प्रारंभ...भाग 3 अंतिम
प्रमोदही म्हणाला,
"लोकं काय म्हणतील? आपल्याला आता गरज नाही अशा गोष्टींची, आता तू फक्त आराम कर. फक्त स्वतःचा विचार करू नको. तर समाजाचा विचार कर, जरा आमचाही विचार कर."
"लोकं काय म्हणतील? आपल्याला आता गरज नाही अशा गोष्टींची, आता तू फक्त आराम कर. फक्त स्वतःचा विचार करू नको. तर समाजाचा विचार कर, जरा आमचाही विचार कर."
"आजपर्यंत तुमचा आणि समाजाचाच विचार करत आले आहे. सगळं तुमच्यासाठीच तर केलं, स्वतःसाठी काय केलं मी सांगा. आज जर मी स्वतःसाठी काही करू पाहते आहे तर तुम्हाला त्रास होतोय."
"त्रास होतं नाही आहे पण..." प्रमोद चिडून निघून गेला.
पण शुभांगी ठाम होती.
"माझं आयुष्य मी ठरवणार. मला माझं गाणं परत हवं आहे. लोकं काय म्हणतील याची काळजी नाही मला. आता मी फक्त स्वतःचा विचार करणार आहे. "
तिने तिचे प्रयत्न सुरू ठेवले. सुरुवातीला त्रास झाला पण नंतर हळूहळू जमायला लागलं.
उत्साह वाढला, आत्मविश्वास वाढला.

हळूहळू घरच्यांनी पण तिचे प्रयत्न पाहिले.
त्यांना जाणवलं की शुभांगी फक्त त्यांच्या साठी जगणारी बाई नाही, तर एक स्वतःचं अस्तित्व जपून ठेवणारी व्यक्ती आहे.
त्यांना जाणवलं की शुभांगी फक्त त्यांच्या साठी जगणारी बाई नाही, तर एक स्वतःचं अस्तित्व जपून ठेवणारी व्यक्ती आहे.
काही महिन्यांनी शुभांगी संगीताच्या छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ लागली. तिला आनंदी वाटायला लागलं होत.
पहिल्यांदा तिने रंगमंचावर उभं राहून गाणं गायलं तेव्हा संपूर्ण सभागृह शांत झालं होतं.
तिच्या आवाजात अनुभवाचा गोडवा, आयुष्याचा स्पर्श, आणि मनाची खोल जाणीव होती.
तिच्या आवाजात अनुभवाचा गोडवा, आयुष्याचा स्पर्श, आणि मनाची खोल जाणीव होती.
कार्यक्रम संपल्यावर तिला इतक्या टाळ्या मिळाल्या की ती रडू लागली.
प्रमोद आणि मुलंही तिथेच होते. त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान झळकत होता.
प्रमोद आणि मुलंही तिथेच होते. त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान झळकत होता.
त्यांना त्या दिवशी कळलं –
शुभांगी फक्त आई नाही, पत्नी नाही, सून नाही… ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे.
शुभांगी फक्त आई नाही, पत्नी नाही, सून नाही… ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे.
तिला जे हवं होतं ते मिळालं. ती आता आनंदी राहू लागली.
आता शुभांगी दर आठवड्याला गाण्याचे क्लासेस घेऊ लागली.
तिचं छोटं जग तयार झालं होतं – तिथे तरुण मुलंही होते, तिच्यासारख्या काही गृहिणीही होत्या.
सगळे मिळून गायचे, शिकायचे, आणि जगायचे.
तिचं छोटं जग तयार झालं होतं – तिथे तरुण मुलंही होते, तिच्यासारख्या काही गृहिणीही होत्या.
सगळे मिळून गायचे, शिकायचे, आणि जगायचे.
शुभांगी आता इतर महिलांना म्हणायची.
"पन्नाशी हा शेवट नाही, हा नवा प्रारंभ आहे. वय म्हणजे फक्त आकडा. मनात जिवंतपणा असेल तर प्रत्येक दिवस नवा असतो."
"पन्नाशी हा शेवट नाही, हा नवा प्रारंभ आहे. वय म्हणजे फक्त आकडा. मनात जिवंतपणा असेल तर प्रत्येक दिवस नवा असतो."
स्त्रीचं आयुष्य फक्त संसारापुरतं मर्यादित नसतं. जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानंतर तिनं स्वतःसाठी जगायला शिकायला हवं. वयाचं बंधन नसतं – स्वप्नं पुन्हा फुलवता येतात.
समाप्त
ऋतुजा वैरागडकर
ऋतुजा वैरागडकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा