Login

प्रसंगातून बोध -१५

वाण!
प्रसंगातून बोध-१५

शीर्षक - वाण

"सर्वजणी आज हळदी कुंकवासाठी येऊन गेल्या. छान वाटले." सर्व महिलांना हळदीकुंकू आणि वाण देऊन झाल्यानंतर समाधानाने ती नवऱ्याला म्हणाली.

"नाही गं, अजून एक जण यायची राहिली आहे." तो म्हणाला.

तेवढ्यात पैंजणाचा आवाज आला.
"अगं तू?" समोर आलेल्या आपल्या मैत्रिणीला पाहून मिश्र भावनोद्गार तिच्या तोंडून निघाले.

कारण दुरावा निर्माण झालेल्या मैत्रिणीला हळदी कुंकवाचे वाण देवून पुन्हा त्यांच्या नात्याला पालवी फुटणार होती.


बोध -
१) नात्याला पुन्हा संधी देणे काही वेळेस गरजेचे असते.
२)जुने ऋणानुबंध गैरसमज झाल्यास बाजूला करून एकोपा जपावा.

© विद्या कुंभार

सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all