मागील भागात.
दुसऱ्या दिवसापासून परत त्यांचा नियमित दिनक्रम चालू झाला. नीरज रोज नवीन टास्क देत राहीला आणि बाकी स्टाफकडून ते कसे पूर्ण करून देतात ते बघत राहीला.
असं बरेच दिवस चालू राहील. एके दिवशी नीरजने सांगीतलेल प्रेझेन्टेशन अश्विनीकडून पूर्ण झाल नव्हतं. बाकी सगळ्या मॅनेजर्सचे प्रेझेन्टेशन त्याच्यापर्यंत आलेले होते. आता फक्त अश्विनीच्या टीमचे बाकी होते. त्या दिवशी ती नेमकी उशीरा आली होती. तोवर बाकी टीमच्या मॅनेजर्सनी तिच्या टीमवर बरचं तोंडसुख घेतलेल होत.
ही बातमी नीरज पर्यंत देखील पोहोचवण्यात आली होती. त्याने पहीले विचार केला. एवढे दिवस वेळेत काम पुर्ण करणारी टिम आता मागे रहाणे शक्यच नव्हती. त्यानेही काही फोन फिरवले आणि अश्विनीच्या येण्याची वाट पाहीली.
आता पूढे.
सकाळी ऑफीसवर निघण्याआधी अश्विनी तिच्या आजच्या कामाचे मेल्स चेक करत होती. तेव्हा तिला त्यांच्या कंपनीच्या वेबसाईटमध्ये काहीतरी प्रोब्लेम जाणवला होता. तिला जरा संशय आल्याने तिने लगेच मुंबईच्या मेन आयटी ऑफीसला त्याबद्दलची माहिती पाठवून दिली.
त्या आयटी ऑफीसनेही तपासणी करत पुढे येणाऱ्या प्रोब्लेमवर लगेच उपाय शोधून काढला आणि तो प्रोब्लेम उभा राहण्याआधीच सोडवला गेला. अश्विनीने घेतलेल्या शिक्षणाचा आज चांगलाच फायदा झाला होता. पुढे होणारा मोठा अनर्थ टळला गेला होता. त्यामुळे तिला आज सकाळीच परत मुंबईच्या ऑफीसला बोलावून घेतले होते. तिथे जाऊन मग ती तिच्या डिपार्टमेंटच्या ऑफीसला आली होती.
ती जशी तिच्या डीपार्टमेन्टच्या मजल्यावर आली. तस तिला तिच्या स्टाफवर दुसरेच मॅनेजर तोंडसुख घेताना दिसले. ते बघून तिच्या तळपायाची आग मस्तकात चढली. तशी ती तिथेच कडाडली.
“माईंड युर लँग्वेज मिस्टर व्हॉटएव्हर युर नेम इज.” अश्विनी चांगलीच चिडून बोलली. “ते पण इथे तुमच्यासारखेच कंपनीचे काम करत आहेत. तुमच्या घरचे नोकर नाहीत जे त्यांच्यावर आवाज चढवून बोलत आहात. तुमची काम तुम्ही किती प्रामाणिकपणे करता? याची पण लिस्ट आहे माझ्याकडे. हवं तर ती पण मी बाहेर काढते.”
पुर्ण मजल्यावर अश्विनीचा कडक आवाज घुमला गेला होता. तिचा तो मोठ्ठा आवाज ऐकून मनीषाही तिथे धावतच आली. तिलाही अश्विनीविरुध्द तक्रार करण्याची संधी सोडायची नव्हती. तिचा आवाज ऐकून मुख्य मॅनेजर ही तिथे येऊन पोहोचला.
“मिस अश्विनी. मोठ्याने ओरडून बोलायला हे तुमचं घर नाहीये.” मुख्य मॅनेजर चिडून बोलला. “ही पण गोष्ट तुम्हाला सांगायला हवी का? त्यात आज तुम्ही उशिरा देखील आल्या.”
