( मागच्या भागात आपण बघितले - नेहाला मुलगी होते आता पुढे )
नेहाला हॉस्पिटलमधून फक्त एकच महिन्याची सुट्टी मिळालेली असते त्यामुळे ती पुढे काय करायचं ह्याच विचारात सतत असे. मुलगी दिसायला खूप सुंदर असते. आणि शांत असते, रीचाच्या घरी कामाला असणाऱ्या मावशी नेहाची डिलिव्हरी झाली म्हणून एक महिना तिथेच राहायला येत असतं. रीचा आणि मावशी मिळून नेहाची चांगली काळजी घेत असतं. नेहाची आईसुद्धा अधून - मधून कॉल करून तीला आराम कर, बाळाची काळजी घे असं सांगत असे.
रीचा सुद्धा तीला अधून - मधून माझे मिस्टर यायच्या आधी तुला इथून जावंचं लागेल असं सतत सांगत असे. रीचा तिच्या बोलण्यावर ठाम असते, नेहा तीला एकदा बोलते पण मी ह्या एवढ्याशा बाळाला घेऊन दुस्र्या नवीन ठिकाणी कशी राहणार, पण रीचा सरळ बोलते, अंगावर पडलं ना कि माणुस सगळं सांभाळायला लागतो, तू ही शिकशील बरोबर.
नेहाची डिलिव्हरी होऊन पंचवीस दिवस होतं आलेले असतात आणि रीचा तीला बोलते तुला पुढच्या महिन्याच्या एक तारखेला हॉस्पिटलला पुन्हा जॉइन व्हायचं आहे ना मग बाळाचं कसं करणार आहेस. ती रिचाला बोलते मला दोन - तीन दिवस दे, मी माझ्या हॉस्पिटलमधल्या मैत्रिणींना कोणी बाळाला सांभाळायला मिळेल कां असं विचारून बघते.
नेहा दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला जाते आणि तिथल्या सगळ्या आया बाई ( मावशी )ना विचारते कि तिच्या बाळाला दिवसा ती हॉस्पिटलमध्ये आल्यावर आठ तास सांभाळायला कोणी तयार होईल कां, तिच्या डोळ्यातलं पाणी बघून एक नाईट शिफ्टवाल्या मावशी बोलतात, मॅडम माझी कायम नाईट शिफ्टच असते त्यामुळे मी दिवसा बाळाला सांभाळू शकेन. आणि मी एकटीच असल्यामुळे घरी कोणी नसतं त्यामुळे कोणी मला काहीच बोलणार नाही आहे.
नेहा बोलते एकट्याच असता म्हणजे...... त्या मावशी बोलतात ती मोठी कहाणी आहे मी घटस्पोटीत आहे सगळं नंतर सांगेन सविस्तर तुम्हाला.
नेहा बोलते बरं तुमचे कोणत्या शब्दात आभार मानू असं मला झालं आहे, त्या मावशी कुंदाताई बोलतात मला एका लहान बाळाचा सहवास मिळणार आहे त्यामुळे मला हे कामं करायला आवडेल. नेहा बोलते बरं चालेल, मी दोन तीन दिवसात रेंटवर हॉस्पिटलजवळचं एखाद घर मिळतं कां ते बघते आणि आपण एक तारखेला शिफ्ट होऊ तिथे.
नेहा घरी येते आणि हे सगळं रिचाला सांगते, रीचा बोलते चला बरं झालं, बाळाची काळजी नाही आता, नेहा बोलते मी उद्या जरा दुपारी बाळ झोपलेलं असताना बाहेर जाऊन हॉस्पिटलच्या जवळपास एखादी छोटीसी रूम भाड्याने मिळते कां ते बघते.. रीचा तीला थांबवत नाही... हो चालेल एवढं बोलून गप्प बसते.
नेहाच्या हॉस्पिटलमधल्या एका मैत्रिणीच्या ओळखीने तीला एक वन आर के रूम भाड्याने मिळतो, ती हॉस्पिटलमधल्या मावशींना सांगून त्यांच्या मदतीने घरातलं थोडंसं सामान घेते. स्टोव्ह, चार - पाच भांडी,थोडसं किराणा सामान असं सगळं खरेदी करते. रीचा तीला एक छोटंसं कपाट भेट म्हणून देते.
नेहाचा निघायचा दिवस येतो, रीचा तीला सोडायला रूमवर जाते, रूम बघितल्यावर रीचा बोलते अगं खूपचं लहान रूम आहे, कसं सांभळशील सगळं, नेहा बोलते आता नशिबावर सोडलंय सगळं, देव आहे पाठीशी होईल सगळं नीट. रीचा बरं बोलून निघते, बाळाला सांभाळणाऱ्या कुंदाताई आलेल्या असतात त्या बाळाला हातात घेऊन त्याचे लाड करत असतात. ते पाहून नेहा सुखावते.
नेहा हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी जायला निघते तेव्हा आधीच कुंदाताई आलेल्या असतात, त्या बोलतात मॅडम तुम्ही निवांत जा कसलीच काळजी करू नका, नेहा सांगते पावडरचं दुध करून तीला पाजाल ना दोन - तीन तासाने..
