प्रपंच करावा नेटका
दोन लोकांमध्ये मतभेद,राग रुसवा का निर्माण होतात .याचे मूळ कारण काय आहे .तर उत्तर सापडते अपेक्षा . दुसर्याकडून ठेवलेल्या अपेक्षेची उपेक्षा झाली कि मन दुःखी होते त्यातुन त्या व्यक्ती बद्दल थोडा राग किंवा चीड निर्माण होते आणि असे अजून एकदा झाले कि किंवा त्या व्यक्तीकडून थोडेसे जरी काही चुकले कि मग झाली भांडण .आणि ह्या भांडणाला काहीही कारण पुरते . बाहेरून आल्यावर पाणी दिले नाही म्हणून सुद्धा शुल्लक कारण मोठ्या भांडणाचे कारण ठरू शकते . प्रत्येकाने आपली जवाबदारी समजून ती जर व्यवस्थित पार पडली बिना कोणत्याही अपेक्षे ने तर हि भांडण किंवा मतभेद होणारच नाहीत
आधी प्रपंच करावा नेटका असे रामदासांनी दासबोधात सांगितले पण स्वतः मात्र “शुभ मंगल सावधान” असे शब्द ऐकल्यावर लग्न मंडपातून पळून गेले होते . म्हणजे त्यांना कळुन चुकले होते प्रपंच करणे इतुका सोप्पा नाही . असो त्यांचा जन्म साधारण नव्हता त्यांचा जन्म वेगळ्या कार्यासाठी झाला होता . सांगायचं मुद्दा असा कि प्रपंच करणे इतके सोप्पे नाही .
समज गैरसमज इतके वाईट आहेत कि आपलं एखाद्यावर जीवापाड प्रेम आहे हे सुद्धा विसरून माणूस त्याच व्यक्तीवर रागावतो .हा राग इतका बॉसि आहे कि तो आपल्या चांगुलपणाला दडपून टाकतो आणि मत्सर निर्माण करतो . आणि सर्व रेलेशन्स खराब होऊन जातात .सर्वांचे मूळ अपेक्षा आहेत . बायको म्हणते काय झालं माझ्यासाठी नवऱ्याने हे केलं तर माझ्यावर काही उपकार नाही करत आहे. मी इथे घरात राब राब राबते .ह्यांना काय होतंय स्वतः पाणी घ्यायला मी काय नोकर आहे ?आल्या आल्या पाणी द्यायला .आणि नवरा म्हणतो मी आठ आठ तास इथे बाहेर काम करतो पैसे कमवून आणतो ,घरात काय पाहिजे नको ते बघतो म काय झालं मला एक ग्लास पाणी द्यायला ?दोघांचे मुद्दे दोघांच्या साईड ने बरोबर आहेत पण असा त्रागा करून प्रपंच करून कसा चालेल . तिची अपेक्षा पाणी त्याचे त्याने घ्यावे आणि त्याची अपेक्षा तिने मला पाणी द्यावे . शुल्लक अपेक्षा भंग झाल्यामुळे लोकांचे diviorce झालेले आपण पहिले आहेत . विदेशात ह्या बाबतीत फार चांगले आहे हि अशी फालतू अपेक्षा कोणकोणाकडून करत नाही .तिने त्याची सेवा केली म्हणजे तिचे त्याच्यावर प्रेम आहे किंवा त्याने तिला दत्तक घेतल्या सारखे सांभाळले म्हणजे त्याचे तिच्यावर प्रेम आहे कसे चुकीचे पॅरामीटर नाहीत . ते दोघे एकत्र राहतात पण तू तुझा मी माझा या कंडिशन वर .
कामवाली बाई वेळेतच आली पाहिजे आणि तिला यायला उशीर झाला कि आपण तिला झापतो. ती म्हणते काय झालं १० मि. उशीर झाला तर? . तीला भांडी घासायची असतात तिची अपेक्षा थोडी कमी भांडी टाकायला काय होतंय .हे चहाचे कप घासले तर काय होईल फुटला कि लगेच ओरडतात .पुन्हा तेच प्रत्येकाने आपले काम वेळेत जवाबदारीने पूर्ण केले तर भांडण होतीलच कशाला ?ते मात्र कोणाला नको असते .त्यात एस्क्युज द्यायचे असतात.
सासू सून मध्ये पण तेच सासू ला सुनेचे काम पटत नाही सुनेने केलेल्या कमला नावं ठेवायची असतात .पण स्वतः मात्र ते करायचे नसते .म्हणजे आपल्याला पाहिजे त्याच पद्धतीने सुनेचे ने ते काम करायचं आणि ते चुकलं नाही पाहिजे .आणि त्याशिवाय त्या कामाचे कौतुक पण कोणी करायचे नाही .चुकून जर सासरे म्हणालेच कि वाह छान चहा झालाय कि इकडे अल्ला पोटात गोळा . माझा नवरा माझं कौतुक न करता सुनेचं कौतुक करतो हे सहनच होत नाही आणि याचा राग नवऱ्यावर न काढता बिचार्या सुनेवर काढला जातो
सुनेला तर सासू च मुळात नको असते कारण तिचे सर्व स्वातंत्र गमवल्यासारखं तिला वाटत असते . ह्या आल्या कि सकाळी लवकर उठा ,वेगळा नाश्ता करा एरवी चहा बिस्कीट हाच नाश्ता असतो .हि जुनी लोकं बिस्कीट खातात का? सुनेच्या झोपेवर ,मेक अप ,कपडे ,मोबाईल चॅट या सर्वच गोष्टीवर CCTV बसतो .
घरोघरी मातीच्या चुली असे हे सगळं सगळीकडे चालू असते. जो तो आपल्या अपेक्षांचे ओझे दुसऱ्यावर लादत असतो .त्या जो पूर्ण करतो तो सहनशील आणि जो पूर्ण करत नाही तो सहन होत नाही. चला तर मग जीवनाकडे एका वेगळ्या अँगल ने पाहू या .दुसर्याकडून शून्य नाही म्हणणार पण कमीत कमी अपेक्षा ठेऊन आपलं काम कर्तव्य म्हणून करताना जवाबदारीने आणि थोड्या प्रेमाने करू आणि बदल्यात काहीही न अपेक्षा बाळगता करू .प्रेमाच्या बदल्यात प्रेमाची अपेक्षा करणं चुकीच नाहीये पण ते प्रेम आहे अपेक्षेने नाही मिळणार ते आपोआप मिळतं .अपेक्षा केली कि त्याची उपेक्षा होणारच आहे आणि मग त्यातली मज्जा निघून जाणार आहे. हे प्रत्यक्षात करणे फार कठीण आहे त्यासाठी पण माझ्या कडे एक उपाय आहे आपण एक दाता बनायचं आणि समोरचा एक भिकारी आहे असे समजायचं .भिकाऱ्याला भीक घातल्यावर आपण त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवतो का ?
(इथे भिकारी म्हणजे तुच्छ अशा भावनेने नाही तर तोच स्वतः एक गरजू आहे तर तो मला काय देणार अशा भावनेने लिहिले आहे ) आपण आपलं काम पूर्ण जवाबदारीने करायचे (कर्मण्येवाधिकाऱस्ते मा फलेषु कदाचन ). त्याचे फळ आपोआप तुम्हाला मिळेलच.
© शीतल महामुनी माने.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा