मागील भागात.
ज्या मुलीने नीरज सारख्या मूलात बदल घडवून आणला. तिला आपल्या घरात सून म्हणून घेऊन यायची घाई तर प्रत्येक आई वडीलांना असते. इथे तर त्याच्या वडीलांच्या मित्रालाही तितकीच घाई झाली होती. म्हणून तो लवकरात लवकर तिला कस मनवणार? याची उत्सुकता त्यांनाच काय? त्याच्या प्रत्येक जवळच्या माणसाला होती.
“भेटली?” नीरज तोंड वाकड करत बोलला.
आता पूढे.
“आल्या आल्याच डोळे दाखवले आहेत तिने मला.” नीरज दिर्घ श्वास घेत बोलला.
“म्हणजे रे?” सुहास यांना आता हसायला येत होत. कारण त्याला अशी डोळे दाखवायची हिम्मत अजून तरी कोण्या मुलीने केली नव्हती.
“आधी फक्त मारकी म्हैस होती.” नीरज परत एक दिर्घ श्वास घेतला. “आता तर अजूनच खडूस झाली आहे.”
“मला तर एवढचं समजलं की तिच्या आयुष्यात खूपच उलथापालथ झालेली आहे.” सुहास जरा गंभीर होऊन बोलले.
“हममम बघूया.” नीरजही जरा गंभीर झाला. “अजून काही माहीती भेटली की सांगा.”
“नक्की.” सुहास “आणि हो आपल्या प्रोजेक्ट्स कडेही लक्ष असू देत. नाहीतर तुझा बाबा मला काही सोडायचा नाही.” सुहास हसत बोलले.
“तुम्हाला तर माहीतीच आहे. कामाच्या ठिकाणी मी फक्त काम करतो.” नीरज “आणि बाबांच म्हणाल तर ते तुम्हीच बघा.”
यावर सुहास मनसोक्त हसले आणि त्यांनी फोन ठेवून दिला.
'आज तुझ्याचमुळेच मी इथवर पोहोचलो आहे,’ नीरज मनातच बोलला. ‘आज मी जो काही आहे आणि जे काही करत आहे ते फक्त आणि फक्त तू दिलेल्या मोटिव्हेशनमुळेच. आता तुझ्या या बेरंग आयुष्यात रंग भरण्याची जबाबदारी माझी.’ नीरजने मनातच काहीतरी ठरवलं आणि त्याच्या कामाला लागला.
नंतरचा तो पूर्ण दिवस सगळ्यांचा कामातच गेला. नीरजही त्याच्या कामात गढून गेला आणि तिकडे अश्विनी देखील तिच्या कामात व्यस्त झाली. ह्या कामाच्या व्यापात त्यांना एकमेकांविषयी विचार करायाला वेळच मिळाला नाही.
संध्याकाळी ऑफिस सुटायची वेळ झाली. बाकी स्टाफ तर त्यांना आजचे दिलेले काम पूर्ण करून आपापल्या घरी हळू हळू निघत होते. काही मॅनेजर निघून गेले होते तर काही घरी जायच्या मार्गावर होते. पण अश्विनी अजूनही तिच्या कामात गढलेली होती. थोड्याचवेळात नीरज देखील तिथून निघू लागला. जाता जाता त्याची नजर आपसूकच अश्विनीच्या केबिनवर गेली. तिला अजूनही कामात असलेलं बघून नीरज तिला बघतच राहीला.
‘कॉलेजमध्ये किती बारीक तब्येत होती तिची,’ तो तिला बघत मनातच विचार करू लागला. ‘आता चांगलीच सुधारली आहे. आधीच्या तिच्या केसांच्या वेण्या कुठे आणि आताची तिची हेअरस्टाईल कुठे. अगदी कपडेही टिपिकल घालत आहे, तरी त्याला फॅशनचीही जोड आहे. ते साध कपडे तरी तिला किती खुलून दिसत आहेत.’ नीरज आता पूर्ण तिच्यात हरवला होता. तिच्या चेहऱ्यावर खेळणारी तिची ती केसांची बट नीरजला खूपच मोहू लागली. इतकी की थोड्यावेळाने त्या बटेचाही त्याला मत्सर वाटू लागला.
नीरजने त्याच्या हातातल्या घड्याळात पाहिलं आणि परत त्याच्या केबिनमध्ये गेला. आता तो तिच्या घरी निघायची वाट पाहू लागला. त्याने त्याच्या केबिनमध्ये त्या पूर्ण इमारतीच्या सीसीटीव्हीच कनेक्शन करून घेतलेलं होत. त्यातच तो अश्विनीला बघत होता. सोबतच उद्याच्या कामाचा आढावा देखील घेत बसला. जशी अश्विनी तिचं टेबलावरच सामान आवरू लागली. तसा नीरजही त्याच्या केबिनमधून निघाला.
नीरजच्या अपेक्षेप्रमाणे अश्विनी त्याला त्यांच्या कंपनीच्या तळ मजल्यावरच्या मुख्य रिसेप्शनजवळ भेटली.
“हाय.” अश्विनीला जवळ आलेलं बघून नीरज मंद स्मित करत बोलला.
तशी अश्विनी पहिले दचकलीच. कारण ती तर तिच्याच धुंदीत होती. त्याला अस समोर बघून तिच्या चेहऱ्यावर परत आठ्या चढल्या.
“मी इतका पण वाईट नाहीये.” नीरजही त्याच्या चेहऱ्यावर आठ्या चढवतं बोलला. “मला स्वतः सीईओने पाठवलं आहे. त्यामुळे मी कोणाला फसवत असल्यासारखं माझ्याकडे नका बघू.”
तस अश्विनीला सुहास यांनी सांगितलेले शब्द आठवले. “अम्म्म त्यासाठी मी माफी मागते.”
“त्यासाठी तर मी नक्कीच अस बोललो नाही.” नीरज लगेच उत्साहात येत बोलला. “आता माझी जुनी मैत्रीण...”
“मी कोणाचीही मैत्रीण नाही.” नीरजच बोलण पूर्ण होण्याआधीच अश्विनी कडक आवाजात बोलली. “आणि मुलांची तर नाहीच नाही. मला फक्त एकच मैत्रीण होती. ती पण...” बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला.
“अम्म सॉरी.” नीरज लागलीच नरमाईने बोलला. “त्याची भरपाई म्हणून मी तुम्हाला तुमच्या घरी सोडू शकतो.”
तस तिने अजूनच खुन्नसने त्याच्याकडे पाहिले. “नो थँक्स, माझी गाडी आहे.”
“ओके. बाय” नीरज मनातच उसासा टाकत बोलला. “भेटू उद्या.”
तस तिने त्याच्यावर तिची नजर रोखली आणि गाडीच्या पार्किंगकडे जाऊ लागली. इकडे नीरजने परत दीर्घ श्वास घेतला आणि तोही त्याच्या गाडीकडे जाऊ लागला.
‘तुझ्या त्या मैत्रिणीलाही शोधून काढेल,’ नीरज सध्यातरी मनातच बोलू शकत होता. ‘ज्या ज्या सुखाला तू मुकली असशील ना ते सर्व तुझ्या पायाशी आणून ठेवेल.’
तर तिकडे गाडीकडे जाणारी अश्विनी मात्र त्याच्याकडे पाठ वळताच खुदकन हसली. ‘तसाच आहे घाबरट, मला वाटलं एवढा मोटीव्हेट करतोय सगळ्यांनाच तर सुधारला असेल. पण थोडी काय कडक बोलली तर लगेच घाबरला.’ ती तशीच मंद स्मित करत तिच्या गाडीकडे गेली.
तिला आता जुन्या कोणत्याच आठवणी नको होत्या. तो जवळ आला तर नक्कीच ते सगळ काही विचारल्याशिवाय रहाणार नव्हता. म्हणून ती त्याला लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होती. त्याच कॉलेजला असताना तिच्यावर असणार प्रेम आणि आताची त्याची ही चाललेली धडपड हे सगळेच तिला न समजण्याइतपत तर ती खूळी नव्हती.
‘मी नाही रे राहिली कोणाच्या प्रेमाच्या लायकीची.’ हसता हसता तिचे डोळे लागलीच भरून आले. ‘ओरबाडून घेतलं आहे मला माझ्यापासून. तेही माझ्या..’ तिला मनातही पुढचं बोललं गेल नाही. ती तशीच तिच्या गाडीत बसून तिच्या घराकडे निघून गेली.
आपण काहीही ठरवलं तरी नियती कधीच तिचे खेळ खेळायचे सोडत नसते. आताही तिने तिचे डाव खेळायला घेतले होते. जुने का असेना? आता सगळ्यांच्या त्या कर्मांचे हिशोब लागणार होते.
थोड्याचवेळात अश्विनी घरी पोहोचली आणि फ्रेश होऊन ती हॉलमध्ये येऊन बसली.
“काय गं?” आई तिचा चेहरा वाचत बोलली. “खूपच दमलेली दिसत आहेस. आज जास्त धावपळी झाली का ऑफिसमध्ये?”

तेवढ्यातच कांता मावशी चहा घेऊन आल्या. तो त्यांनी अश्विनीला दिला.
“धावपळ पायाची नाही. कानाची झाली आहे.” अश्विनीने चहाचे घोट घेत नीरजच पुराण सांगायला सुरवात केली. “तो माणुस कामाप्रती खूपच समर्पित आहे. असा माणूस मी माझ्या आयुष्यात कधीच पाहीला नाही.”
एवढं सगळ ऐकून तिचा आईचे तर डोळेच मोठे झाले. कारण आजवर तिने कोणत्याही मुलाचे एवढे कौतुक कधीही केलेले नव्हते.
“एवढं डोळे फाडुन बघायची गरज नाहीये.” अश्विनीने आईने दिलेला चहा संपवला. तिच्या या वाक्यावर तिच्या आईने नेहमीप्रमाणेच तिचे डोळे फिरवले.
“तुमच्या वर्गात पण अशाच नावाचा कोणी होत ना?” तिची आई मध्येच विचार करत बोलली.
“हो, तोच तो नेभळट आहे.” आता मात्र अश्विनी हलकेच हसत बोलली.
तशी तिची आई तिला आठ्या पडून बघू लागली.

क्रमशः
अष्टपैलू लेखन स्पर्धा.
कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा