प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
शीर्षक: प्रत्येकाची वेळ येते भाग-१.
" मला कोणाची गरज नाही." सासू रागाने म्हणाली.
नभाची काही दिवसांपूर्वीच नोकरी गेली होती. ती घरात असल्यामुळे तिची सासू तिला पाण्यातच पाहत होती.
नभा नेहमी चिंतेत असायची. नोकरी असणे हे खूप गरजेचे आहे, हे तिला माहीत होते. आता घरी असल्यामुळे तिला घरातील सर्व कामे करावी लागत होती आणि ती मनापासून ती सर्व करत होती. सोबतच ती नवीन नोकरी शोधण्याचे सुद्धा प्रयत्न करत होती.
" माझी तर नोकरी आहे ना आणि आईच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नको. तिचा स्वभाव तर तुला माहीत आहेच." नभाचा नवरा अपूर्व फोनवरून म्हणाला.
आपले मन मोकळे कोणाकडे करायचे असेल, तेव्हा ती तिच्या नवऱ्याला फोन करत असायची. तिचा नवरा हा नौदल विभागात काम करत असल्याने. सहा महिन्याने सुट्टीनंतर तो घरी यायचा. आत्ताच त्याची सुट्टी संपून, पुन्हा आपल्या कामावर तो रुजू झाला होता.
नभाच्या सासुला सवयच होती की, काम सर्व आवरून बसलेली सून दिसली की; लगेच तिला त्या कामातील चुका सांगायला सुरुवात करायची.
चुकून जेवणामध्ये मीठ जास्त झाले होते, म्हणून त्यांनी मला तुझी गरज नाही असे, म्हणत सासुने जेवण बनवायला सुरुवात केली होती.
नभाचा स्वभाव हा शांत असल्यामुळे सर्व ऐकून घ्यायची, परंतु ज्या वेळेस तिच्या माहेरच्या लोकांचे नाव मध्ये घेतले जायचे, तेव्हा मात्र ती बोलायची.
एखाद्याला दुखरी नस समजल्यावर वारंवार त्या वरतीच बोट ठेवण्याचे काम काही लोकं करतात, तसेच नभाची सासू सुद्धा करत होती.
त्यामुळेच रागाने सासुने, "तू जर काही काम केले नाहीस तर मला काही फरक पडणार नाही. मला कोणाची गरज नाही." असे ठामपणे सांगून स्वतःच जेवण स्वतःच बनवायला सुरुवात केली.
घरात थांबलो तर असेच भांडण होत राहणार आणि तिने नवऱ्याला त्याबाबत सांगून तिला दुसऱ्या नोकरीची संधी आलेली होती, म्हणून तिने नोकरीला जाण्यास सुरुवात केली होती.
" तुम्हाला काही हवे असेल तर मला सांगा. मी आज ऑफिसमधून येताना घेऊन येईन." तिने सकाळी आपल्या सासुला विचारले.
" मला काय हवे असेल, तर माझं मी बघेन. तू मला सांगायची गरज नाही." तिची सासू नाक मुरडत म्हणाली.
सकाळी जाताना वाद नको व्हायला म्हणून त्याकडे दुर्लक्ष करत नभा आपल्या ऑफिसला निघून गेली.
दिवसा मागून दिवस जात होते. आता घरामध्ये एकटे असल्यामुळे सासुला मात्र करमत नव्हते आणि त्यामुळे जेव्हा कधी नभा ऑफिसमधून घरी यायची त्यावेळेस तिच्याशी न बोलताच हॉलमध्ये बसून उगाच तिला बडबड करायची.
कधी स्वतःबनवलेले, तर कधी सुनेनेच बनवलेले जेवण तिची सासू तिच्या मूड नुसार खायची.
एवढे सर्व होत असताना सुद्धा सासुची औषधे वेळेत घेण्यासाठी नभाने त्यांच्या मोबाईल मध्येच काही गजर सुद्धा लावले होते. त्यामुळे कोणत्याही औषधांच्या गोळ्या चुकू नये, हाच तिचा त्या मागचा हेतू होता. सासू सुद्धा आपण आजारी पडायला नको, म्हणून वेळेत औषध घेत होती. कारण एकदा आजारी पडली की त्याचा त्रास उतारवयात किती होतो, हे माहीत होते.
एक दिवस नभा ऑफिसमध्ये महत्त्वाचे काम करत होती आणि तेव्हा तिच्या मोबाईलवर एक कॉल आला.
तिने हॅलो बोलून मोबाईलवर समोरच्या व्यक्तीचे ऐकले आणि ताबडतोबच ती आपल्या ऑफिसमधून निघून गेली.
ती खूपच घाबरली होती आणि लवकरात लवकर इच्छित स्थळी पोहोचण्याचा तिचा प्रयत्न चालू होता. नेमकी त्यावेळी तिने ऑफिसमध्ये न सांगता तिथून ती बाहेर पडली होती. तिला म्हणून सतत ऑफिसमधून कॉल येत होते. महत्वाची मीटिंग आज होती आणि तिला प्रेझेंटेशन द्यायचे होते, पण आता तिला ते शक्य नव्हते. तिने कित्येकवेळा ते येणारे कॉल कट केले, तरी सतत तिला कॉल येतच होते.
तिथे पोहोचल्यावर समोरच्या व्यक्तीची अवस्था बघून तिला धक्काच बसला.
क्रमशः
कोणाचा फोन आला होता ?
काय घडले होते ?
काय घडले होते ?
© विद्या कुंभार.
कथेचा भाग कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा