प्र-बोध- ११
शीर्षक:- नजरचूक
शिक्षिका सर्वांना त्यांचे तपासलेले पेपर दाखवत होती.
तेवढ्यात एक मुलगी हातात पेपर धरून चुळबुळ करत त्या शिक्षिकेसमोर आली आणि म्हणाली "मॅडम, तुम्ही मला ह्या प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे, म्हणून दिले पण त्याचे उत्तर हे नाही, तर..."
पुन्हा त्या शिक्षिकेने पाहिले आणि हसत एक गुण कमी करत म्हणाल्या, "माझ्याकडून नजरचुकीने झाले असले तरी, मी चूक केली आहे. हे तू निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुझ्या प्रामाणिकणासाठी हे एक चॉकलेट."
बोध :- चुकीला चूक म्हणण्याचं धाडस हवं.
प्र-बोधकार © विद्या कुंभार
सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा