मागील भागात.
एवढं सगळ ऐकून तिचा आईचे तर डोळेच मोठे झाले. कारण आजवर तिने कोणत्याही मुलाचे एवढे कौतुक कधीही केलेले नव्हते.
“एवढं डोळे फाडुन बघायची गरज नाहीये.” अश्विनीने आईने दिलेला चहा संपवला. तिच्या या वाक्यावर तिच्या आईने नेहमीप्रमाणेच तिचे डोळे फिरवले.
“तुमच्या वर्गात पण अशाच नावाचा कोणी होत ना?” तिची आई मध्येच विचार करत बोलली.
“हो, तोच तो नेभळट आहे.” आता मात्र अश्विनी हलकेच हसत बोलली.
तशी तिची आई तिला आठ्या पडून बघू लागली.
आता पूढे.
“कॉलेजला असताना त्याने एवढी मदत केली तुला आणि आता त्यालाच नेभळट बोलतेस?”
आई जरा चिडून बोलली.
“अम्म सॉरी.” अश्विनी तिची जीभ चावत बोलली. “आणि मदत त्याने नाही मी त्याला करायचे. एक दोन वेळेस फक्त मला घरी सोडून गेला होता. त्यावरही घरात बाकीच्यांनी तमाशा घातला होता.” आता अश्विनी जरा चिडून बोलली.
“ठीक आहे,” आई “नको तो विषय पुन्हा. बरं तो कसा काय तिथे?”
तस तिने सुहास यांनी सांगितलेली माहिती तिच्या आईला सांगितली.
“बघ नशिबाने त्याला परत तुझ्यासमोर आणून ठेवले.” आई परत अश्विनीला समजावू लागली. “मला तरी वाटत आतातरी तू त्याचा विचार करायला हवास.”
तशी अश्विनी तिरस्कारात्मक हसली. “पण मी लग्न तरी कशी करणार ना?”
“अशी काय बोलत आहेस गं तू?” तिची आई घाबरून विचारू लागली.
“लहान्या काकुच्या भावाने काय केल होत ते विसरलीस का?” अश्विनी उदास हसली.
“त.. ते तर आम्ही आलो होतो ना.” आई
अश्विनीच्या चेहऱ्यावर अजूनही तसेच भाव होते. “त्याआधीच तर त्याने दोन वेळा...” बोलता बोलता ती थांबली.
तसे तिच्या आईचे हाताचे तळवे तिच्या तोंडावर विसावले. ती आता नखशिखांत हादरली होती. कारण ही गोष्ट तिने कोणालाच सांगितली नव्हती.

“तुम्ही आले म्हणून तरी मी तिसऱ्या वेळेस वाचली होती.” अश्विनीचा कंठ दाटून आला. “त्याने एवढं करूनही मीच त्याला नादावले म्हणून माझ्यावरच आरोप लावले गेले. त्यावेळेस जर मी हे आधीचं जे काही त्याने केल ते सांगितलं असतं. तर कोणी माझ्यावर विश्वास ठेवला असता का?”
आता मात्र दोघी मायलेकी एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागल्या.
“म्हणून मी लग्नासाठी तयार होते नव्हते गं.” अश्विनी तिचा हुंदका आवरत बोलली. “माझ्यामुळे कोणाच्या आयुष्याची बरबादी व्हायला नको.”
“किमान मला तरी तेव्हाच सांगायला हव होतस तू.” आई चिडून बोलली. “दुसर कोणी नाही पण माझा तर विश्वास होता ना तुझ्यावर. जीवच घेतला असता त्या लांडग्याचा.”
“आधीच माझ्यामुळे इतका त्रास झाला होता तुला,” अश्विनीचे हूंदके चालूच होते. “अजून तरी किती सहन केल असतस तू?”
“जाऊदे, आता जे काही झाल ते एक वाईट स्वप्न म्हणून विसरून जा,” आई स्वतःला सावरत तिला समजावत बोलली. “किमान तुझ तरी पुढचं आयुष्य नीट होईल.” आईने तिचे अश्रू पुसले.
“म्हणजे?” अश्विनी गोंधळून विचारू लागली.
“आता पुन्हा त्या गोष्टी बाहेर काढू नकोस,” आई विनंतीच्या सुरात बोलली. “जर नीरजने पुन्हा मागणी घातली तर ह्या वेळेस तरी त्याला नकार देऊ नकोस.”
“काय बोलत आहेस तू आई?” अश्विनी आता जरा चिडून बोलली. “त्याच्याशी खोट बोलून मी माझा संसार उभा करू शकत नाही. आज ना उद्या कुठून बाहेरून समजलं तर तो त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा विश्वासघात होईल. जरी त्याने मागणी घातली तरी मी आधी सगळ त्याला खरं काय ते स्पष्ट सांगेल. बाकी तो जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल.”
“अस का करतेस?” आई काकुळतीला येत बोलली. “तू अशीच आयुष्यभर? बाहेरच्या नजरा चांगल्या नाहीत गं.”
अश्विनीने एक उसासा टाकला. “अजून किती नजर लागायची बाकी आहे मला?” नंतर ती निर्वाणीच्या सुरात बोलली. “मी माझी समर्थ आहे सांभाळायला.”
मग तिची आई जरा शांत झाली. आपल्या मुलीने एवढं सगळं सहन केल आणि आपल्यालाच समजल नाही ही गोष्ट आता तिला खायला लागली. मग तिनेही मनोमन काहीतरी ठरवलं.
यानंतर अश्विनीने किचनमध्ये प्रस्थान करत कांता मावशींना जेवणात मदत केली. जेवण बनवून झाल्यावर त्या तिघींनी रात्रीची जेवण आटपली.