“हा नियम तर सगळ्यांनाच लागू असेल ना सर?” अश्विनीने आवाज जरी सौम्य ठेवला होता. तरी त्यातला कडकपणा तसाच होता. ती त्या मॅनेजरकडे बोट दाखवून बोलली. “दुसऱ्या मॅनेजरच्या स्टाफला काही माहिती द्यायची जबाबदारी फक्त ज्यांच्या त्यांचा मॅनेजरलाच आहे. हाच नियम आहे ना? मग ह्यांना माझ्या टीमला बोलण्याचा अधिकार कोणी दिला?”
अश्विनीच्या या बोलण्यावर सगळेच शांत झाले. अश्विनीने त्या बोलणाऱ्या मॅनेजरवर तिची कडक नजर टाकली आणि पुढे बोलली. “माझ्या उशिरा येण्याच कारण सगळ्यांना संध्याकाळपर्यंत समजून जाईल.”
जिथे स्वतःची चूक नाही तिथे अश्विनी कधीच कोणाचं ऐकून घेत नव्हती. तिच्या बोलण्यातली धार ही तितकीच होती जितकी की तिच्या कामात होती.
‘बाप रे.’ नीरज मनातच बोलला. ‘हिचा तिखटपणा तर अजूनच वाढलाय. खुप कठिण जाणार आहे नीरज बेटा.’
तिचा आवाज ऐकुन तोही तिथे आला होता. पण तो दाराआड लपुन तिच बोलणं ऐकत राहीला होता. ती मुंबईच्या आयटी ऑफीसला गेली होती हि बातमी त्याला आधी लागलेलीच होती.
“ठीक आहे, मी सांगतो त्यांना. आता चला नीरज सरांसोबत मिटींग आहे.” मुख्य मॅनेजरने विषय तिथेच संपवला.
अश्विनीही आता मिटींग हॉलमध्ये येऊन बसली. नीरज सगळ्यांच्या कामाचा आढावा घेत होता. त्यात अश्विनीच्या टीमच आजच काम थोड अपूर्ण दिसत होत. नीरजला आता अश्विनीची मस्करी करण्याची लहर आली होती.
“मिस अश्विनी.” नीरज अश्विनीकडे बघत बोलला. “तुमच काम अपुर्ण….” तो काही पुढे बोलणार तोच अश्विनीने पूर्ण झालेली फाईल त्याच्या पुढ्यात ठेवली.
नीरजने तिच्याकडे पाहिलं आणि ती फाईल चेक केली. “पण आधीसारखं नाहीये हे.” नीरज नकारार्थी मान हलवत बोलला. “पहील्यांदाच तुमच्याकडून असं झाल आहे. म्हणून मी तुम्हाला दुसरी संधी देत आहे.”
नीरजच्या या वाक्यावर मुख्य मॅनेजरचे डोळेच ताठ झाले. त्याने एवढं ऐकलं होत की या नवीन सीईओने कोणाचीही चूक कधीच माफ केलेली नव्हती. पण आता तो सरळ सरळ एक संधी देऊन मोकळा झाला होता.
अश्विनीवर मात्र याचा काही परीणाम झाला नव्हता. शेवटी तिच्यासाठी तो खरा सीईओ नव्हताच. पुढच्या काही वेळातच ती मिटींग संपली. ती तिच्या डिपार्टमेंटकडे निघून गेली. तिच्या मागे तिची टीमही गेली. तिच्या स्टाफने दुसऱ्या मॅनेजरच बोलण ऐकून घेतलं. म्हणून तिने तिच्या स्टाफला जरा झापल देखील होत. त्यानंतर ती तिच्या केबिनमध्ये जाऊन तिच्या कामाला लागली.
“मॅडमचा ना मला काहीच समजत नाही.” संतोष दिर्घ श्वास घेत बोलला. “कधी कधी अंबाबाई बनते, तर कधी अशी काळजीवाहू आईच बनते.”
“हमम, त्यांना चुक खपतच नाही रे.” रेवा “चुक नसेल ना तर ती या कंपनीच्या मालकाच पण ऐकणार नाही.” रेवा हसतच बोलली.
“माझी बुराई करुन झाली असेल तर कामाला लागा.’ अश्विनी लांबूनच कडक आवाजात बोलली. हे दोघेजण एकत्र बसून गप्पा मारत असल्याचे तिच्या कामातून तिला दिसले. म्हणेन ती लगेच बाहेर आली.
“अँ…..” रेवा चाचपत बोलली. “तस नाही मॅडम. त.. ते जरा थँक्यू बोलायचं होत. तुम्ही आम्हाला संभाळून घेतलत.”
“पण प्रत्येक वेळेस मी असेलच असं नाही ना.” अश्विनीने रेवाकडे एक कटाक्ष टाकला. “आपल कामच असं ठेवा की समोरच्याची आपल्याला बोलण्याची हिम्मतच नाही झाली पाहीजे.”
रेवा अश्विनीकडे बघतच राहीली.
“अजुन काही बोलायचं नसेल तर तु जाऊ शकतेस.” अश्विनी फाईल वाचत बोलली. "बरीच काम आहेत."

तशी रेवा पटकन आपल्या जागेवर जाऊन बसली.
मग अश्विनीही तिच्या केबीनमध्ये निघेन गेली.
त्या नंतर पूर्ण दिवस कामातच गेला आणि संध्याकाळची ऑफीस सुटायची वेळ झाली. तोपर्यंत मुख्य ऑफीसकडून अश्विनीसाठी कौतुकासाठीच पत्रसुद्धा आल. ते वाचुन मुख्य मॅनेजरला तर काही सुचेनास झाल. ती त्याच्या वयापेक्षा किमान दहा वर्षाने लहान होती. तरी तिची कार्यक्षमता, निर्णयक्षमता, काम हाताळण्याची विलक्षण पध्दत या सर्वात ती त्याच्यापेक्षा सरस ठरत होती. पण त्यात कधीच तिचा गर्व दिसला नव्हता.
ऑफीस सुटण्याच्या आधी मुख्य मॅनेजरने सगळ्यांनाच स्टाफला परत एकत्र करुन अश्विनीचे अभिनंदन केले आणि सर्वांसमोर ते पत्र अश्विनीला दिले. ते बघून माया आणि मनीषाचा अजूनच जळफळाट झाला.
नीरज मात्र फक्त तिलाच बघण्यात गुंग होता. काम संपल की त्याला फक्त तिचं जी दिसायची. तो मंद स्मित करत तिला बघत असल्याचे अश्विनीने पहिले. ते बघून अश्विनीने त्याच्याकडे बघून तिचं तोंड वाकड केल. पण याचा नीरजवर काही फरक पडला नव्हता. त्याला इतक तर जाणवलं होत की ती मुद्दाम त्याला तिच्यापासून लांब करण्यासाठी अस वागत होती. म्हणून तिचं वागण त्याने कधीही गंभीरपणे घेतलं नव्हत.

कॉलेजच्या वेळेसची तिची मैत्रीच इतकी गोड होती की तिचं प्रेम त्याहून गोड असल्याशिवाय रहाणार नव्हत.
ते कौतुकाच पत्र घेऊन अश्विनी ऑफीसच्या पार्किंगमध्ये आली. तिने तिच्या गाडीच लॉक उघडल. त्यानंतर गाडीच मागच दार उघडून मागच्या सीटवर तिची ऑफिसची बॅग ठेवली. बॅग ठेवल्यानंतर गाडीच मागच दार लावताना तिचं लक्ष त्या दरवाजाजवळ असलेल्या मागच्या टायरकडे गेल. ज्यातली सगळी हवाच निघून गेली होती. ते बघून तिने रागातच त्या टायरवर तिचा पाय मारला.

"ह्याला पण आत्ताच पंक्चर व्हायचं होत." अश्विनी चिडून बोलली.
तस तिच्यापासून लांब असणारा एक चेहरा हलक्याश्या स्मितने झुकला गेला.
क्रमशः
अष्टपैलू लेखन स्पर्धा.
कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा