Login

प्र-बोधकथा- ९

संशय किती घातक असतो सांगणारा प्र-बोधकथा

प्र-बोधकथा-९

शीर्षक:- संशय

शारदा एक हसतमुख परिचारिका सगळ्यांशी हसत खेळत बोलण्याने तिचा नवरा श्याम तिच्यावर सतत संशय घ्यायचा.

"अरे,कधी भेटायचं आपण? हे घरी नाहीत,येतोस का?बरं ये, मी वाट पाहीन!” तिने फोन ठेवला.

तितक्यात दंड पकडत तिचा दारुडा आणि संशयी नवरा तिला जाब विचारू लागला, तिने कितीदा सांगितले की चुलत भाऊ होता म्हणून. फोनही लावून दिला तरी त्याने विश्वास नाही ठेवला.

हाच वाद इतके विकोपाला गेला की त्याने तिचे डोके जोरात भिंतीवर आदळले. ती जागीच गतप्राण झाली.

बोध:- संशय किती घातक असतो. प्रसंगी एखाद्याचा जीव जातो.