता. तुम्ही तर खूप अनमोल भेट दिलीत मला. हा सुगंधी मोगऱ्याचा गजरा बाकी सगळ्यां भेटीपेक्षा मोठा आहे कारण ते तुम्ही खूप प्रेमाने आणलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही आणि तुमचं प्रेम माझ्या सोबत आहे. हेच माझ्या वाढदिवसाची सर्वांत मोठी भेट आहे.” ती आनंदाने त्याला बिलगून म्हणाली.

तसे त्याचे डोळे भरून आले आणि आनंदाने त्याने तिला कुशीत घेतले.

बोध:- १) भेट लहान असो की मोठी भेट ही भेट असते.

२) प्रेमाने दिलेली भेट अनमोल असते.

३) छोट्या गोष्टीतही आनंद असतो.