मागील भागात.
विकासच्या बोलण्यावर अश्विनीला नीरजची आठवण आली. ‘सेम नीरजसारखे काहीही लॉजिक लावतात.’ अश्विनी मनातच बोलून गेली. नंतर तिला समजल की त्यांनी अजूनही जेवण केल नवह्यं. “सर पहिले तुम्ही जेवण करून घ्या. मी वाट बघते तोपर्यंत.”
“नको, बोलण ही महत्वाच आहे आणि तुला वेळेत घरी पण तितकच महत्वाच आहे.” विकास त्यांच्या टेबलवरच्या फाईल चाळत बोलू लागले.
यावर अश्विनी काही बोलणार तोच नीरज तिथे येऊन पोहोचला. त्याने ना दरवाजा नोक केला आणि नाही आत यायची परवानगी मागितली. तो थेट त्या केबिनमध्ये आला होता. ते बघून अश्विनी चांगलीच चिडली. विकास आणि नीरज काही बोलण्याआधीच अश्विनीने बोलायला सुरवात केली.
आता पूढे.
“आत येताना परवागनी घायची असते एवढे पण मनर्स नाहीत का तुला?” अश्विनी नीरजकडे बघत चिडून बोलली.
“असूदे गं,” विकास हलकेच हसत बोलला. “तो...”
“सर, काही गरज नाहीये त्याची बाजू घायची.” विकासच बोलण पूर्ण ऐकून न घेताच अश्विनी बोलू लागली. “सुहास सर बाहेर होते म्हणून काही दिवसांसाठी त्याला सीईओ काय केल? तर तू ही कंपनी स्वतःची समजू लागला का?” अश्विनी नीरजकडे रोखूनच बघत होती.
तर आपला नीरज मनातच उसासे टाकत होता.
“अगं ठीक आहे.” विकास त्यांच हसण दाबत बोलले.
“अहो सर तुम्ही त्याला ओळखत नाही.” अश्विनी तिच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आणत बोलली.
“मी त्याला ओळखत नाही?” विकासला आता स्वतःवर ताबा ठेवणं खूपचं मुश्कील झाल.
तर तिकडे नीरज आता मनातच आजूबाजूच्या सर्व भिंतीवर स्वतःच डोक आपटून मोकळा झाला होता. ‘माझ्याच वडिलांसमोर माझ्याच इज्जतीचा पालापाचोळा करायला घेतलायं आणि त्यांना तर फक्त निमित्तच पाहिजे.’ नीरज विकासवर त्याची नजर रोखून मनातच बडबड करत होता.
“बरं आता कामाच बोलूया?” विकासने मुख्य मुद्याला हात घातला. “तू पण ऐक रे.” विकास नीरजकडे बघून बोलले. तसा तो ही पटकन तिथे येऊन बसला.
“नवीन प्रोजेक्ट बद्दल तर नीरजने तुम्हाला कल्पना दिलीच असेल.” विकास आता गंभीर होऊन बोलायला लागले.
तसे अश्विनी आणि नीरज दोघेही ते मनापसून ऐकायला लागले. कामाप्रती ते दोघेही सारखेच होते. तिथे मात्र बाकी गोष्टी त्यांच्यासाठी दुय्यम होत्या.
“ते प्रोजेक्ट आम्ही तुझ्यावर सोपवत आहोत.” विकास अश्विनीकडे बघून बोलला.
तशी अश्विनी त्याला बघतच राहिली. दोन क्षण तर तिला विकासच बोलण समजण्यातचं गेले. नंतर लगेच स्वतःला सावरत ती बोलू लागली. “पण सर त्यासाठी तर त्या ब्रांचमध्ये टेस्ट चालू आहे ना? त्याचा निकाल लागल्याशिवाय मी कसं? म्हणजे मला कसं ते देत आहात?”
“हे बघ अश्विनी,” विकास समजावण्याच्या सुरात बोलला. “तिथला बाकी स्टाफ काम करत नाही अश्यातला भाग नाही. पण तिथे कंपनीपेक्षा स्वतःचा जास्त विचार केला जातो. म्हणून फक्त सांगितलेली काम केली जातात. तुझ तस नाहीये. आपल्या ह्या राज्यातल्या विविध ब्रांचमधून तुझी निवड केलेली आहे. याला बाकी बोर्ड ऑफ डिरेक्टर्स यांची पण संमती आहे. बाकी टेस्टच म्हणशील तर ते फक्त दाखवायला केल आहे.”
“तरी मीच का?” अश्विनीचा मूख्य प्रश्न.
“तुझ एमबीए पूर्ण झाल्यवर तू थांबली नाहीस. तर कॉम्पुटरच्या सायबर सिक्युरिटीमध्ये डिग्री देखील घेतलीस. तेही तुझी ही नोकरी सांभाळून.” विकासने त्यांचे मुद्दे स्पष्ट करायला घेतले. “आपलं आत्ताच नवीन प्रोजेक्ट हे देखील त्या संबंधितच आहे. त्यात तुझी चांगलीच एकस्पर्टीज आहे. म्हणून तुझी निवड केली आहे. यात तुझ्या सुहास सरांचा काहीच वशिला नाही बरं.”
“ठीक आहे सर.” आता मात्र अश्विनी मंद स्मित करत बोलली.
तेवढयातच सुहास देखील तिथे येऊन पोहोचले. नंतर त्या प्रोजेक्टबद्दल सुहास, विकास, नीरज आणि अश्विनी या यांच्यामध्ये सखोल चर्चा झाली. त्यात नीरजच बोलणं, त्याच त्यामधलं असणार ज्ञान बघून अश्विनी तर आश्चर्यचकितच झाली होती.
त्याच्या त्या प्रोजेक्टबद्दलच्या बोलण्यात ती त्याच्यात हरवून गेली होती. इतका सखोल अभ्यास, त्यातल्या अडचणीबाबत असलेली दूरदृष्टी हे क्वचित माणसांमध्येच बघायला मिळते. त्यात हा देखील असल्याने अश्विनी आजच्या नीरजला पाहून प्रभावित झाली होती. तो कामाच्या बाबतीत किती गंभीर होता? त्याची जाणीव तिला आजचा नीरजला बघून झाली. त्यांच्या ह्या चर्चेत कधी संध्याकाळचे साडेसात वाजून गेले हे त्यांनाच समजल नव्हत.
त्यांची ती मीटिंग आटोपल्यावर विकासने त्यांच्यासाठी कॉफी ऑर्डर केली. कॉफी येईपर्यंत त्यांच्या इतर गप्पा सुरु झाल्या. नीरज आता मात्र गप्प बसला होता. कारण त्याने आधीच त्याला चिडवण्यासाठीचे खूप सारे विषय त्या दोघांना दिले होते. एक विषय त्याची घरी वाट बघत होता. काही वेळाने त्यांची कॉफी आली. ती संपवून ते घरी जायला निघाले.
ह्या वेळेस अश्विनी पटकन सुहास यांच्या गाडीत जाऊन बसली. कारण त्यांच घर त्यांच्या ऑफिसच्या जवळ होत आणि तिची गाडीपण तिथेच होती. मग नीरजचा परत भ्रमनिरास झाला. मग तोही निमूटपणे त्याच्या गाडीत जाऊन बसला. विकास यांचीही गाडी होती. पण आता नीरजसोबत असल्याने त्यांनी त्यांची गाडी त्यांच्या ऑफिसला ठेवली आणि ते नीरजसोबतच घरी जायला निघाले.
नीरज आणि विकास घरी पोहोचले. नीरजचा एक पाय घरात पडलाही नव्हता. तोच एक आवाज घरात घुमला.
“काका प्लीज ना, तिला जेवण करून घ्यायला सांगा ना.” तन्वी खट्याळ होत नाटकी आवाजात बोलू लागली. “मी सांगितलं तर ती वेगळा अर्थ काढेल. आधीच तिनें माझ्या इज्जतीचा भाजीपाला करून टाकला आहे.”
नीरजला बराच मोठा धक्का बसला. कारण तो मेसेज तर त्याने सुहास यांना पाठवला होता. मग त्याने त्याचा मोबाईल पाहीला तर तो मेसेज एस या वर्णाक्षराखाली असलेल्या टी या वर्णाक्षरावर असलेल्या तन्वीला गेला होता. मग नीरजने काही वर मान करून पहिले नाही आणि सरळ त्याच्या खोलीकडे निघून गेला.
त्याच आवरून येईपर्यंत विकासने सकाळपासून नीरजचा जो कार्यक्रम झाला. तो सगळाच त्याच्या घरात रक्षा आणि तन्वीला इत्यंभूत सांगून दाखवला. मग जेवणाच्या टेबलावर नीरजचा सुजलेलं नाक पाहिलं गेल. त्याच्या नावाच बारस ऐकलं गेल. नंतर मुंबईच्या ऑफिसमध्ये जे काही नीरजसोबत झाल ते देखील विकास यांनी रंगवून रंगवून सांगितल.
नीरज? तो मात्र गप्पपणे सगळ काही ऐकून घेत राहीला. काय करता बाबा? प्रेम होत ना. ऐकून तर घ्यावचं लागणार होत.
तिकडे अश्विनीही देखील उशिरा घरी पोहोचल्यावर तिनेही तिच्या आईची परत बडबड ऐकली. त्यावर अश्विनीने फक्त नकारार्थी मान हलवली. नंतर त्यांनी जेवण केली आणि झोपी गेले.
दुसऱ्या दिवसापासून परत त्यांचा नियमित दिनक्रम चालू झाला. नीरज रोज नवीन टास्क देत राहीला आणि बाकी स्टाफकडून ते कसे पूर्ण करून देतात ते बघत राहीला.
असं बरेच दिवस चालू राहील. एके दिवशी नीरजने सांगीतलेल प्रेझेन्टेशन अश्विनीकडून पूर्ण झाल नव्हतं. बाकी सगळ्या मॅनेजर्सचे प्रेझेन्टेशन त्याच्यापर्यंत आलेले होते. आता फक्त अश्विनीच्या टीमचे बाकी होते. त्या दिवशी ती नेमकी उशीरा आली होती. तोवर बाकी टीमच्या मॅनेजर्सनी तिच्या टीमवर बरचं तोंडसुख घेतलेल होत.
ही बातमी नीरज पर्यंत देखील पोहोचवण्यात आली होती. त्याने पहीले विचार केला. एवढे दिवस वेळेत काम पुर्ण करणारी टिम आता मागे रहाणे शक्यच नव्हती. त्यानेही काही फोन फिरवले आणि अश्विनीच्या येण्याची वाट पाहीली.
क्रमशः
अष्टपैलू लेखन स्पर्धा.
कसा वाटल भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.
कसा वाटल भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा