Login

प्रसंगातून बोध -१२

नम्र स्वर!
प्र-बोध-१२

शीर्षक:- नम्र स्वर

"किती वेळा तुम्हाला सांगून पण समजत नाही का?" एकच गोष्ट खूप वेळा सांगूनही फॉर्म चुकीचा भरलेला पाहून बँकेतला कामगार ओरडला.

त्या काकांचे थरथरणारे हात पाहून  "काका, इकडे या मी तुम्हाला मदत करते." त्या कामगाराच्या शेजारी काम करत बसलेल्या महिलेने त्यांना बोलावले.

एक एक गोष्ट त्यांना विचारून ती फॉर्म भरत होती. बाजूच्या माणसाचा वैतागलेला स्वर आणि तिच्या नम्रपणे विचारणारा स्वर ह्याने आपला एक ग्राहक तुटला नाही ह्याचे समाधान तिथल्या त्यांच्या एका अधिकाऱ्याला त्याच्यासमोरच हे सर्व बघितल्यानंतर वाटले.

बोध:- कोणत्याही परिस्थितीत नम्रपणा सोडू नये.

प्र-बोधकार © विद्या कुंभार

सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all