Login

प्रसंगातून बोध -७

स्वातंत्र्य आणि सुरक्षितता
प्र-बोध-७

शीर्षक:- स्वातंत्र्य आणि सुरक्षितता

"आई खरचं आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असे मला वाटत नाही." विजया म्हणाली.

"तुला असे का गं वाटते?" विजयाच्या आईने विचारले.

"मला बाहेर एकटीने फिरण्यास मनाई आहे, पण दादा त्याला तर तू जाऊन देतेस."

"तुला अट तर माहीत आहे, आधी तुझ्या भावासारखेच स्वसंरक्षणाचे धडे घे आणि कोणावर अवलंबून न राहता सुरक्षिततेचा प्रश्न कणखर बनून स्वतः सोडव मग दादासारखी तुलाही परवानगी देईन." आई म्हणाली.


बोध:- १) स्वातंत्र्य मिळाले म्हणून स्वतःची सुरक्षितता
विसरू नये.
२)स्वातंत्र्य जरी प्राप्त झाले असेल तरी ते
टिकवण्यासाठी स्वतः प्रयत्न करावे लागतात.

प्र-बोधकार © विद्या कुंभार

सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all