रात्रीची जेवण झाल्यावर रोज गप्पा मारणाऱ्या दोघी मायलेकी आज काहीच न बोलता थेट त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी निघून गेलेल्या बघून कांता मावशींना जरा ते वेगळचं वाटल. मग त्यांनीही घरातली राहिलेली काम आटपायला घेतली. आईला ताप भरल्यापासून अश्विनीने कांता मावशींना जाही दिवस त्यांच्या घरीच रहायची विनंती केली होती. म्हणून त्याही किचनला लागून असलेल्या स्टोररूममध्ये जाऊन झोपल्या. त्यांना आजची ही शांतता खूपच जीवघेणी वाटून गेली होती.
तर दुसरीकडे नीरजही त्याच्या घरी जाऊन पोहोचला. त्याच्या घरी देखील ‘अश्विनीची भेट’ याबद्दल खूपच उत्सुकता होती. त्याने घरात फक्त त्याच एकच पाउल टाकल तोच तन्वी त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहिली.
दोघांनी एकमेकांकडे पाहिले. तन्वीच्या चेहऱ्यावर खट्याळ हसू होते. तर नीरज तिला गोंधळून बघायला लागला.
“हम्म्म्म.” तन्वी चिडवण्याच्या सुरात बोलू लागली. “मग, कशी झाली भेट?”
तसा नीरजने सुस्कारा सोडला. “मला घरात तर येऊदे.” त्याला हा प्रश्न विचारला जाणार याची पूर्ण कल्पना होती.
“येऊ दे गं त्याला आता.” रक्षा तन्वीला रागवण्याच नाटक करत बोलली. “काय घाई आहे?”
तसा नीरजने सुटकेचा श्वास सोडला. पण त्याला तरी कुठे माहित होत की आता घरात फ्रेश होऊन बसल्यावर त्याला किती प्रश्नांना उत्तर द्याव लागणार होत ते.
आधीच घरी येता येता उशीर झाला होता. म्हणून नीरज पटकन त्याच्या खोलीत गेला आणि फ्रेश होऊ लागला. आताचा वेळ हा फक्त त्याचा असल्याने त्याच्या डोळ्यासमोर आज दिवसभरातले अश्विनीचे चेहरे फिरू लागले. तिचं त्याला टोमणे मारणं, हसून चिडवणं, तिचं ते ब्लॅकमेल करण सगळचं आवडलं होत.
रोज पंधरा मिनिटात आवरून येणारा नीरज आज तब्बल अर्धा तास झाला तरी आला नव्हता. हाच विचार कतरत तिथे जेवणाच्या टेबलावर ते तिघेही त्याची आतुरतेने वाट बघत होते.
आता प्रेमाच्या विषयात चिडवायला संधी मिळाल्यावर कोणती बहिण अथवा भाऊ ती सोडणार तरी का? मग काय? तन्वी खट्याळ चेहऱ्याने उठली आणि नीरजच्या खोलीकडे जाऊ लागली.
“तनु, तो जर चिडला ना,” रक्षा तिला दटावू लागल्या. कारण ती काहीतरी उपद्व्याप करायला चालली असल्याचे तिला समजून गेले होते. “तर मग मला काही सांगायचं नाही.”
“मला नाही इतका वेळ वाट बघता येणार.” तन्वी हसतच बोलली. “आता बघा कसा लगेच धावत येईल.” एवढ बोलून ती त्याच्या खोलीकडे पळून गेली.
“हे भगवान,” रक्षाने डोक्याला हात लावला. “कस व्हायचं?” तिने विकासवर एक नजर टाकली. तसे त्याने फक्त त्याचे खांदे उडवले.
पुढच्या काही क्षणात तन्वीने सांगितल्याप्रमाणे नीरज धावतच येताना दिसला. फरक फक्त इतकाच होता की तन्वी काहीतरी हातात घेऊन पूढे पळत होती. तर नीरज तिच्या मागे पळत तिला चिडून आवाज देत होता.
“तने ते माझ आहे,” नीरज जरा चिडून बोलत होता. तर तन्वी त्याला तिचं वस्तू दाखवून हसून चिडवत होती.
पुढच्या काही सेकंदातच ते दोघ भाऊ बहिण त्या जेवणाच्या टेबलाभोवती गोल गोल फिरू लागले.

क्रमशः
अष्टपैलू लेखन स्पर्धा.
कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा