Login

प्रसंगातून बोध -१

बंधुप्रेम!
*प्र-बोध-१*

*शीर्षक:-हुशार*

"अरे जरा आपल्या लहान बहिणीकडे बघ तिला किती चांगले गुण परीक्षेत आहेत." बाबा विराटचे गुणपत्रक पाहून म्हणाले.

"पण बाबा दादाला तर गायन स्पर्धेत पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे. मला तर अभ्यासाशिवाय काहीच येत नाही." छोटी मनू म्हणाली.

आईनेही होकारात मान हलवली आणि म्हणाली, "माझी दोन्ही मुले कशात ना कशात हुशार आहेत."

विराटने आपल्या बहिणीला मिठी मारून मनोमन तिचे आभार मानले.

प्र-बोध :- १) आपल्या मुलांची एकमेकांशी तुलना करू नये.
२) परिवारात एकमेकांची साथ नकळत दिल्याने
नाते टिकून राहते.

© विद्या कुंभार

🎭 Series Post

View all