Login

प्रसंगातून बोध-१४

पिवळी पाने!
प्र-बोध-१३

शीर्षक-पिवळी पाने

झाडाची पिवळी पाने वाऱ्यामुळे जमिनीवर पडत होती.

ते पाहून तिचे मन तारुण्यात नुकतेच लग्न झाल्यावर प्रेमाची नव्यानेच पालवी फुटलेल्या क्षणात गेले.

"मी तुझ्यासोबत नेहमीच राहणार,असे वचन देतो बघ."असे तिचा नवरा नेहमी बोलत असे.

पण आज ती एकटीच मागे राहिली होती.

बोध: कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नसते,वेळेनुसार ती तिचे अस्तित्व सोडून जातेच.


प्र-बोधकार © विद्या कुंभार

🎭 Series Post

View all