Login

प्रतिबिंब ( भाग दुसरा )

आरशात न दिसणार प्रतिबिंब
प्रतिबिंब ( भाग दुसरा ).                 स्वतः बद्दल बोलणं मला जास्त आवडतं नाही. पण आता तुम्ही विचारणं आणि मी न सांगणं म्हणजे जरा जास्तच शिष्टपणा होईल नाही का. म्हणून जास्त नाही थोडीशीच माहिती सांगतो. बाकी मी दयाळू, मायाळू, कनवाळू वगैरे आहे हे तर तुम्हाला माहिती आहेच.

माझं बावळट आणि वेंधळ दिसणं मला खूप आवडतं. त्या मुळे शक्यतो माझ्यावर कोणी सहसा कसलाच संशय घेत नाही की कोणी माझ्यावर जबाबदारीची कामही सांगत नाही. एकदा मी समोरच्या बिल्डिंग मधली सगळी गुलाबांची फुल तोडून आणली होती. पण त्या लोकांना मी सोडून सगळ्यांचा संशय आला होता. बाजारहाट करणं वगैरे प्रकार मला कोणीच सांगत नाही कारण मी खराब आणि महागडया वस्तू हमखास आणून ठेवणार हे सगळ्यांना माहिती आहे. त्या पेक्षा घरकाम, बागकाम, चहापाणी, स्वयंपाक अशी काम मला सांगितली जातात. ऑफिस मध्ये तर ऑडिट असलं तर साहेब मी मध्ये उगाच काही तोंडं उघडू नये म्हणून अगोदरच हात जोडून विनंती करतात.

अकाली पांढरे झालेले केसं हाही एक आवडता भाग आहे. त्या मुळे मला कधीही उभं राहून प्रवास करावा लागतं नाही. एकदा तर रस्ता ओलांडताना कॉलेज क्वीनने मला हात धरून ओलांडून दिला होता. बोला आता, आहे कोणाच्या नशिबात असं सुखं. बऱ्याच गोष्टी आहेत. काय काय सांगणार.

खोटं बोलायला पण मला खूप आवडतं. म्हणून मी बिनधास्त साहेबांना तुम्ही खूप चांगले आहात, तुमच्या सारखा सभ्य आणि सज्जन माणूस मी कधी पाहिलेलाच नाही असं सांगतो. अंदर की बात आता तुम्हाला आणि मलाच माहिती आहे. तसा मी कोणालाच तोंडावर वाईट म्हणतं नाही, हा पण एक गुणच आहे.

चला मंडळी, आज तुम्ही म्हणाल, हिच्या गुलाबी साडी नेसलेल्या मामेबहिणीचा जप कसा नाही केला अजून. अहो तिच्या लग्नाच्या तयारीला लागायचं आहे एक तारखे पासून. आणि मी तर कधी कोणाकडे वाईट नजरेने बघतच नाही, तसं सगळं तर तुम्हाला माहितीच आहे.
:
:
:
:
( सगळ्यात म्हणजे मला चहा बनवायला आवडतो. कारण कितीही जोरात मी मला कोणी चहा देता का रे चहा असं ओरडलो तरी पाणी देखील देणार नाही हे मला माहित आहे. अहो चहा ssss ठेवा चहा sss ???)


0

🎭 Series Post

View all