Login

प्र-बोधकथा-८

सुंदरतेचा गर्व करू नये सांगणारा प्र-बोध

प्र-बोधकथा-८

शीर्षक :- सुंदरतेचा गर्व

“ माझं खूप प्रेम आहे,अमोल तुझ्यावर”रती खूप हिम्मत करून कस बस आपल्या मनातलं अमोलसमोर गुलाब पुढे करत म्हणाली.

तो कुत्सित हसत म्हणाला, “स्वतःला कधी पाहिलंस का आरश्यात? कुरूप, कोळश्याची खाण कुठली?” यावर ती काही न बोलता भरल्या डोळ्यांनी निमूटपणे निघून गेली.

काही दिवसांनी अमोलचा अपघात झाला. स्वतःला आरश्यात पाहताच त्याला तेच बोल आठवले जे त्याने रतीला बोलले होते.

बोध:- सुंदरतेचा गर्व करू नये.सुंदरता कायम राहत नाही.