Login

प्रसंगातून बोध -९

वेगळी मदत!
प्र-बोध -९

शीर्षक :- वेगळी मदत

"बाळा मला जरा हे मोबाईलमध्ये क्रमांक जोडून दे ना." एक चाळिशीतील बाई बस स्थानकावर रांगेत उभी राहून पुढच्या मुलाला बोलली.

त्या मुलाने, बसला येण्यासाठी काही वेळ असल्याचे पाहून एक एक पायरी सांगत, त्यांना तो क्रमांक त्यात कायमचा त्यांनाच करायला सांगून नोंदून दिला.


त्या बाईच्या चेहऱ्यावर आपण काहीतरी खूप मोठे काम केल्याचे पाहून, तो येणाऱ्या बसमध्ये हसत चढला.

बोध:- मदत अशी करा की, पुढच्या वेळेस ती व्यक्ती स्वतः ची मदत कोणाचा आधार न घेता करू शकेल.


© विद्या कुंभार

सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all