प्र-बोध-३
शीर्षक:- बाहेरील अन्न
"मला भूक लागली आहे." छोटी ईशा म्हणाली.
थोड्यावेळाने दाराची घंटी वाजल्याने ईशाच्या आईने आलेले जेवणाचे पार्सल घेतले आणि ताटात वाढून आपल्या नवऱ्याला आणि मुलीला दिले.
ईशाच्या आईला पाहत बाबा म्हणाले, "सारखे सारखे हे असे बाहेरचे खाणे आपल्या मुलीच्या तसेच आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. आजकाल तू घरी जेवण जास्त बनवत नाहीस आणि उद्यापासून एक महिना तरी मला बाहेरून हे असे तेलकट आणि मैदायुक्त पदार्थ पुन्हा घरात दिसायला नको."
"हो, मी लक्षात ठेवेन." ईशाची आई म्हणाली.
*बोध* :- १) बाहेरील अन्न खाण्याचा अतिरेक थांबवावा.
२)सुविधा जरी सुखकर करणाऱ्या असतील तरी त्यामुळे आपल्या आरोग्याला त्याचे दुष्परिणाम होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
२)सुविधा जरी सुखकर करणाऱ्या असतील तरी त्यामुळे आपल्या आरोग्याला त्याचे दुष्परिणाम होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
प्र-बोधकार © विद्या कुंभार
सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा