Login

प्र-बोधकथा-४

पैसा म्हणजे सगळं काही नसतं हे सांगणारा प्र-बोधकथा

प्र-बोधकथा:-४

शीर्षक:- खरे सुख

छोटी चिमुरडी पटकन तिच्या आईला येऊन बिलगली. तेव्हा तिच्या आईनेही तिला पटकन उचलून घेतलं. त्या छोटीनेही तिच्या आईच्या गळ्यात हात गुंफून गालावर गोड पापी दिली. आईनेही तिच्या गालावर ओठ टेकवले. त्या मायलेकींचा मिलाप पाहून केशवला भरून आलं. तो ही त्यांच्या आनंदात सामील होऊन त्यांना बिलगला.

त्या दोघींना मिठीत घेऊन रडू लागला आणि म्हणाला ,”माफ कर मला शुभदा, पैसा म्हणजे सगळं असतं. पैशाने सगळं जग विकत घेऊ शकतो अस मला वाटलं आणि म्हणून मी मोठ्या तो-यात म्हणालो की तुझी गरज नाही. अवनीला मी एखादी आया ठेवून सुखी ठेवन आणि पैसे असले की मीही सुखात असेन अस वाटलं मला. पण तू निघून गेलीस आणि तेव्हा कळलं सुख म्हणजे काय असते? तुम्ही दोघी माझं सुख आहात.”

शुभदा म्हणाली,”केशव, माफी मागू नका.मला फक्त तुम्हाला हेच सांगायचं की पैसा म्हणजे सगळं काही नसतं. खरं सुख आपल्या माणसाबरोबर राहणं, त्यांच्यावर प्रेम करणं, काळजी घेणं असतं. हे कळलं ना, आता तुम्हाला, झालं तर मग! ”

बोध:- १)आपल्या माणसाबरोबर प्रेमाने राहणं या पेक्षा जास्त सुख कशातच नाही.
२)पैसा म्हणजे सुख नव्हे.प्र