नेहाचा घरातून पाय निघत नसतो ते बघून कुंदाताई बोलतात मॅडम मला मुलं झालं नसलं तरी मी माझ्या बहिणी - भावांची मुलं सांभाळली आहेत तुम्ही टेन्शन घेऊ नका... आता तुमच्यावर वेळचं अशी आली आहे कि तुम्हाला पण ह्या छोट्याशा जीवाला एकटं सोडून नाईलाजाने नोकरीला जावं लागतंय त्याला आता काय करणार, जा तुम्ही आहे मी.... नेहा डोळ्यातलं पाणी पुसत बाहेर पडते.
इकडे बाळ कुंदाताईकडे छान राहत असतं, पण तिकडे नेहा खूप काळजीत असते, ती दुपारी बारा वाजता कुंदाताईना फोन करते, त्या सांगतात मॅडम मी छोटीला मालिश करून अंघोळ घालून झोपवलं आहे. बाळ आता शांत झोपलंय तुम्ही निवांत राहा, नेहा कुंदाताईना बोलते तुमची पण नाईट शिफ्ट आहे तुम्ही पण आता थोडावेळ झोपून घ्या. त्या हो मॅडम बोलून फोन ठेवतात.
नेहा संध्याकाळी सुटल्यावर घाई- घाईने घरी येते, ती फ्रेश झाल्यावर कुंदाताई लगेच जायला निघतात, त्या सांगतात, बाळ शांत आहे मॅडम, काहीच त्रास दिला नाही छोटीने.
नेहा आता निश्चिन्त होते, पटकन दोन महिने निघून जातात, एके दिवशी कुंदाताई तीला बोलतात मॅडम बाळाचं नाव नाही ठेवलंत कां तुम्ही, नेहा बोलते अरे हो माझ्या ह्या सगळ्या गडबडीत बाळाचं बारसं करायचं राहिलंच, येत्या रविवारी आपण दोघी हॉस्पिटलमधल्या दोन - तीन मैत्रीणि आणि रीचाला बोलावून छोटंसं बारंसं करून घेऊया.
ठरल्याप्रमाणे बारसं रविवारी करायचं ठरतं, घरच्या घरी छोटासा प्रोग्राम केला जातो, बाळाचं नाव ओवी ठेवलं जातं. सगळे बारसं झाल्यावर निघून जातात. आणि रात्री अकरा वाजता बाळं खूप रडायला लागतं, नेहा खूप घाबरते, एकतर ती एकटीच राहत असते, त्यात ती दिवसभर बाहेर त्यामुळे ती शेजार्यांशी जास्त बोलत नसे. ती तिच्या एका नर्स मैत्रिणीला न राहवून कॉल करते, पण ती कॉल उचलत नाही, एवढ्या रात्री कोणाची मदत मिळेल असं तीला वाटतं, ती रडायला लागते, बाळं काही केल्या शांत होतं नसतं.
ती बाळं कां रडतंय ह्याच विचाराने हैराण होते, शेवटी न राहवून ती साडे अकरा वाजता शेजारी एक आजी - आजोबा राहत असतात त्यांच्या दरवाजाची बेल वाजवते, आजी एवढ्या रात्री कोण आहे असं बोलतंच बाहेर येतात.
नेहा रडतं रडतं बाळं खूप रडतंय असं सांगते आजी बोलतात बरं चलं मी येते आजी छोटीला मांडीवर घेतात, तिची दृष्ट काढतात. तिच्या पोटाला थोडासा ओवा चोळून लावतात. आणि मग बाळं बारा वाजायच्या दरम्यान शांत होतं, आजी थोडावेळ थांबून जातात.
नेहा ती पूर्ण रात्र रडतं राहते आणि विचार करत बसते असं पुन्हा झालं तर दरवेळी कोणाला हाक मारायची ती मनात ठरवते असं कां बाळं एवढं रडलं तेचं कळत नाही आहे, कुंदाताईशी उद्या बोलून बघू.
नेहा दुसऱ्या दिवशी सकाळी कुंदाताईना हे सगळं सांगते आणि त्यांना बोलते मी खूप घाबरली होती मला काहीच अनुभव नाही त्यात इकडे जास्त कोणी ओळखीचं नाही, नेहा पटकन कुंदाताईना बोलते, ताई तुम्ही पण एकट्याच राहता ना तुम्ही माझ्याकडे कायमसाठी राहायला याल कां, मला पण सोबत होईल.
कुंदाताई बोलतात चालेल कि मला ओवीबरोबर राहायला आवडेल. मी उद्या सकाळपासून राहायला येते.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - नेहाच्या तुटपुंज्या पगारात तीला घरं चालवणं, कुंदाताईचा पगार देणं, घराचं भाडं देणं कठीण जातं आणि हे असं सगळं निभावताना तिची होणारी कसरत आणि आईपणाची भूमिका निभावताना तिच्या आयुष्यात अजून काय ट्विस्ट येतात, तीला कोणत्या मोठ्या प्रसंगाला सामोरं जायला लागतं )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा