Login

प्रतिक्षा फक्त तूझीच भाग १

आता फक्त तो यायचा बाकी होता. त्यांच्या घराचा कुलदीपक, फक्त कामात झोकून असलेला. त्यांच्या घराण्याचा व्यवसाय टॉप टेनच्या यादीत नेऊन बसवणारा. कधीकाळी हसतमुख राहणारा, त्याच्या अस्तित्वाने एक चैतन्य पसरवणारा. पण आता फक्त वर वर हसण दाखवणारा.

प्रतिक्षा फक्त तुझीच... (दीर्घकथा)

“अहो ऐका ना.” रक्षा तिच्या झोपलेल्या नवऱ्याला उठवत बोलली.

“हम्म्म्म.” विकासने फक्त हुंकार भरला.

“उठा बरं आधी.” रक्षा आता जरा चिडूनच बोलली. “नऊ वाजत आले आहेत. तरी झोपून आहेत अजून.”

“ते तुझ्या लेकाला सांग,” विकास अजूनही डोळे मिटूनच होता. “त्यानेच आळशी बनवलं आहे मला.” तो अगदीच लहान मुलासारखा बोलला.

“त्याने ऑफिस जॉईन करून फक्त तुमच काम हलकं केल आहे.” रक्षा आठ्या पडून बोलली. “हा आळशीपणा तुम्ही तुमचा लावून घेतला आहे. माझ्या लेकाला उगाच नाव ठेवायची नाहीत.”

“बरं बाबा,” विकास नेहमीप्रमाणे स्वतःची हार पत्करत बोलला. “नाही ठेवत नाव तुमच्या लेकाला.” सोबतच अंगावरच पांघरूण निट करत परत झोपला.

विकासला अजूनही पांघरूण गुंडाळून घेत झोपलेलं बघून रक्षा आता रागाला आली. “उठता की दुपारचा चहा त्याच्यापर्यंत पोहोचवू?”

बायकोचा हा रागातला आवाज ऐकून विकासने लगेच त्याचे डोळे उघडले. कारण ह्या आवाजातली धमकी म्हणजे ती पूर्ण होणार याची खात्रीच. मग तो शहाण्या बाळासारखा लगेच उठून बसला.

“बोला राणी सरकार,” विकास आता नाटकी आवाजात बोलला. “काय म्हणणं आहे तुमच?”

तशी रक्षा त्याला चिडूनच बघायला लागली.

“बरं,” विकास आता गंभीर होऊन बोलला. “बोल काय म्हणतेस?”

“अस किती दिवस चालायचं?” रक्षा काळजीने बोलू लागली. “त्याच आयुष्य आहे तिथेच थांबल आहे. फक्त तो आपल्यासाठी जगतोय. स्वतःला तो जस काही विसरूनच गेला आहे.”

तसा विकासने दीर्घ श्वास घेतला. “ते दिसतय गं, पण आपण तरी काय करू शकतो? तेव्हाचा तो त्यांचा हट्ट अजूनही त्याने धरून ठेवला आहे.”

“पण आता त्याला जवळ जवळ दहा वर्ष होत आली.” रक्षा “मला नाही वाटत की ती ...” रक्षा बोलता बोलता थांबली. कारण विकास तिच्याकडे रोखून बघू लागला होता.

“हे त्याच्यासमोर बोलण्याचीही हिम्मत करू नकोस.” विकास गंभीर आवाजात बोलला. “नाहीतर तो आता कायमचा दिल्लीला निघून जाईल.”

तशी रक्षा शांत बसली.

“पण मग आपण शोधायचं का तिला?” रक्षाने उपाय सुचवला.

“पण त्याला समजलं तर?” विकास विचार करत बोलला.

“त्याला कोण सांगणार?” रक्षा जरा उत्साहात येत बोलली.

“इथे साध शिंकलो तरी तो यायच्या आधी डॉक्टर घरात हजर होतात.” विकास तोंड वाकड करत बोलला. “ही गोष्ट त्याच्यापासून लपून राहील?”

“तरी प्रयत्न तर करूयात.” रक्षा विनंतीच्या सुरात बोलली.

यावर विकासने होकारात मान हलवली आणि त्यांनी परत त्या पांघरुणाला हात लावला.

तस रक्षाने त्याला आठ्या पडून विचारलं. “आता काय?”

“त... ते... ते घडी मारतोय.” विकास स्वतःला सावरत बोलला.

"ते मला नका शिकवू.” रक्षा चिडून बोलली. “आजवर इकडच पान तिकडे हलवलं नाही आणि म्हणे घडी मारतोय.” रक्षाने त्याने हात लावलेल्या पांघरुणाला तिच्या हातात घेतलं आणि ती स्वतःच त्याला घडी मारू लागली.

मग विकास नाईलाजाने उठला आणि त्याच आवरायला बाथरूममध्ये गेला. यानंतर त्याची नियमित दिनचर्या चालू झाली. विकास आणि रक्षा नाश्त्यासाठी टेबलावर येऊन पोहोचले. थोड्याचवेळात त्या घराची क्वीन म्हणजेच त्यांची लहान मुलगी तन्वी देखील त्यांच्यासोबत येऊन बसली.

आता फक्त तो यायचा बाकी होता. त्यांच्या घराचा कुलदीपक, फक्त कामात झोकून असलेला. त्यांच्या घराण्याचा व्यवसाय टॉप टेनच्या यादीत नेऊन बसवणारा. कधीकाळी हसतमुख राहणारा, त्याच्या अस्तित्वाने एक चैतन्य पसरवणारा. पण आता फक्त वर वर हसण दाखवणारा. साडेपाच फुटाच्या वर उंची. त्यालाच साजेशी उंची. चेहऱ्याचा रंग गोऱ्या रंगाकडे झुकणारा. सगळ काही वेळेत आणि पद्धतशीर असणारा. जसा काही तो एक यंत्रच होता. जो दिवस रात्र फक्त कामात बुडालेला होता.

तो निरज, कालच तर दिल्लीवरून घरी आला होता. आज बरोबर आठ वाजता तो त्याच्या खोलीतून खाली उतरला आणि नाश्त्याच्या टेबलावर येऊन बसला.

“आई,” तन्वी हलकेच हसत बोलली. “आल गं तुझ घड्याळ.”

यावर रक्षा आणि विकासही हलकेच हसले. पण नीरज मात्र तिला आठ्या पाडून बघायला लागला.

“तू गेली नाहीस अजून बेडकाला मिठ्या मारायला?” नीरज भुवया उडवत तिला विचारू लागला.

इतका वेळ हसणारी ती आता त्याला आठ्या पडून बघायला लागली. “त्याला बायोलॉजी बोलतात.” ती चिडून बोलली. “बाबा याला सांगून ठेवा. काहीही बोलतो मला.”

“सुरवात कोणी केली?” नीरज एक घास खाता खाता बोलला.

तस तिने तिकडून तिचं तोंड वाकड केल.

“बरं, ऑफिस अक्धी जॉईन करणार आहेस?” विकासने मुख्य मुद्याला हात घातला.

“कालच तर आला आहे ना तो.” रक्षा जरा वैतागून बोलली.

“पण मला आता घाई लागली आहे.” नीरज हलकेच हसत बोलला.

“कसली घाई?” तन्वी त्याच निरीक्षण करत बोलली.

“माझा शोध संपला.” नीरज इतक्या वर्षातून आज पहिल्यांदाच जरा लाजत बोलला.

तसे बाकी तिघे त्याला गोंधळून बघत राहिले. ह्याची अपेक्षा नीरजला होतीच. म्हणून तो पुन्हा बोलायला लागला.

“कालच सुहास काकांनी माझा शोध संपवला.” नीरजचे डोळे बोलता बोलता भरून आले. “उगाच लांब लांब शोधत बसलो होतो. पण ते तर आपल्या जवळच होत.”

“म्हणजे?” रक्षाच्या डोक्यात प्रकाश पडला. “म्हणजे ती सापडली?” ती उत्साहात येत बोलली.

“कधी? कुठे? कस?” विकास अधिरतेने एका मागे एक विचारू लागले.

“आपल्या दिल्लीला झालेल्या सक्सेसच्या पार्टीच्या फोटोमध्ये.” नीरजच्या चेहऱ्यावर नुसतच स्मित झळकत होत.

“ह्या सुश्याच्या तर.” विकासने त्याचा मोबाईल काढला आणि त्याला फोन लावू लागले. “गदढ्याला आधी मला सांगायला काय झाल होत?”

“नाही फोन उचलणार ते,” नीरज “ते कालच पुण्याला गेले आहेत. तिथल्या ब्रांचमध्ये काहीतरी प्रोब्लेम झाला आहे.”

“अरे, मला ते काहीच बोलला नाही तो.” विकास मोबाईल खाली ठेवत बोलला. कारण सुहासने काही फोन उचलला नव्हता.

“म्हणून मी आज त्या ब्रांचला जात आहे.” नीरज

“कोणत्या?” विकास

“नवी मुंबईच्या.” नीरज “असही एक नवीन प्रोजेक्ट करायचं आहे. जे की त्या ब्रांचमध्ये व्यवस्थित करता येईल. म्हणजे तिथे त्या प्रोजेक्टसाठी वेगळी जागा मिळून जाईल. मग त्यासाठी अजून दुसरी जागा बघायची गरज लागणार नाही.”

“ओके,” विकासने हसत परवानगी दिली. असही त्याच्या हातात तो बिझनेस गेल्यापासून नीरजने त्याची जबाबदारी चांगली पार पडली होती. तो दिल्लीला जरी होता तरी तो तिथूनच सर्व काही हाताळत होता. त्यामुळे तो सतत दिल्ली ते मुंबई प्रवास करत राहायचा. म्हणून विकासला जास्त जाण्याची गरजच लागत नव्हती. अगदीच काही महत्वाचे निर्णय घायचे असतील तरच विकास ऑफिसला जात असायचा.

“पण तिने तुला ओळखल तर?”

विकासाच्या या प्रश्नावर दोघी विचारात पडल्या.