प्रतिबिंब ( भाग तिसरा ). जलद लेखन
किती विचित्रं गोष्ट आहे ही. बुद्धी वाटपाच्या वेळी चहाची गाळणी घेऊन गेलेल्या माणसाला. घटना काय आणि आयुष्य काय, काहीही बोलायचं म्हणजे काय. एखाद्या सशाला किंवा उंदराला असा प्रश्न विचारला तर त्याला कसं लाजल्या सारखं होईल. अगदी तसंच झालं बघा माझं सकाळी सकाळी ???... आठवणींच्या बाबतीत तर मी अफाटच आहे. कोणाला जर मी पैसे उधार दिलेले असतील तर लक्षात राहतं बरोबर पण कोणाकडून घेतले असतील तर कामाच्या रगाड्यात लक्षातच राहात नाही बघा. लग्नात पण असाच गोंधळ होतो माझा.बिल्डिंग मधल्या एका लग्नात तर मी आमच्या कडे आलेल्या पाहुण्यांसकट जेवायला गेलो होतो.सगळ्या लोकांनी पैसे काढून एकच पाकिटं द्यायचं ठरवलं होतं. ते पाकिटं मी द्यावं असं सगळ्यांना वाटलं. नेमकं आईस्क्रीम खाण्याच्या आणि फोटो काढण्याच्या नादात विसरूनच गेलो द्यायला. आता माणूस आहे होतेच चूकभूल. पण लोकं काय चांगले नसतात आपल्या सारखे म्हणून मी कोणालाच बोललो नाही. उलटं त्या पाकिटातल्या पैशातून देवाला पाच रुपये दान पेटीत टाकले. कशाला कोणाचे सगळे पैसे घ्यायचे. तसा मी धार्मिक आणि पापभीरु आहे. एका लग्नात पाकिटं दिलं तर त्यात पैसेच ठेवायला विसरलो, इतकंच नाही तर पाकिटावर नावं पण चुकून घाटपांडेच टाकलं गेलं. आता तेंव्हा विसरलो होतो हे आता आठवून आठवून कबूल करतोच आहे ना. पण चांगुलपणाला किंमत नसते.
एक घटना मात्र विसरूच शकतं नाही. एकदा आमच्या ऑफिस मध्ये सत्यनारायणाची पूजा आमच्या उभयतांच्या हस्ते यजमान म्हणून करायचं ठरवलं होतं. हिला काय सुचलं कुणास ठाऊक. म्हणाली पारंपरिक का काय ट्रॅडिशनल पोशाखात पूजा करू म्हणे. म्हणजे ती बारामतीहुन आणलेली पैठणी आणि नथ वगैरे घालेल आणि मी लग्नात शिवलेला पण आता पोटात घट्ट होणारा नेहरू शर्ट आणि धोतर घालून पूजेला बसावं. आता ऑफिस मध्ये कसं काय ड्रेस घालणार म्हणून घरूनच धोतर वगैरे घालून गेलो. त्या दिवशी लोकल ट्रेनला एव्हढी गर्दी की उतरतांना एकाचा पाय माझ्या जमिनीपर्यंत लोळणाऱ्या धोतरा वर होता हे लोटांलोटीत खाली उतरतांना लक्षातच आलं नाही. त्या मुळे धोतर ट्रेन मधेच अडकुन गेलं आणि मी तसाच खाली उतरून गेलो. धोतर फडफड करत पुढच्या स्टेशन कडे जातांना दिसत होतं.ऑफिस मध्ये वेंधळे पणा बद्दल बोलणे खात खात पोहोचलो तर आठी पोरींना घेऊन हिची लग्नात गुलाबी साडी नेसलेली मामेबहीण टॅक्सीने पोहोचली होती. तेंव्हाच तिचं जिज्जू म्हणणं आणि माधवीने सगळ्या ऑफिस मधल्या लोकांना मला पाहायला बोलावून आणणं मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही.
:
:
:
:
( हो आणि ही पाचवी ला पुजलेली आरोळी कसा विसरू. चहा ssss....चहा ssss ????)
:
:
:
:
( हो आणि ही पाचवी ला पुजलेली आरोळी कसा विसरू. चहा ssss....चहा ssss ????)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा