प्रतिबिंब ( भाग चवथा ).
जलद लेखन
जलद लेखन
स्वतः बद्दल बोलायचं म्हणजे जरा संकोचल्या सारखं वाटतं हो. पण बोललो नाही तर तुम्हाला समजणार तरी कसं की मी किती चांगला आहे म्हणून. म्हणून अगदी थोडक्यात सांगतो.
सगळ्यात मला आवडते माझं कोणत्याही वेळी सारखंच दिसणार आगळंवेगळं रूप. म्हणजे काय ना. मी कसही राहो. अंघोळ करो किंवा पारोसा राहो. माझ्यात काडीचा फरक दिसतं नाही. खुद्द माझ्या लग्नात मी उशिर व्हायला नको म्हणून सकाळीच अंघोळ करून सगळं आटोपून बसलो होतो तर त्या दिवशी मुलांकडच्यांनी सोडाच पण मुलीकडच्यांनी पण, जावाई बुवा अंघोळ करून घ्या ना असं दहा वेळा येवून म्हटलं होतं. आता याचा उपयोग मला ऑफिस मध्ये कधी उशीर झाला म्हणून अंघोळ न करता गेलो तरी कोणालाच काही समजत नाही हा फायदा होतो.
दुसरा माझा गुण आहे सर्वधर्म समभाव. मला जर एखादी मुलगी आवडली ( आताची नाही, लहानपणाची म्हणजे लग्न होण्यापूर्वीची गोष्ट सांगतोय ) तर मी तिची जातं, धर्म, वय अशा क्षुल्लक गोष्टीकडे दुर्लक्ष करून निखळ मैत्री करत असे. यातूनच माझ्या विशाल अंतःकरणाचे दर्शन घडते. कोणाचाही डब्बा वगैरे खातांना देखील मी जातं धर्म, आपला परका असा भेद कधीच पाळत नाही.
कोणाला जास्त त्रास पडलेला मला आवडतं नाही. एकदा मी पाहिलं होतं. रेल्वे क्लार्क न थांबता कॅन्टीनुयस तिकीट काढण्याचं कामं करत होता. मला त्याला त्रास देणं आवडेना. त्या दिवसापासून मी तिकीट न काढता प्रवास करण्याची सवय लावून घेतली. याचा अर्थ असा नाही की मी फुकट प्रवास करतो. मी अनेक वेळा दंड भरून पापक्षालन करून घेतो.
चवथा गुण वेंधळे पणा. आता तुम्ही म्हणाल हा गुण कसा तर त्या मुळे मला ऑफिसमध्ये कोणी महत्वाची जबाबदारीची कामं सांगत नाही. घरी देखील बाजार करणं वगैरे सारख्या महत्वाच्या गोष्टी मला कोणी सांगतच नाही.
स्वच्छ मन असल्याने मला कुठेही शांतपणे झोप लागते हाही एक गुणच, पण आमच्या साहेबाला तो आवडतं नाही. या गुणामुळे मी कोणतेही गाणं अगदी शास्त्रीय संगीत वगैरे देखील ऐकू शकतो, कोणतंही पुस्तकं वाचू शकतो.
मला पुस्तक वाचनाची आणि त्यांचा विकत न घेता संग्रह करण्याची खूप आवड आहे. त्या मुळे माझ्या जवळ अनेक पुस्तकं जमा आहेत. असे अनेक चांगले चांगले गुण माझ्यात आहे. दानशुर पणा, नोटा बंदीच्या काळात मी अनेक देवळामध्ये देणंग्या दिल्या आहेत, इतरांना आर्थिक मदत डायरेक्ट पाच पाचशे रुपयाची केलेली आहे. मला एकदा डब्यात हिने रात्रीची भाजी दिली होती ती मी मोठ्या मनाने प्युनला देवून टाकली.
माझ्यातला सगळ्यात मोठा गुण म्हणजे प्रामाणिकपणा आणि मनाची शुद्धता. एकदा ही फारच गोडीत आहे असं पाहून मी तिला सांगून टाकलं, की लग्नात गुलाबी साडी नेसलेली तुझी मामेबहीण माझ्या कडे बघून स्माईल देत होती. तर ही खदाखदा अगदी डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसत सुटली आणि म्हणाली अहो आरशात तोंडं बघा आधी ती स्माईल नव्हती देत ती तुमच्या वेंधळे पणाला हसत होती.
सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे केर काढणे, भांडी घासणे, लादी पुसणे ह्या बरोबरच मला अप्रतिम चहा बनवता येतो. आमच्या हिला तर माझ्या हातचा चहा घेतल्या शिवाय अजिबात जमतच नाही.
:
:
:
:
:
(अहो चहा कधी ठेवणार.... चहा sss च sss हा.... आलो आलो. जरा अंघोळ करत होतो ???)
:
:
:
:
:
(अहो चहा कधी ठेवणार.... चहा sss च sss हा.... आलो आलो. जरा अंघोळ करत होतो ???)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा